तलाठी कार्यालय नोंदवह्या

गाव नमुना ८-ब उतारा विषयीची संपूर्ण माहिती

मागील लेखामध्ये आपण गाव नमुना आठ-अ उतारा धारण जमिनींची नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती पाहिली. या लेखामध्ये आपण “गाव नमुना ८ ब उतारा” ‘येणे रकमा व वसुली यांची वार्षिक खातेवही व सर्व दारावबंद बाबींच्या चाचणी ताळेबंदाची नोंदवही’ विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

गाव नमुना ८-ब उतारा:

गाव नमुना ८ ब ही नोंदवही वसुली व ताळेबंद यांच्या लेखांशी ही संबंधित असल्यामुळे अत्यंत महत्वाची नोंदवही आहे. या नोंदवहीत शेतजमिनीवरील वार्षिक जमीन महसूल, बिनशेती जमिनीचा महसूल, संकीर्ण जमीन महसूल यांची मागणी रक्कम व वसुलीची नोंद असते. वसुलीचा कालावधी साधारणतः ऑक्टोबर महिन्यात सुरु होतो, त्यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी गाव नमुना नंबर ८ ब तयार असावा. यात खालील बाबींच्या नोंदी प्रामुख्याने तपासाव्यात.

१. खातेदार निहाय दुमाला (इनाम) जमीन आणि बिनशेती जमीन

२. खातेदार निहाय शेतीवरील महसूल, बिनशेतीवरील महसूल आणि संकीर्ण जमीन महसूल यांची थकबाकी

३. खातेदार निहाय शेतीवरील महसूल, बिनशेतीवरील महसूल आणि संकीर्ण जमीन महसूल यांची चालू मागणी

४. खातेदार निहाय उपरोक्त बाबींची एकूण मागणी

५. खातेदार निहाय वसूल केलेली रक्कम

६. खातेदार निहाय वसुलीचा दिनांक आणि पावती क्रमांक

७. वसूल केलेली रक्कम सरकारी खजिन्यात भरल्याचा चलन क्रमांक व दिनांक

८. खातेदार निहाय जादा वसूल, अधिकृत आणि अनधिकृत थकबाकी

अधिकृत थकबाकी: संकीर्ण जमीन महसुलाच्या नियत तारखेला येणे असलेली तसेच उपविभागीय अधिकाऱ्याने पुढील वर्षी वसुलीसाठी पुढे आणण्यास संमती दिलेल्या थकबाकी रकमा.

अनधिकृत थकबाकी: उपरोक्त वगळून इतर सर्व थकबाकी या अनधिकृत थकबाकी असतात.

( तहकूब रकमांचा जमीन महसुलाच्या थकबाकीत समावेश होत नाही.)

एकूण मागणी: नियत महसूल + संकीर्ण महसूल ( येणे असलेला नियत महसुल माहित असतो म्हणून तो गाव नमुना आठ -अ मधून घेण्यात येतो, संकीर्ण ( चढउतारी ) महसूल गाव नमुना चार मधून घेतला जातो. )

एकत्रित जमीन महसूल: नियत महसूल + संकीर्ण महसूल+ स्थानिक उपकर ( जि.प.;ग्रा.पं )

मक्ता खाते: ज्या व्यक्ती जमीन धारण करीत नसल्यामुळे त्यांना गाव नमुना आठ-अ मध्ये कोणतेही खाते देण्यात आलेले नाही.

चाचणी ताळेबंद: मागणीची बाजू वगळून उरलेला लेखा

जमीन महसूल वसूल केल्यानंतर तलाठी यांनी तात्काळ गाव नमुना नऊची पावती दयावी आणि वसुलीची नोंद गाव नमुना आठ ब मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब मध्ये एकूण ३७ स्तंभ आहेत. ते खालीलप्रमाणे भरावेत.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ १ मध्ये प्रथम गाव नमुना नंबर आठ-अ मधील खातेदारांचे खाते क्रमांक लिहावेत.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ २ मध्ये गाव नमुना नंबर आठ-अ मधील खातेदारांची नावे लिहावीत.

