PM-KISAN : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) मध्ये शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचे ३ हप्ते मिळतात. या PM-Kisan योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास नोंदणी करणं आवश्यक आहे.

आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहे, या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आपल्या बँक खात्यात जमा झाला आहे की नाही, हे कसं बघायचं, इतकंच नाही तर आधार कार्ड संबंधित माहितीत दुरुस्ती कशी करायची, याची माहिती जाणून घेणार आहोत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहे ते पाहूया?

पीएम किसान (PM- Kisan) म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली. या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांचा आर्थिक मदत दिली जाते. या योजनेसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात. भारत सरकारनं सुरुवातीला 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला होता. पण, नंतर या योजनेची व्याप्ती वाढवून सगळ्याच शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याचा विचार न करता सगळ्याच शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आलं. PM-Kisan योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 4 महिन्यांच्या अंतरानं दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी नाव नोंदवायचं असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना 3 पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

  1. या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्रं गावातील तलाठी कार्यालयात जमा करू शकतो. यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स लागते.
  2. CSC म्हणजेच कॉमन सव्हिस सेंटरही शेतकरी नावाची नोंदणी करू शकतो. मात्र इथं नोंदणी करायची असल्यास त्यासाठी ठरावीक शुल्क आकारलं जातं.
  3. शेतकरी स्वत: PM-Kisan पोर्टलवर जाऊन नाव नोंदणी करू शकतात. तसंच त्यांच्या माहितीत बदलही करू शकतात.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची ऑनलाईन नोंदणी कशी करायची?

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला “PM-Kisan Samman Nidhi” वेबसाईट जावे लागेल, त्यासाठी खालील वेबसाईट लिंक ओपन करा.

https://pmkisan.gov.in/

“PM-Kisan Samman Nidhi” ची वेबसाईट ओपन झाल्यावर प्रथम वरती “Select Language” मध्ये आपली मराठी भाषा निवडा.

त्यानंतर उजवीकडे तुम्हाला “Farmers Corner” हा पर्याय दिसेल. त्यामध्ये 7 पर्याय तुमच्यासमोर दिसतील. त्यातील पहिलाच पर्याय आहे “नवीन शेतकरी नोंदणी” या पर्यायावर क्लिक करा.

नवीन शेतकरी नोंदणी
नवीन शेतकरी नोंदणी

या पर्यायावर क्लिक केलं की “नवीन शेतकरी नोंदणी फॉर्म” नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये प्रथम वरती “Select Language” मध्ये आपली मराठी भाषा निवडा.

पुढे तुम्हाला ग्रामीण आणि शहरी भागानुसार “Rural Farmer Registration” आणि  “Urban Farmer Registration” निवडा, तसेच आधार क्रमांक, Captcha (टेक्स्ट), आपले राज्य निवडा आणि “शोध” बटन वर क्लिक करा.

नवीन शेतकरी नोंदणी फॉर्म
नवीन शेतकरी नोंदणी फॉर्म

शोध वर क्लिक केलं की Record not found with given details असा मेसेज स्क्रीनवर येईल. याचा अर्थ तुमच्या आधार क्रमांकाची या योजनेसाठी यापूर्वी नोंदणी झालेली नाही. तुम्हाला या मेसेजखाली असलेल्या ओके या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुम्हाला “Record not found with given details. Do you want to register on PM-Kisan Portal?” असा मेसेज स्क्रीनवर दिसेल. याचा अर्थ तुम्ही नोंदवलेल्या आधार क्रमांकाचा कोणताही रेकॉर्ड आमच्याकडे जमा नाही, तुम्हाला PM-Kisan योजनेसाठी नाव नोंदवायचं आहे का, असा होतो.

त्यानंतर एक रेजिस्ट्रेशन फॉर्म तुमध्ये सुरुवातीला शेतकऱ्याला वैयक्तिक माहिती भरायची आहे. तसेच state म्हणजे राज्य निवडायचं आहे, त्यानंतर district म्हणजे जिल्हा निवडायचा आहे. पुढे sub-district आणि block या दोन्ही ठिकाणी तुमच्या तालुक्याचं नाव निवडायचं आहे. आणि मग गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे.

त्याखाली Farmer Name म्हणजे शेतकऱ्याचं नाव लिहायचं आहे. इथं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आधार कार्डवर तुमच्या नावाची स्पेलिंग जशी लिहिलेली असते, एकदम तंतोतंत तशीच स्पेलिंग इथं नाव टाकताना लिहायची आहे. एक जरी इंग्रजी शब्द इकडे तिकडे झाला, तर तुमचा फॉर्म पूर्ण होऊ शकत नाही. पुढे लिंग निवडायचं आहे (मेल, फिमेल की अदर्स) आणि मग तुम्ही कोणत्या प्रवर्गात मोडता (जनरल, एससी, एसटी की इतर) ते निवडायचं आहे.

