दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार, दिनांक 15 मार्च 2022 तर इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवार दि. 4 मार्च 2022 पासून सुरू होत असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.
यासंदर्भातील सविस्तर विषयनिहाय दिनांक आणि वेळ याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले असून परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे.
त्या वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक:
- दहावी परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- बारावी परीक्षेचे (HSC VOCATIONAL) विषयनिहाय वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- बारावी परीक्षेचे (General & Bifocal) विषयनिहाय वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- दहावी परीक्षा मार्च-2022 दिव्यांग उमेदवार कामाच्या शिक्षण विषयाचे वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
परिपत्रक: HSC/SSC मार्च-एप्रिल 2022 परीक्षेबाबत परिपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु – Apply Online For Maha DBT Scholarship
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!