सरकारी योजनाउद्योग उर्जा व कामगार विभागमहाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेष

कुसुम सौर कृषीपंप योजने अंतर्गत महावितरण देणार 2 लाख सोलर पंप, शासन निर्णय जारी !

शासनाने नव्याने मंजुर केलेल्या १,००,००० पारेषण विरहित सौर कृषीपंप स्टेट नोडल एजन्सी (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण) मार्फत महावितरण कंपनीकडून राज्यातील मागणी नोंदविलेल्या प्रलंबित कृषीपंप विद्युत जोडण्यांच्या पुर्ततेसाठी (Paid Pending) आस्थापित करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असे नमुद होते. त्याऐवजी ते खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.

केंद्र शासनाने दि. ३०.०८.२०२२ च्या व दि. १९.०१.२०२४ च्या केंद्र शासनाच्या आदेशान्वये महावितरण कंपनीस मंजूर केलेल्या २,००,००० पारेषण विरहित सौर कृषीपंप राज्यातील मागणी नोंदविलेल्या प्रलंबित कृषीपंप विद्युत जोडण्यांच्या पुर्ततेसाठी (Paid Pending) आणि पीएम कुसुम घटक-ब योजनेच्या पोर्टलवर शेतकन्यांकडून आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जातून ज्येष्ठतेनुसार आणि योजनेच्या निकषानुसार महावितरण कंपनी कडून आस्थापित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर दि. ९ जानेवारी, २०२३ च्या शासन निर्णयातील अनुक्रमांक-४ नंतर खालीलप्रमाणे अनुक्रमांक समाविष्ट करण्यात येत आहेत:-

  • महाऊर्जान पीएम-कुसुम घटक-ब साठीच्या पोर्टलवर महावितरण कंपनीस तातडीने Access देण्यात येईल.
  • सदर पोर्टलवर अर्जदारांची एकच ज्येष्ठतासूची राहील,
  • सदर ज्येष्ठता सूचीनुसारच महाऊर्जा व महावितरण कंपनी यांनी अर्जदारांची सौर कृषीपंप वाटप करण्यासाठी निवड करण्यात येईल.
  • त्यानुसार पोर्टलमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदल तातडीने करण्यात येतील.
  • सौर कृषीपंप आस्थापित केलेल्या लाभार्थी शेतकन्यांना सदर सौर कृषीपंपाची विक्री अथवा हस्तांतरण करण्यास बंदी राहील.

लाभार्थी शेतकऱ्यांनी अशा सौर कृषीपंपांची विक्री अथवा हस्तांतरण केल्यास त्यांचेविरुध्द महाऊर्जा/महावितरण कंपनी यांचेद्वारे गुन्हा दाखल करण्यात येईल.

>

उद्योग, उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय: राज्यातील यंत्रमाग ग्राहकांना वीज दरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना द्यावयाचे अर्थसहाय्य (रोखीने) सन 2023-24. (लेखाशिर्ष -28015581) बाबत शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी सुरु – Kusum Solar Pump Yojana Online Registration

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.