कृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

महाडीबीटी पोर्टल वरील योजना प्रभावीपणे राबविणेबाबत परिपत्रक जारी – MahaDBT Portal Schemes

महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास २० कृषि विषयक योजनांचा लाभ महाडिबीटी पोर्टलद्वारे थेट शेतक-यांना देण्यात येत आहे. पोर्टल युजर फ्रेंडली होण्याच्या दृष्टीने पोर्टलवर वेळोवेळी सुधारणा करण्यात येते. सदर योजना प्रभावीपणे राबविण्याचा दृष्टीने खालील प्रमाणे काटेकोरपणे कार्यवाही करावी यासाठी परिपत्रक जारी केले आहे.

A) आधार क्रमांक:

१) आधारच्या बाबतीत एका व्यक्तीच्या या प्रोफाईलला एकच आधार कार्ड जोडणे आवश्यक असल्यामुळे मल्टिपल नॉन आधार प्रोफाइल असल्यास व लॉटरी लागली नसल्यास तर लाभार्थ्याने एकच प्रोफाइल निवडून बाकीचे डिलीट करण्याची रिक्वेस्ट लाभार्थ्यांकडून घ्यावी व हेल्पडेस्कला कळवावे.

२) मल्टिपल प्रोफाईल असल्यास व निवड झाली असल्यास एकच प्रोफाइल निवडून इतर प्रोफाइल डिलीट करण्याची रिक्वेस्ट घ्यावी व हेल्पडेस्कला कळवावे.

३) मल्टिपल ठिकाणी निवड झाली असल्यास लाभार्थ्याने कुठल्या घटकाचा लाभ घ्यावयाचे आहे ते ठरवावे व बाकी प्रोफाइल डिलीट करण्याची रिक्वेस्ट कार्यालयास द्यावी व हेल्पडेस्कला कळवावे.

४.मल्टिपल ठिकाणी निवड झाली असेल व एका आधारबेस्डच्या प्रोफाईला जर कंपोनेटच्या लाभ घेतला असेल तर इतर प्रोफाईल आपोआप डिलीट होतील याची लाभार्थ्यांना कल्पना द्यावी.

B) Revoke:

महाडीबीटी पोर्टलवर अनुदान परिगणना पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी, तसेच जिल्हा परिषदेच्या बाबतीत कृषी अधिकारी गटविकास अधिकारी व कृषी विकास अधिकारी अशी त्रिस्तरीय संरचना असून देखील असे निदर्शनास येते की ब-याच ठिकाणी अनुदान परिगणना चुकीची झाली आहे.

सदर बाबतीत सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांना सूचित करण्यात यावे की त्यांनी काळजीपूर्वक परिगणना करावी व ज्या त्या लॉगीनला त्याच अधिकारी कर्मचारी यांनी लॉगइन करावे व असे न झाल्यास व परिगणना चुकीची झाल्यास संबंधित लॉगिन असणाऱ्या अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करावी अथवा शेतकऱ्याचे नुकसान त्यांचेकडून वसूल करण्यात यावे.

C) बॅक खाते:

बँक खात्याचा कुठल्याही कारणामुळे तपशील बदललेला असल्यास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचेकडून पेमेंट फेल केले जाते व नवीन अकाउंट तयार झाल्यावर जनरेट करतात, त्याकरिता असा तपशील बदलला असल्यास यास व नव्याने फाइल जनरेट करून पाहिजे असल्यास संबंधित जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रथम ती फाईल डिलीट करावी व लाभार्थ्याला त्याचा तपशील अपडेट करण्यास सांगावे.

लाभार्थ्याने तपशील अपडेट केल्यावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी महाआयटीला फाईल जनरेट करण्याची विनंती करावी सोबतच फेल केलेल्या फाईलची यादी देखील पाठवावी.

सदर बाबींचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे महाडीबीटीच्या परिपत्रका मध्ये नमूद केले आहे.

महाडीबीटी परिपत्रक: महाडीबीटी पोर्टल वरील योजना प्रभावीपणे राबविणेबाबत परिपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – सर्व शेतकरी योजना आता “महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप” वर – MahaDBT Farmer App

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.