आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढा फक्त आधार कार्डने, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस – Aadhaar-Based Learning Driving Licence Apply

आपल्याला कोणत्याही प्रकारचे वाहन चालवायचे असल्यास तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य आहे. जर आपल्याकडे गाडी आहे पण ड्रायव्हिंग लायसन्स नाही त्यांच्यासाठी एक नामी संधी चालुन आली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच) एक अधिसूचना प्रसिद्ध केली होती, ज्यामुळे काही सेवा पूर्णपणे आधार प्रमाणीकरणाद्वारे ऑनलाईन घेता येतील. राज्य सरकारच्या निर्देशानुसार, ज्यांना लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक असेल त्यांनी घरी बसून ऑनलाइन टेस्ट देण्यापूर्वी त्यांचा आधार कार्ड नंबरने ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया:(Aadhaar-Based Learning Driving Licence Apply)

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या खालील वेबसाइटला भेट द्यायची आहे.

https://sarathi.parivahan.gov.in 

नंतर RTO वेबसाइटचे पेज ओपन होईल. या पेजमध्ये आपल्याला आपले राज्य निवडायचे आहे.

Please select the State from where the service is to be taken
Please select the State from where the service is to be taken

राज्य निवडल्यानंतर डाव्या बाजूला मुख्य मेनू मध्ये किंवा डॅशबोर्डवर पर्याय दिसतील त्यामध्ये “Learner Licence” हा पर्याय निवडायचा आहे.

Learner Licence
Learner Licence

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज सादर करण्याचे टप्पे आहेत, ते पाहून “Continue” बटन वर क्लिक करा.

आपण मुत्सद्दी (परदेशी)/प्रवासी/शरणार्थी/परदेशी (परंतु मुत्सद्दी नाही)/माजी सैनिक/शारीरिकदृष्ट्या आव्हानित असाल तर कृपया श्रेणी (Category) निवडा.

यानंतर (Applicant does not hold Driving/ Learner Licence)  म्हणजेच आपल्याकडे अजुनपर्यत कोणत्याही प्रकारचे Licence नाहीये,जर नसेल तर त्या ऑपशन वरती क्लिक करायचे आहे.व SUBMIT या बटणावरती क्लिक करायचे आहे.

Applicant does not hold Driving/ Learner Licence
Applicant does not hold Driving/ Learner Licence

आधार प्रमाणीकरण वापरणारे अर्जदार त्यांच्या घरातून किंवा कोणत्याही पसंतीच्या ठिकाणी एलएल टेस्ट घेऊ शकतात, आरटीओला भेट देण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन एलएल चाचणीसाठी संकेतशब्द आधारशी जोडलेल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएस म्हणून पाठविला जाईल. यशस्वी अर्जदार त्याचा लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करू शकतो.

आधार नसलेल्या अर्जदाराने कागदपत्र पडताळणीसाठी आरटीओ कार्यालयात भेट देणे आवश्यक आहे. एलएल चाचणी घरी किंवा कोणत्याही पसंतीच्या ठिकाणी घेतली जाऊ शकते.

१. आता आपल्याला दोन पर्याय दिसतील १) Submit via Aadhaar Authentication २) Submit without Aadhaar Authentication आपण इथे आधार कार्ड प्रमाणीकरणाद्वारे ऑनलाईन अर्ज करणार आहोत त्यामुळे “Submit via Aadhaar Authentication” हा पर्याय निवडा.

२. पुढे आपला आधार कार्ड नंबर किंवा आधार व्हर्च्युअल आयडी टाका आणि “Generate OTP” वर क्लिक करा. आधार रजिस्टर मोबाईलवर ओटीपी येईल तो “Enter OTP here” या बॉक्स मध्ये टाका आणि खालील तीन चेक बॉक्स मध्ये टिक करून “Authenticate” वर क्लिक करा.

Submit via Aadhaar Authentication
Submit via Aadhaar Authentication

१. आधार प्रमाणीकरण केल्यावर आपल्या आधारकार्ड वरील सर्व माहिती आणि फोटो आपल्याला दिसेल, पुढे प्रोसेस चालू ठेवण्यासाठी  “Proceed” वर क्लिक करा.

२. लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन फॉर्म ओपन होईल त्यामध्ये प्रथम आपले “आरटीओ ऑफिस” निवडा आणि बाकी सर्व माहिती आधारकार्ड वरील माहिती आपोआप भरली जाईल, व वैयक्तिक माहिती मध्ये काही आवश्यक माहिती तुम्ही भरू शकता. पुढे आधारकार्ड वरील पत्ता आपोआप भरला जाईल, सध्याचा पत्ता बदलायचा असेल तर बदलू शकता.