अनेकदा काही खातेदारांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असते. गाव नमुना आठ- ब मध्ये वर्षनिहाय थकबाकी दर्शवायची असते. त्यामुळे स्तंभ क्रमांक २ मध्ये नोंदी घेताना प्रत्येक नोंदीच्या मध्ये ४-५ ओळी रिकाम्या ठेवाव्या. अशाप्रकारे एका पानावर ५-६ नोंदी होतील.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ ३ मध्ये बिनदुमाला जमिनीच्या क्षेत्राची नोंद ( कम आकारी जमिनींसह) हे.- आर मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ ४ मध्ये दुमाला जमिनीच्या क्षेत्राची नोंद हे.- आर मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ ५ मध्ये बिनशेती जमिनीच्या क्षेत्राची नोंद हे.- आर मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ ६ मध्ये इनामदारास महसूल माफ असलेल्या जमिनीच्या नुकसानाची नोंद रु. पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ ७ मध्ये जमीन महसुलाच्या थकबाकीची नोंद रु. -पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ ८-अ मध्ये जिल्हा परिषद स्थानिक उपकर थकबाकीची नोंद रु. -पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ ८-ब मध्ये ग्रामपंचायत स्थानिक उपकर थकबाकीची नोंद रु. -पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ ९ मध्ये बिनदुमाला जमिनीवरील जमीन महसुलाच्या चालू मागणीची नोंद रु. -पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ १०-अ मध्ये बिनदुमाला जमिनीवरील जिल्हा परिषद स्थानिक उपकर चालू मागणीची नोंद रु. -पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ १०-ब मध्ये बिनदुमाला जमिनीवरील ग्रामपंचायत स्थानिक उपकर चालू मागणीची नोंद रु. -पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ ११ मध्ये इनाम जमिनी ( दुमाला ) किंवा करत करात विशेष सवलत दिलेल्या जमिनीवरील जमीन महसुलाच्या चालू मागणीची नोंद रु. -पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ १२-अ मध्ये दुमाला जमिनीवरील जिल्हा परिषद स्थानिक उपकर चालू मागणीची नोंद रु. -पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ १२-ब मध्ये दुमाला जमिनीवरील ग्रामपंचायत स्थानिक उपकर चालू मागणीची नोंद रु. -पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ १३ मध्ये बिनशेतीवरील जमीन महसुलाच्या चालू मागणीची नोंद रु. -पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ १४-अ मध्ये बिनशेतीवरील जिल्हा परिषद स्थानिक उपकर चालू मागणीची नोंद रु. -पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ १४-ब मध्ये बिनशेतीवरील ग्रामपंचायत स्थानिक उपकर चालू मागणीची नोंद रु. -पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ १५ मध्ये संकीर्ण जमीन महसुलाच्या चालू मागणीची नोंद रु. -पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ १६ अ मध्ये संकीर्ण जिल्हा परिषद स्थानिक उपकर चालू मागणीची नोंद रु. -पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ १६ ब मध्ये संकीर्ण ग्रामपंचायत स्थानिक उपकर चालू मागणीची नोंद रु. -पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ १७ मध्ये सर्व प्रकारच्या जमीन महसुलाची एकूण चालू मागणीची नोंद रु. -पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ १८ अ मध्ये सर्व प्रकारच्या जिल्हा परिषद स्थानिक उपकराची एकूण चालू मागणीची नोंद रु. -पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ १८ ब मध्ये सर्व प्रकारच्या ग्रामपंचायत स्थानिक उपकराची एकूण चालू मागणीची नोंद रु. -पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ १९ मध्ये वसुलीबाबत दिलेल्या पावतीचा क्रमांक आणि दिनांक नोंदवावा.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ २० मध्ये वसूल केलेल्या जमीन महसुलाची नोंद रु.-पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ २१-अ मध्ये वसूल केलेल्या जिल्हा परिषद स्थानिक उपकराची नोंद रु. -पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ २१-ब मध्ये वसूल केलेल्या ग्रामपंचायत स्थानिक उपकराची नोंद रु. -पै. मध्ये करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ २२, २३-अ आणि २३-ब मधील जमीन महसूल, जिल्हा परिषद स्थानिक उपकराची आणि ग्रामपंचायत स्थानिक उपकराची अनधिकृत बाकीची माहिती वर्षाच्या शेवटी भरावी, यामध्ये महसूल वर्षाच्या शेवटी संबंधित खातेदाराकडे असलेली मागणी, वसूल झालेली रक्कम, शासनाने जर शेतसारा माफी किंवा सूट जाहीर केली असेल तर ती वगळता खातेदाराकडे असलेली अनधिकृत थकबाकीची नोंद घ्यावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ २४, २५ अ आणि २५ ब मधील जमीन महसूल, जिल्हा परिषद स्थानिक उपकराची आणि ग्रामपंचायत स्थानिक उपकराची जादा वसुली किंवा पुढील वर्षाकरिता वसुलीची माहिती वर्षाच्या शेवटी भरावी, यामध्ये खातेदाराकडून मागील वर्षी केलेला आगाऊ वसूल वजा करून तो खात्यात मुरविण्यात यावा व त्यानंतर जादा वसुली करण्यात आली असेल तर त्याची नोंद घ्यावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ २६ मध्ये वसूल केलेली रक्कम ज्या दिनांकास शासकीय खजिन्यास भरली त्या दिनांकाची नोंद करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ २७ मध्ये वसूल केलेली रक्कम ज्या चलनाने शासकीय खजिन्यास भरली त्या चलन क्रमांकाची नोंद करावी.

गाव नमुना आठ- ब- स्तंभ २८ हा शेरा स्तंभ आहे.

गाव नमुना आठ- ब मधील स्तंभ १ ते १८ ब मधील माहिती सप्टेंबर महिन्याच्या शेवटी तयार असल्यास आणि वसुलीची माहिती गाव नमुना आठ- ब मधील उचित रकान्यात वेळच्या वेळी नोंदवली असल्यास, ३१ जुलै रोजी स्तंभ २२ ते २५ ब पूर्ण करून गाव नमुना नंबर आठ-ब बंद करता येईल व नवीन वर्षाच्या एक ऑगस्टला थकबाकीदार खातेदारांची नावे तहसिलदाराला कळवता येतील.

हेही वाचा – तलाठी कार्यालयातील – गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.