काजू कलम वाटप योजना 2026: ऑनलाइन अर्ज, पात्रता व संपूर्ण माहिती!
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य शासन विविध फलोत्पादन योजनांची अंमलबजावणी करत आहे. त्यापैकी काजू कलम वाटप योजना (Kaju Kalam Vatap Yojana 2026) ही महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दर्जेदार काजू कलमे उपलब्ध करून दिली जातात, ज्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्य होते.
जर तुम्ही तुमच्या शेतात काजूची लागवड करण्याचा विचार करत असाल, तर काजू कलम वाटप योजना (Kaju Kalam Vatap Yojana 2026) तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या लेखात योजनेचा उद्देश, पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि महाडीबीटी पोर्टलवरील ऑनलाइन अर्जाची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊया.
काजू कलम वाटप योजना – Kaju Kalam Vatap Yojana 2026:
काजू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदानित किंवा शासनाच्या निकषांनुसार दर्जेदार काजू कलमे उपलब्ध करून देण्याची योजना म्हणजे काजू कलम वाटप योजना (Kaju Kalam Vatap Yojana 2026) होय.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवड करून दीर्घकालीन उत्पन्नाचे साधन निर्माण करणे.
योजनेची उद्दिष्टे:
या योजनेमागील प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत.
- दर्जेदार काजू कलमे उपलब्ध करून देणे.
- फलोत्पादन क्षेत्रात वाढ करणे.
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.
- कोकणासह इतर भागांमध्ये काजू लागवडीस चालना देणे.
- निर्यातक्षम काजू उत्पादन वाढवणे.
- आधुनिक शेतीला प्रोत्साहन देणे.
काजू लागवडीचे फायदे:
काजू हे दीर्घकाळ उत्पन्न देणारे पीक आहे.
मुख्य फायदे:
- कमी देखभालीत चांगले उत्पादन.
- दीर्घकालीन आर्थिक फायदा.
- काजू बोंड व काजूगर दोन्हीचा उपयोग.
- निर्यातीस मोठी मागणी.
- प्रक्रिया उद्योगांना चालना.
कोण अर्ज करू शकतो?
काजू कलम वाटप योजना (Kaju Kalam Vatap Yojana 2026) अंतर्गत अर्ज करण्यासाठी सामान्यतः पुढील पात्रता लागू असते.
- अर्जदार महाराष्ट्रातील शेतकरी असावा.
- स्वतःच्या नावावर शेती असावी किंवा आवश्यक परवानगी असावी.
- आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असावा.
- महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केलेली असावी.
- शासनाने निश्चित केलेल्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
अर्ज करताना पुढील कागदपत्रे तयार ठेवा.
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- ८-अ उतारा (लागू असल्यास)
- आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक
- बँक पासबुक
- हमीपत्र (योजनेनुसार)
- इतर आवश्यक कागदपत्रे
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना संबंधित हमीपत्र अपलोड करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
काजू कलम वाटप योजना (Kaju Kalam Vatap Yojana 2026) अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.
शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
“वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा.
ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व हा नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल.
अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.
पुढे अर्ज करा अशी लिंक शोधून त्यावर क्लिक करा. फलोत्पादन या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.

आता एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये फलोत्पादन या मुख्य घटकाखाली घटक प्रकारामध्ये मध्ये इतर घटक निवडा व पुढे बाब मध्ये काजू कलम वाटप निवडा, तसेच योजनेमध्ये काजू कलम वाटप योजना निवडा.

अर्जा मध्ये हमीपत्र अपलोड करून जतन करा बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.
अप्लिकेशन सबमिट केल्यावर ते सबमिशनच्या पुष्टीकरणासाठी पॉप अप संदेश दर्शवितो. “ओके” बटणावर क्लिक केल्यावर ते पेमेंट वर पुनर्निर्देशित होईल जिथे अर्जदार पैसे भरण्यास सक्षम असेल.
मेक पेमेंट बटणावर क्लिक केल्यास ते पेमेंट गेटवे पोर्टलकडे पुनर्निर्देशित होईल. पेमेंट केल्यानंतर अर्जदार पेमेंट पावतीची प्रिंट आउट घेऊ शकतो.
अर्जाचे स्टेटस पहा (Kaju Kalam Vatap Yojana 2026 Application Status):
महा डीबीटीवर अर्ज सादर केल्यानंतर शासनाच्या वतीने दर हफ्त्याला लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातात यामध्ये जर तुमच्या अर्जाची निवड झाली तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल त्यानुसार कागदपत्रे अपलोड करून द्या.
तुम्हाला जर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती बघायची असेल म्हणजेच अर्जाचे स्टेट्स बघायचे असेल तर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा.
छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाचे तपशील दिसेल. अर्जाची पोहोच पावती देखील तुम्ही डाउनलोड करू शकता.
अशा पद्धतीने तुम्ही काजू कलम वाटप योजनेसाठी (Kaju Kalam Vatap Yojana 2026) अर्ज सादर करू शकता. याबाबत अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
महाडीबीटी शेतकरी मोबाईल अॅप: महाडीबीटी शेतकरी अॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
शेतकरी योजना वापरकर्ता पुस्तिका: शेतकरी योजना वापरकर्ता पुस्तिका पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800
या लेखात, आम्ही काजू कलम वाटप योजना (Kaju Kalam Vatap Yojana 2026) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- सर्व शेतकरी योजना आता “महाडीबीटी शेतकरी मोबाईल अॅप” वर – MahaDBT Farmer App
- शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme
- महाडीबीटी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन डाउनलोड करा ! MahaDBT Yojana Beneficiary List Download Online!
- महाडीबीटी पोर्टल वरील योजना प्रभावीपणे राबविणेबाबत परिपत्रक जारी – MahaDBT Portal Schemes.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