स्पष्टीकरणः वाहनांचा वर्ग निवडण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा:

 1. नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांमध्ये वैयक्तिक वापरासाठी साइड मोकर, मोपेड्स, तीन चाकी वाहने, वैयक्तिक वापरासाठी मोटर कार, काटा लिफ्टसह मोटर सायकलचा समावेश आहे.
 2. परिवहन वाहनात सार्वजनिक सेवा वाहन, मालवाहतूक, शैक्षणिक संस्था बस किंवा खाजगी सेवा वाहन समाविष्ट आहे;
 3. हलक्या मोटार वाहनात ट्रान्सपोर्ट वाहन किंवा ऑम्निबस यापैकी एकट्याचे एकूण वाहन वजन किंवा मोटर कार किंवा ट्रॅक्टर किंवा रोड-रोलर यापैकी कोणत्याही प्रकारचे वजन न केलेले वजन किलोग्रामपेक्षा जास्त नसते;
 4. मध्यम वस्तूंच्या वाहनात हलकी मोटर वाहन किंवा अवजड वस्तूंच्या वाहनाशिवाय कोणतीही मालवाहतूक समाविष्ट असते;
 5. अवजड वस्तूंच्या वाहनात कोणत्याही मालवाहतुकीचे एकूण वाहन वजन किंवा ट्रॅक्टर किंवा रोडरोलर यापैकी १२,००० किलोग्रामपेक्षा जास्त वजन नसलेले वजन असते.

वाहनांचा अनेक वर्ग निवडण्यासाठी Ctrl की दाबा आणि धरून ठेवा:

खालील सूचना वाचून उत्तर हो असल्यास Yes वर क्लिक करा.
अर्जदार ड्रायव्हिंग स्कूलमधून प्रशिक्षित आहे का? (कृपया असल्यास निश्चित करा) (Is the applicant trained from Driving School?  (Please Tick if Yes).
आता अर्ज सबमिट करण्यापूर्वी “FORM 1″ वर क्लिक करा आणि Declaration वाचून सबमिट करा.

घोषणा (Declaration):

घोषणा वाचून Yes बॉक्स मध्ये क्लिक करा आणि नंतर Submit बटन वर क्लिक करा.

 1. अपघाती मृत्यू झाल्यास मी माझे अवयव दान करण्यास तयार आहे? (कृपया इच्‍छित असल्‍यास टिक करा).
 2. मी येथे असे जाहीर केले आहे की माझ्या उत्तम ज्ञान आणि विश्वासावर वर दिलेली माहिती खरी आहे – होय/नाही.

सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर अर्ज स्वीकारल्याचा मॅसेज येईल त्यावर Ok वर क्लिक करा. पुन्हा Submit डेटा झाल्याचे दिसेल, तेथे OK बटन वर क्लिक करा, नंतर एक एक्नॉलेजमेन्ट रिसिप्ट आणि खाली विविध फॉर्म PDF फाईल तुम्हाला मिळेल त्या डाऊनलोड करून ठेवा, नंतर नेक्स्ट बटन वर क्लिक करा.

 1. फोटो आणि सहीचा पर्यायामध्ये आधारकार्ड वरील फोटो आपोआप येईल त्यामुळे फोटो अपलोड करण्याची गरज नाही, आपल्याला फक्त सही अपलोड करावी लागणार आहे.
 2.  पेमेंट पर्यायामध्ये पेमेंट करून रिसिफ्ट डाउनलोड करून घ्या.
ऑनलाईन लर्निंग लायसन्स टेस्ट:

एलएल चाचणी सुरू करण्यापूर्वी रस्ता सुरक्षा प्रशिक्षण ऑनलाईन मॉक टेस्ट द्या आणि सॅम्पल प्रश्नपत्रिका वाचा. Learner Licence या मेनू मध्ये मॉक टेस्ट आणि सॅम्पल प्रश्नपत्रिकेचे पर्याय तुम्हाला दिसतील.

अर्जदार त्यांच्या घरातून किंवा कोणत्याही पसंतीच्या ठिकाणी एलएल टेस्ट घेऊ शकतात, आरटीओला भेट देण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट देण्यासाठी मुख्यपृष्ठावर डाव्या बाजूला मुख्य मेनू मध्ये “Learner Licence” या पर्यायामध्ये “Online LL Test (STALL)” या पर्यायावर क्लिक करा.

आता आपल्याला ऑनलाईन एलएल चाचणीसाठी अप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. पासवर्ड आपल्या आधारशी जोडलेल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएस म्हणून पाठविला असेल.

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्सच्या चाचणीसाठी किमान 60 टक्के प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. जे परीक्षेत क्लीअर करतात ते स्वतःच लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स प्रिंट करू शकतात, म्हणजे लोकांना यापुढे वाहन नोंदणी, लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण, डुप्लिकेट आरसी यासारख्या सेवांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) भेट देण्याची गरज भासणार नाही.

हेही वाचा – केंद्र सरकारच्या वाहन 4.0 (Vahan 4.0 Portal) पोर्टलवर RTO च्या विविध सेवांचा घरबसल्या ऑनलाईन लाभ घ्या

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढा फक्त आधार कार्डने, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस – Aadhaar-Based Learning Driving Licence Apply

 • Very good. Public saved from government officials

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.