सारथी मार्फत मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण
राज्यातील लक्षित गटातील शेतकरी /युवक/युवती यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे प्रायोजित महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेमार्फ़त ड्रोन पायलट प्रशिक्षण (Drone Pilot Training) देणेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे अन्वये सारथी संचालक मंडळाच्या बैठकीतील मान्य ठरावानुसार राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजातील शेतकरी / युवक/युवती यांना सारथी संस्थेच्या खर्चाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेमार्फ़त मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कृषीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढविणेकरिता केंद्र व राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहनात्मक अनुदान देत आहे. ड्रोनव्दारे विविध खरिप, रब्बी, फळपिके तसेच भाजीपाला पिकावर किटकनाशकाची फवारणी सुलभरित्या करता येते. मात्र, योग्यरित्या ड्रोन चालवू (ऑपरेट करु) शकतील, असे प्रशिक्षित मनुष्यबळ देखील पुरेशा प्रमाणात आज उपलब्ध नाही. शेती क्षेत्रातील लक्षित गटातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
सारथी मार्फत मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण – Drone Pilot Training:
सारथीकडे ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी निधीची तरतूद असून अशी प्रशिक्षणे महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहूरी अंतर्गत स्थापित झालेल्या रिमोट पायलट प्रशिक्षण केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेली आहेत. सदर केंद्राने सारथी संस्थेशी सामजस्य करार करुन लक्षित गटातील युवकांसाठी/ सदस्यांकरिता अशी प्रशिक्षणे देण्यास सहमती दर्शविलेली आहे.
याकरिता ७ दिवसाचे प्रशिक्षण असून या मध्ये ५ दिवस ड्रोन पायलटींग व २ दिवस फवारणी करणेचे प्रशिक्षण व अनुभव याचा समावेश आहे. प्रत्येक महिन्यामध्ये सदर केंद्रावर ७ दिवसाच्या १० प्रशिक्षणार्थीच्या ४ बॅचेस घेण्यास संबधित केंद्राने मान्यता दर्शिवलेली आहे.
योजनेचा उद्देश : सारथी लक्षित गटातील सदस्यांकरिता महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत DGCA मान्यता प्राप्त आरपीटीओ केंद्रामध्ये ड्रोन पायलट प्रशिक्षण देणे.
प्रशिक्षणासाठी पात्रता निकष :
१. प्रशिक्षणार्थी लाभार्थीचे वय १८ ते ४० वर्षे असावे.
२. लाभार्थी कृषी पदवीधर अथवा कृषी पदविका धारक असावा. मात्र असे लाभार्थी अर्ज न आल्यास अन्य विषयांचे पदवीधरांचा विचार करण्यात येईल.
३. मागील ३ वर्षाचे वार्षीक उत्पन्न हे र. रु. ८.०० लाखापेक्षा जास्त नसावे अथवा सक्षम प्राधिका-यांचे आर्थिक दुर्बल प्रमाणपत्र (EWS) असावे.
४. प्रशिक्षणार्थी लाभार्थीकडे वैध पासपोर्ट असावा.
५. वैद्यकीय योग्यता (फिटनेस) प्रमाणपत्र असावे
६. शेतकरी कुटुंबातील सदस्यास प्राधान्य दिले जाईल.
अर्ज प्रक्रिया : प्रशिक्षणासाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ड्रोन प्रशिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी यांच्याकडे देखील रितसर ऑनलाईन अर्ज करावा.
प्रशिक्षण कालावधी : एकूण ७ दिवस
प्रशिक्षणार्थी निवड : सारथी मार्फत प्राप्त अर्जापैकी प्रति सप्ताह १० या प्रमाणे दरमहा ४० प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. प्रथम टप्यात प्रत्येक जिल्ह्यातून १० प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणे देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणाचे ठिकाण : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी कॅम्पस.
पुढील लेख देखील वाचा!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!