नोकरी भरतीवृत्त विशेष

भारतीय सैन्य भरती – Indian Army ZRO Pune Agniveer Recruitment Rally 2024

भारतीय लष्कराने 13 फेब्रुवारी 24 ते 22 मार्च 24 या कालावधीत अग्निवीर आणि नियमित केडरच्या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातील आणि दमण, दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील उमेदवार भारतीय लष्कराच्या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करू शकतात.

संकेतस्थळाच्या JCO/OR/Agniveer नावनोंदणी विभागात हिंदी आणि इंग्रजीमध्ये व्हिडिओसह पात्रता, नोंदणी प्रक्रिया उपलब्ध आहे. अर्जदारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी वापरकर्ता अनुकूल चॅटबॉट देखील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षेदरम्यान खेळाडू, एनसीसी प्रमाणपत्र धारक, आयटीआय आणि पदविका धारकांना अतिरिक्त गुण दिले जातील. ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षेत ऑफिस असिस्टंट/एसकेटी श्रेणीसाठी प्रथमच टंकलेखन चाचणी देखील सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांनी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात दलाल आणि फसवणूक करणाऱ्यांना बळी न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणत्याही शंका आणि स्पष्टीकरणासाठी, अर्जदार जवळच्या सैन्य भरती कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.

तरुणांसाठी राष्ट्रीय सुरक्षेसाठी योगदान देण्याची, मौल्यवान कौशल्ये विकसित करण्याची आणि शौर्य आणि अभिमानाचा वारसा असलेल्या प्रतिष्ठित संस्थेचा भाग होण्याची ही सुवर्णसंधी आहे.

भारतीय सैन्य भरती – Indian Army ZRO Pune Agniveer Recruitment Rally 2024

>

एकूण : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

सहभागी राज्य: महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली राज्य

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र. पदाचे नाव
1 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)
2 सिपॉय फार्मा

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & English)
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm.

शारीरिक पात्रता:

पद क्र. पदाचे नाव उंची (सेमी) वजन (KG) छाती (सेमी)
1 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) 167 50 77/82
2 सिपॉय फार्मा 167 77/82

वयाची अट:

  1. पद क्र.1: जन्म 01 ऑक्टोबर 2001 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान.
  2. पद क्र.2: जन्म 01 ऑक्टोबर1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: ₹250/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मार्च 2024

भरती प्रक्रिया: 

  1. टप्पा I: परीक्षा (ऑनलाईन): 22 एप्रिल 2024 पासून
  2. टप्पा II: भरती मेळावा

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

जाहिरात (Notification): 

पद क्र.1: जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पद क्र.2: जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 120 जागांसाठी भरती – UPSC Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.