आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी योजनासामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

विशेष सहाय्य योजनेचे पैसे आलेत का? आता घरी बसून ऑनलाईन चेक करा!

या लेखात आपण विशेष सहाय्य योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाची स्टेटस (Special Assistance Beneficiary Status) माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून कशी पाहायची, याची सविस्तर प्रक्रिया पाहणार आहोत. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत राज्यातील गरजू, अपंग, वृद्ध, अनाथ, विधवा, परित्यक्ता, वंचित घटकांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महत्त्वाची आर्थिक मदतीची योजना आहे. यामध्ये दरमहा नियमित अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केलं जातं. पण हे पैसे आपल्या खात्यात आलेत की नाही, याची खात्री कशी करायची, असा प्रश्न अनेक लाभार्थ्यांना सतत सतावतो. याचे उत्तर म्हणजे – ऑनलाईन (Special Assistance Beneficiary Status) स्टेट्स तपासण्याची सुविधा, जी घरबसल्या उपलब्ध आहे.

विशेष सहाय्य योजना – Special Assistance Yojana:

ऑनलाईन स्टेट्स तपासण्याची संपूर्ण प्रक्रिया – Special Assistance Beneficiary Status:

विशेष सहाय्य योजनेच्या अनुदानाचे (Special Assistance Beneficiary Status) स्टेट्स ऑनलाईन स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम खालील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत पोर्टल लिंकवर क्लिक करा किंवा तुमच्या मोबाईल/लॅपटॉपच्या ब्राउझरमध्ये टाइप करा.

https://sas.mahait.org

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाईट उघडल्यानंतर, लाभार्थी स्थिती (SGNAY Beneficiary Status) या पर्यायावर क्लिक करा.

(Special Assistance Beneficiary Status)
(Special Assistance Beneficiary Status)

आधार क्रमांक टाका:

  • आता लाभार्थी स्थितीचे नवीन विंडो उघडेल.

  • येथे तुमचा आधार क्रमांक टाका.

  • कॅप्चा कोड भरून Get Mobile OTP वर क्लिक करा.

(Special Assistance Beneficiary Status)
Special Assistance Beneficiary Status

मोबाईल OTP प्रविष्ट करा.

  • तुमच्या आधार लिंक्ड मोबाईलवर OTP येईल.

  • तो OTP टाकून पुढे जा.

  • जर OTP येत नसेल तर तुमचं आधार रजिस्ट्रेशन अद्याप ऑनलाइन झालेलं नाही. अशा वेळी जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन करून घ्यावी लागेल.

  • OTP टाकल्यानंतर Get Data या बटणावर क्लिक करा.

पुढे यशस्वीरित्या लॉगिन झाल्यानंतर खालीलप्रमाणे माहिती स्क्रीनवर दिसेल:

  • नाव

  • आधार क्रमांक

  • पत्ता

  • तालुका, जिल्हा, ग्रामपंचायत

  • कोणत्या योजनेअंतर्गत लाभ मिळतो

  • कोणत्या Financial Year मध्ये अनुदान मिळाले

  • कधी, किती रक्कम, आणि कोणत्या खात्यात जमा झाली

महत्त्वाच्या सूचना

  • मोबाईलवर प्रक्रिया करताना “Desktop Site” मोड वापरणे आवश्यक आहे.

  • लाभाची स्थिती बघताना आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.

  • OTP येत नसल्यास आधार अपडेटसाठी अधिकृत केंद्रावर संपर्क साधा.

योजनेचा लाभ वेळेवर मिळतो का?

सामान्यतः दर महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीस अनुदान खात्यात जमा होतं. कधी कधी प्रशासकीय कारणास्तव उशीर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही वरील पद्धतीने वेळोवेळी स्टेट्स (Special Assistance Beneficiary Status)तपासत राहणं फायदेशीर ठरेल.

योजनेबाबत संपर्क:

  • तुमच्या तहसील कार्यालयाशी संपर्क करा.

  • सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधा.

विशेष सहाय्य निराधार अनुदान ही गरजूंना दिलासा देणारी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेंतर्गत अनुदान मिळालं का? किती आणि केव्हा? हे जाणून घेण्यासाठी घरबसल्या मोबाईलवरून वरील पद्धतीने स्टेट्स (SGNAY Beneficiary Status) तपासता येतं. त्यामुळे आता तुम्हाला तहसील कार्यालयात रांग लावण्याची गरज नाही. केवळ काही मिनिटांत ही माहिती मिळू शकते.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही विशेष सहाय्य निराधार योजनेच्या अनुदानाचे स्टेट्स ऑनलाईन चेक कसे करायचे? (Special Assistance Beneficiary Status) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

खालील महत्वपूर्ण लेख वाचा !

  1. संजय गांधी निराधार योजना वाढीव अनुदान | दिव्यांग व वृद्धांना दरमहा ₹2500
  2. संजय गांधी निराधार अनुदान योजना; निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन योजना!
  3. संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता अर्थसहाय्याचे थेट लाभ मिळणार !
  4. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
  5. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना
  6. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ !
  7. विधवा, अपंग व निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज!
  8. या ५ विशेष सहाय्य योजनांचे ऑफलाईन/ऑनलाईन अर्ज आता ग्रामपंचायत मध्ये ही भरता येणार !
  9. दिव्यांग व्यक्तींनी मदतीसाठी महा-शरद पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करा !
  10. पंचायत राज्य संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातून ५ टक्के निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना व खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना
  11. युडीआयडी कार्ड: अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती!
  12. मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन !
  13. अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.