धनगर समाजातील लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना
धनगर समाजातील लाभार्थ्यांकरीता घरकुल योजना राबविण्यात येते.राज्यातील भटक्या जमाती-क तथा धनगर समाजाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात व्यास्तव्यास असलेल्या भटक्या जमाती-क तथा धनगर समाजासाठी संपूर्ण राज्यात 10 हजार घरे बांधून देण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित केले आहे.या योजनेंतर्गत जिल्हयात ग्रामीण भागात व्यास्तव्यास असलेल्या भटक्या जमाती-क तथा धनगर समाजासाठी घरकुल योजना सहाय्यक संचालक,इतर मागास बहूजन मागास विभागाच्या वतीने राबविण्यात येते.या योजनेंतर्गत लाभार्थ्यास घर बांधण्यासाठी 1 लक्ष 20 हजार रुपये अनुदान देण्यात येते.
घरकुल योजना लाभार्थी :
- यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. (अधिवास प्रमाणपत्र),
- लाभार्थी भटक्या जमाती क तथा धनगर समाजाचा असावा. (जात प्रमाणपत्र),
- लाभार्थ्यांचे उत्पन्न 1 लक्ष 20 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे (उत्पन्न प्रमाणपत्र),
- लाभार्थी भूमिहीन / अल्पभुधारक असावा (सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र),
- लाभार्थ्यांने यापूर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतला नसावा.
- लाभार्थ्यांच्या नावे कमीत कमी 30 चौ.मी. जागा असणे आवश्यक. (नमुना आठ अ)
या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या व योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करावा.अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क करुन अर्ज सादर करावा. या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.
हेही वाचा – शबरी आदिवासी घरकुल योजना २०२३ – २४ – Shabari Adivasi Gharkul Scheme
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!