महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास आयुक्तालय अंतर्गत भरती – WCD Maharashtra Recruitment 2022

महिला बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास आयुक्तालय WCD महाराष्ट्र भरती 2022 – जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी संस्था केअर, संरक्षण अधिकारी, कायदेशीर सह परिविक्षा अधिकारी, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता, लेखापाल, डेटा विश्लेषक, डेटा एंट्री वर्कर, सीडब्ल्यूसी वर्कर, डेटा एंट्री वर्कर्स DEO, JJB DEO अशा विविध 195 जागांसाठी भरती.

महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास आयुक्तालय अंतर्गत भरती – WCD Maharashtra Recruitment 2022:

अटी व शर्ती खालीलप्रमाणे:

१. वयोमर्यादा १८ ते ४३ वर्ष ( जाहिरात दिनांकास उमेदवाराचे वय १८ वर्ष पूर्ण असावे तसेच ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.

२. सदर पदभरती मध्ये अनाथ आरक्षणाबाबत महिला व बाल विकास विभागाचे शासन लागू राहील.

३. सदर पदे संपूर्णता कंत्राटी तत्वावर राहणार असून कराराची मुदत ११ महिने किंवा योजना कार्यान्वित असेल यापैकी जे आधी घडले या मुदतीकरता राहील. मुदत संपल्यावर कंत्राटी तत्वावर कार्यरत व्यक्तीचा सदर पदावर कोणताही हक्क राहणार नाही.

४. सदरची नियुक्ती हि करार पद्धतीने असल्यामुळे संबंधीतास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाबाबत घेण्याबाबतचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळणे अनुज्ञेय असणार नाही,

५. सदरची पदे हि ११ महिन्यांच्या करार तत्वावरील व अस्थाई स्वरुपाची असल्याने संबंधीतास शासनाच्या संवर्गात सेवा सामावून घेण्याबाबत न्यायालयात दाद मागता येणार नाही त्याबाबत १००/- रुपयांच्या स्टँप पेपरवर बंधपत्र / हमीपत्र नियुक्तीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.

६. अधिकारी / कर्मचारी शाररीक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी.

७. नियुक्ती करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कराराचा कालावधी ११ महिने पूर्ण झाल्यानंतर आणि योजना कार्यान्वित असल्यास सदरचा कालावधी संपल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करून पुढील ११ महिन्यांकरिता करार कालावधीमध्ये वाढ करण्याचा अंतिम अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांचा राहील. करार कालावधीमध्ये वाढ झाल्यास पुन करारनामा करणे बंधनकारक राहील. नियुक्तीच्या कालावधीत पदनिहाय दिलेल्या कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडण्याची जवाबदारी हि संबंधित व्यक्तीची राहील व त्याबाबत १००/- रुपयांच्या स्टॅप पेपरवर बंधपत्र / हमीपत्र नियुक्तीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.

८. प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी सदरच्या कंत्राटी सेवा समाप्त करण्याचा अधिकार राहील.

९. नियुक्त झालेला अधिकारी कर्मचारी त्याच्यावर सोपविलेली जबाबदारी पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक वा इतर कामात गुंतलेला नसावा.

१०. करार पद्धतीवरील नियुक्त कर्मचाऱ्यास कार्यालयात प्राप्त होणारी प्रकरणे कागदपत्रे आधारसामग्री याबाबत गोपनीयता पाळणे बंधनकारक राहील. अशा गोपनीयतेचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती कार्यालयीन कार्यवाही करण्यात येईल.

११. उमेदवारास नियुक्तीच्या वेळी पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक राहील.

१२. सेवा सोडायची असेल तर १ महिना आधी लेखी सूचना द्यावी किवा १ महिन्याचे मानधन शासनास द्यावे लागेल.

१३. जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कामकाज हे अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळे नियुक्त कर्मचाऱ्यास संपूर्ण जिल्ह्यात राज्यात देशात प्रवास करावा लागेल.

१४. कार्यालीची वेळ शासकीय वेळेनुसार असेल कामाच्या व्याप्तीनुसार अधिक वेळापर्यंत अथवा अत्यावश्यक परिस्थितीत काम करण्याची तयारी ठेवावी लागेल.

१५. नियुक्त उमेदवाराच्या ताब्यात असलेल्या कार्यालयीन मालमत्तेची योग्य काळजी त्यास घ्यावी लागेल. सदर मालमत्तेचे नुकसान झाल्यास संबंधीत कर्मचाऱ्यांकडून नुकसान भरपाई घेण्यात येईल.

१६. कंत्राटी नियुक्ती सोडतांना नियुक्त उमेदवाराच्या नियुक्ती नंतर ताब्यात दिलेली सर्व कागदपत्रे, साहित्य, मालमत्ता कार्यालयाकडे जमा करून त्याची पोच पावती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कडे जमा करावी.

एकूण जागा: 195 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (DCPU) 10
2 संरक्षण अधिकारी (Institutional Care) 08
3 संरक्षण अधिकारी (Non-Institutional Care) 12
4 कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी (LCPO) 21
5 समुपदेशक 15
6 सामाजिक कार्यकर्ता 23
7 लेखापाल 18
8 डेटा विश्लेषक 13
9 डेटा एंट्री ऑपरेटरसह सहाय्यक (DCPU) 13
10 आउटरीच वर्कर (ORW) 25
11 CWC डेटा एंट्री ऑपरेटर 19
12 JJB डेटा एंट्री ऑपरेटर 18
एकूण जागा  195

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) सामाजिक कार्य/समाजशास्त्र/बाल विकास/मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन/ मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2:  सामाजिक कार्य/समाजशास्त्र/बाल विकास/मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन/ मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित विषयात पदवी + 02 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3:  सामाजिक कार्य/समाजशास्त्र/बाल विकास/मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन/ मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित विषयात पदवी + 02 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: (i) LLB   (ii) 02 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5: (i) सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानसशास्त्र / सार्वजनिक मध्ये पदवीधर किंवा  काउंसिलिंग आणि कम्युनिकेशन PG डिप्लोमा   (ii) 01 वर्ष अनुभव
 6. पद क्र.6: सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मध्ये बी.ए मध्ये प्राधान्याने पदवीधर
 7. पद क्र.7:  वाणिज्य/गणित पदवी   (ii) 01 वर्ष अनुभव
 8. पद क्र.8: सांख्यिकी/गणित/अर्थशास्त्र पदवी/BCA
 9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) कॉम्प्युटरमधील प्रमाणपत्र/डिप्लोमा
 10. पद क्र.10: 12वी उत्तीर्ण
 11. पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) कॉम्प्युटरमधील प्रमाणपत्र/डिप्लोमा
 12. पद क्र.12: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) कॉम्प्युटरमधील प्रमाणपत्र/डिप्लोमा

वयाची अट:02 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी: ₹150/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2022  (11:59 PM)

जाहिरात (Notification):

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात भरती – MUHS Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.