महाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी योजना

CM Annpurna Yojana : वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’ !

वर्ष २०२४-२५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये सरकारकडून अनेक लोकप्रिय योजनांबाबत घोषणा करण्यात आली,  त्यामध्ये एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना -CM Annpurna Yojana आहे.

या योजनेंतर्गत राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सुमारे 52 लाखांहून अधिक कुटुंबांना दरवर्षी तीन-तीन गॅस सिलिंडर मोफत उलब्ध करून देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय महिलांसाठी सरकारनं इतरही अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्यात लाडकी बहीण सारख्या योजनांचाही प्रामुख्यानं समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे.

या कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’ ! CM Annpurna Yojana:

मुख्यमंत्री अन्नपुर्णा (CM Annpurna Yojana) योजनेची घोषणा करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी ही योजना फायद्याची ठरेल असं सांगितलं. “स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबध असतो.

त्यामुळं महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी त्यांना स्वच्छ इंधन पुरवणे जबाबदारी आहे.” स्वच्छ इंधनासाठी एलपीजीचा वापर हा सर्वात सुरक्षित आहे, त्यामुळं त्याचा वापर वाढणं गरजेचं असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.

त्यासाठी राज्य सरकारडून गॅस सिलिंडर प्रत्येक घराला परवडायला हवा म्हणून, प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली.

या योजनेचा लाभ 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना होणार असल्याचं त्यांनी अर्थसंकल्पात सांगितलं. तसंच ही योजना पर्यावर संरक्षणासाठी सहाय्यभूत ठरेल, असंही ते म्हणाले.

हेही वाचा – घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांचे अधिकार

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.