त्यानंतर फार्मर टाईप मध्ये शेतकऱ्याचा प्रकार निवडायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे 1 ते 2 हेक्टरदरम्यान शेती असेल तर तुम्हाला पहिल्या पर्यायावर क्लिक करायचं आहे, जास्त असेल तर अदर या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

आपण नोंदणीसाठी आधार क्रमांक दिलेला असल्यामुळे एक Identity proof number आपोआप जनरेट होतो.
आता पुढे तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती भरायची आहे. यामध्ये बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे. हा कोड तुमच्या पासबुकवर दिलेला असतो. त्यानंतर बँकेचं नाव टाकायचं आहे आणि मग खाते क्रमांक टाकायचा आहे.

त्यानंतर पत्ता टाकून झाला की, तुम्हाला Submit for Adhar authentication या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
या पर्यायावर क्लिक केलं, की “Yes, Aadhar Authenticated Succesfully” असा लाल अक्षरात मेजेस तिथं येतो. याचा अर्थ तुमचं आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या झालं आहे.

यानंतर Farmers other details मध्ये शेतकऱ्याविषयीची इतर माहिती भरायची आहे. यात मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि आई किंवा वडिलांचं नाव लिहायचं आहे.

त्यानंतर Land Holding मध्ये जमिनीच्या मालकीचा प्रकार सांगायचा आहे. यात स्वत: एकट्याच्या मालकीची जमीन असेल, तर single या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आणि सामूहिक मालकीची शेतजमीन असेल तर joint या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर Add या पर्यायावर क्लिक करून शेतजमिनीची माहिती सांगायची आहे.

आता इथं तुम्हाला सर्व्हे किंवा खाता नंबरमध्ये सातबाऱ्यावरील आठ-अ चा जो खाते क्रमांक आहे, तो टाकायचा आहे.

त्यानंतर खासरा किंवा डॅगमध्ये सातबाऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तुमच्याकडे किती शेतजमीन आहे, ते हेक्टरमध्ये लिहायचं आहे. सातबाऱ्यावर जितकी जमीन नोंदवलेली आहे, तो आकडा इथं टाकायचा आहे. हे टाकून Add बटन दाबलं की तुमच्या माहितीची तिथं नोंद केली जाते.

आता एखाद्या शेतकऱ्याची शेतजमीन वेगवेगळ्या गट क्रमांक आणि खाते क्रमांकामध्ये विभागलेली असू शकते. त्यामुळे तुम्ही पुन्हा Add या पर्यायावर क्लिक करून ती माहिती देखील भरू शकता.

ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर “[X]I certify that all the given details are correct” याचा अर्थ मी दिलेली सगळी माहिती खरी आहे, या पर्यायासमोरच्या डब्ब्यात टीक करायचं आहे

त्यानंतर तुम्ही Self -Declaration Form* वर क्लिक करून तिथं दिलेली माहिती वाचू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, करदाते नाही याबद्दलची माहिती त्यात दिलेली असते.
सगळ्यात शेवटी सेव्ह या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर स्क्रीनवर एक मेसेज येईल. त्यावर लिहिलेलं असेल की, *****हा तुमचा identity proof number आहे आणि तुम्ही यशस्वीरित्या नोंदणी केली आहे. पुढील मंजूरीसाठी ही माहिती राज्य सरकारकडे पाठवली जाईल. ही माहिती समाधानकारक असेल, तर योजनेसाठी तुमचा विचार केला जाईल, अन्यथा तुमचा अर्ज नाकारला जाईल.

एकदा फॉर्म भरून झाला की काही दिवसांच्या अंतरानं तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहू शकता.

नोट: आता नवीन पीएम किसान सन्मान निधीचा फॉर्म भरल्यानंतर जिल्ह्याधिकाऱ्याकडून एक रजिस्टर मोबाईल वर खालील मॅसेज येईल त्यानंतर तहसीलदार कार्यालयात खालील कागदपत्रे जमा करा.

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • सातबारा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करताना काही अडचण आल्यास तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयात ऑफलाईन नोंदणी करा.

हेही वाचा – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021 च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

One thought on “PM-KISAN : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर

  • July 20, 2021 at 7:59 pm
    Permalink

    Very good lines.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!