मार्जिन मनी योजना : उद्योगांसाठी १० टक्के तुम्ही उभारा; ७५ टक्के व १५ टक्के सबसिडी ! – Margin Money Scheme
केंद्र शासनाच्या ‘स्टँडअप’ योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लाभार्थ्यांसाठी ‘मार्जिन मनी योजना राबविली जाते. मार्जिन मनी योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टैंडअप इंडिया योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित १५ टक्के सबसिडी राज्य शासनामार्फत देण्यात येते.
मार्जिन मनी योजना : उद्योगाच्या स्टार्टअपसाठी उपक्रम – Margin Money Scheme:
स्टैंडअप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकातील लाभार्थ्यांसाठी मार्जिन मनी योजना ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आली आहे. इच्छुक लाभार्थ्यांना बँकेच्या शिफारस व कागदपत्रासह अर्ज सादर करावा लागतो.
मार्जिन मनी स्टँड अप इंडिया कोणासाठी ?
अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांमधील नव उद्योजकांना उभारी देण्यासाठी मार्जिन मनी योजना’ राबविली जाते. बेरोजगार तरुणासाठी योजना सुरु करण्यात आली आहे.
१५ टक्के सबसिडी:
“अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित १५ टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येते.
योजनेच्या लाभाचे आवाहन
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा. या योजनेचा नवउद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेचे निकष:
- उमेदवार हा अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजक असावा,
- जातीचा दाखला,
- व्हॅलिडीटी प्रमाणपत्र,
- तीन वर्षांचे आयकर विवरणपत्र,
- हमीपत्र,
- उद्योगाची वर्कऑर्डर,
- बँक खाते.
१० टक्के निधी उभारा:
स्टैंडअप इंडिया योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित १५ टक्के सबसिडी राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. फक्त १० टक्के रक्कम लाभार्थ्यांना भरावी लागेल.
योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यलयात संपर्क करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!