माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन मोबाईलद्वारे माहिती मिळवण्यासाठी विंनती अर्ज कसा करायचा?

अधिकार हे स्वातंत्र्य किंवा हक्कांची कायदेशीर, सामाजिक किंवा नैतिक तत्त्वे आहेत; ते आहे, हक्क हे काही कायदेशीर प्रणाली, सामाजिक अधिवेशन किंवा नैतिक सिद्धांतानुसार लोकांना काय परवानगी आहे किंवा लोकांना काय देणे आवश्यक आहे याबद्दल मूलभूत नियम आहेत. आज आपण जी माहिती घेणार आहोत ती महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत जी विविध सरकारी कार्यालय येत आहेत त्यांच्याबद्दलचे आहे. 

माहिती अधिकाराचा अर्ज (RTI) ऑनलाईन मोबाईलद्वारे कसा करायचा ?

ऑनलाईन माहितीचा अधिकार पोर्टल वापरण्याकरीता मार्गदर्शक सूचना:

 1. भारतीय नागरिक माहितीच्या अधिकारांतर्गत ऑनलाईन माहिती अधिकाराचा अर्ज तसेच प्रथम अपील अर्ज दाखल करण्यासाठी या पोर्टलचा वापर करू शकतील. तसेच यासाठी लागणारे विहित शुल्क या पोर्टलच्या साहाय्याने भरता येईल.
 2. सद्यस्थितीत माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत माहिती मिळवू इच्छिणारे नागरिक या पोर्टलच्या साहाय्याने महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांकडे माहिती अधिकाराचा अर्ज दाखल करू शकतात.
मंत्रालय/विभाग/शिखर संस्था यांची सूची:
 1. सद्यस्थितीत ऑनलाईन माहिती अधिकाराचा अर्ज दाखल करण्याची सुविधा केवळ मंत्रालयीन विभागांकरीता उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंत्रालयाबाहेरील विभागांचा समावेश पुढील टप्प्यात करण्यात येईल.
 2. “अर्ज सादर करा” यावर क्लिक केल्यानंतर दिसणाऱ्या पृष्ठावर अर्जदाराला आवश्यक तपशिलांची नोंद करावी लागेल. * अशी खूण केलेल्या रकान्यात तपशिलाची नोंद करणे बंधनकारक आहे आणि इतर तपशिलाची नोंद ऐच्छिक आहे.
 3. अर्जातील मजकुर विहित रकान्यात लिहावा. सद्यस्थितीत विहित रकान्यातील मजकुरासाठी १५० शब्दांची मर्यादा निश्चित केली आहे.
 4. जर अर्जातील शब्दांची संख्या 150 पेक्षा जास्त असेल तर प्रपत्राच्या रकान्यामध्ये तो पीडीएफ संलग्न “आधारभूत दस्तऐवज” म्हणून अपलोड करता येईल.
 5. दारिद्र्य रेषेखालील नसलेल्या अर्जदाराने प्रथम पृष्ठावर तपशिलाची नोंद केल्यानंतर त्यास पेमेंट गेटवे पृष्ठाकडे निर्देशित केले जाईल. येथे अर्जदाराने विहित आरटीआय शुल्क अदा करण्यासाठी “रक्कम अदा करा” या बटनावर क्लिक करावे.
 6. अर्जदार विहित शुल्क खालीलप्रकारे अदा करू शकेल:
  १) इंटरनेट बँकींग
  २) एटीएम-कम-डेबिट कार्ड
  ३) क्रेडिट कार्ड (मास्टर्स/व्हीसा)
 7. अर्ज दाखल करण्यासाठी अदा करावयाचे शुल्क माहिती अधिकार नियम, 2012 नुसार विहित करण्यात आले आहे.
 8. शुल्क अदा केल्यानंतर अर्ज अंतिमत: दाखल करण्यात येईल आणि एक विशिष्ट नोंदणी क्रमांक जारी करण्यात येईल, तो अर्जदाराला एसएमएस आणि ई-मेल द्वारा पाठविण्यात येईल. अर्जदाराला भविष्यातील संदर्भासाठी त्या क्रमांकाचा वापर करता येईल.
 9. माहितीचा अधिकार नियम 2012 नुसार दारिद्रय रेषेखालील अर्जदाराला कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. मात्र अशा अर्जदाराने आपल्या अर्जासोबत शासनाद्वारे निर्गमित दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
 10. ऑनलाईन माहिती अधिकार पोर्टलद्वारे भरण्यात आलेला अर्ज संबंधित विभागांच्या जन माहिती अधिकाऱ्याकडे न जाता संबंधित विभागाच्या नोडल अधिकाऱ्याकडे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पोहोचेल. सदर नोडल अधिकारी हा आरटीआय अर्ज इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जन माहिती अधिकाऱ्याकडे हस्तांतरित करेल.
 11. माहिती पुरविण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरणा आवश्यक असल्यास जन माहिती अधिकारी या पोर्टलद्वारे अर्जदाराला तसे सूचित करेल. अर्जदार ऑनलाईन माहितीचा अधिकार पोर्टलच्या “सद्यस्थिती पाहा” या पर्यायावर क्लिक करून हे पाहू शकेल तसेच त्याला/तिला ई-मेल द्वारे सूचित केले जाईल.
 12. प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील दाखल करण्यासाठी अर्जदाराने “अपील सादर करा” या पर्यायावर क्लिक करावे आणि जे प्रपत्र दिसेल ते भरावे.
 13. संदर्भासाठी मूळ अर्जाचा नोंदणी क्रमांक वापरावा.
 14. माहिती अधिकार नियमानुसार प्रथम अपीलाकरिता रु.२०/- इतके शुल्क अदा करणे आवश्यक आहे.
 15. सद्यस्थितीत अर्जदार / अपीलकर्ता खालील बाबींची सद्यस्थिती पाहू शकतो-:
  १) अर्ज दाखल केल्याचा दिनांक
  २) अतिरिक्त शुल्क, अदा करणे आवश्यक असल्यास
  ३) अपील दाखल केल्याचा दिनांक
  ४) उत्तर पाठविल्याचा दिनांक
 16. एसएमएस प्राप्त करण्यासाठी अर्जदाराने/अपीलकर्त्याने आपला मोबाईल क्रमांक द्यावा.
 17. माहिती अधिकार अर्ज आणि प्रथम अपील दाखल करण्यासाठी तसेच यासंदर्भातील इतर तरतुदींकरिता कालमर्यादा, सूट वगैरे करीता माहिती अधिकार अधिनियम, २००५ मध्ये विहित केलेल्या तरतूदी यापुढेही लागू राहतील.


ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज:

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा कंप्युटर मधील क्रोम ब्राउजर मध्ये खालील वेबसाईट ओपन करा. 

https://rtionline.maharashtra.gov.in

RTI वेबसाईट ओपन झाल्यावर "अर्ज सादर करा" या टॅबवर क्लिक करा.

माहिती अधिकाराचा अर्ज (RTI) ऑनलाईन मोबाईलद्वारे कसा करायचा ?


खालील  मार्गदर्शक सूचना आणि "मी उपरोक्त मार्गदर्शक सूचना वाचल्या आहेत आणि समजून घेतल्या आहेत" या बॉक्स समोरील बॉक्क्स Check Box) तुम्हाला क्लिक करून "सबमिट करा" या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

माहिती अधिकाराचा अर्ज (RTI) ऑनलाईन मोबाईलद्वारे कसा करायचा ?

आता तुमच्या पुढे ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज ओपन होईल, त्यामध्ये दिलेल्या पर्यायानुसार माहिती भरा. 

ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज- (Online RTI Request Form):
 1. Select Department/Public Authority/विभाग :- विभाग च्या पुढे सिलेक्ट केल्यावर तुम्हाला ज्या विभागाअंतर्गत अर्ज करायचा आहे तो विभाग निवडायचा आहे राज्य सरकार अंतर्गत येणारे सर्व विभाग इथे देण्यात आलेले आहेत.
 2. Personal Details of RTI Applicant/माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराचा वैयक्तिक तपशील:- खालील नाव यापुढे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकायचे आणि आणि त्याखाली दिलेल्या लिंग या ठिकाणी तुम्हाला पुरुष किंवा स्त्री यापैकी एक पर्याय निवडायचा आहे त्याखाली पत्ता आणि पिन कोड असे दोन पर्याय असतील, तर पत्ता या पर्याय समोर दिलेल्या तीन ओळीमध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता भरायचा आहे आणि पिनकोड या पर्याय पुढे तुम्हाला तुमचा पिन कोड लिहायचा आहे त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायांमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका ,गाव आणि ठिकाण निवडायचे आहे,ठिकाणी या पर्याय पुढे तुम्हाला दोन पर्याय दिसतील, एक म्हणजे ग्रामीण आणि दुसरा म्हणजे शहरी, तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला ग्रामीण हा पर्याय निवडायचा आहे, त्याखाली शैक्षणिक स्थिती या पर्याय पुढे तुम्हाला साक्षर किंवा निरक्षर या दोनपैकी एक पर्याय निवडायचा आहे, त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायांमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर व शक्य असल्यास अतिरिक्त मोबाईल नंबर लिहायचा आहे. ऑनलाइन माहितीचा अधिकाराचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे ईमेल आयडी असणे गरजेचे आहे.त्यासाठी दूरध्वनी क्रमांक या ऑप्शन खाली दिलेल्या ईमेल आयडी या रकान्यात तुम्हाला तुमचा ईमेल आयडी लिहायचा आहे तुमच्याकडे जर ईमेल आयडी नसेल तर तुम्हाला ती बनवून घ्यावी लागेल.
 3. Request Details/विनंती तपशील :-  नागरिकत्व या पर्याय पुढील भारतीय हेच राहू द्यायचा आहे आणि त्याखाली दिलेल्या दारिद्र रेषेखालील आहेत का या पर्याया पुढे दारिद्र रेषेखालील असल्यास हो आणि नसल्यास नाही हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर माहिती अधिकाराच्या अर्थाचा मजकूर या पर्याय पुढे दिलेल्या बॉक्समध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ते प्रश्न स्वरूपात दीडशे शब्दात पर्यंत तुम्ही टाकू शकतात त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलच्या व्हाट्सअप किंवा इतर पर्याय वापरून मराठीमध्ये लिहून घ्या आणि नंतर ते कॉपी करून या बॉक्समध्ये पेस्ट करा, परंतु जर 150 शब्दांमध्ये तुमचे प्रश्न बसत नसतील तर खाली दिलेल्या सहाय्यक दस्तऐवज या पर्याय पुढे तुम्ही तुमचे प्रश्न pdf स्वरूपात तयार करून ते इथे अपलोड करू शकता. ज्यांच्याकडे कंप्यूटर आहे त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला आहे नाहीतर दीडशे शब्दात पर्यंत मोबाईल द्वारे तुम्ही वर दिलेल्या बॉक्समध्ये तुमचे प्रश्न मांडू शकतात.
माहिती अधिकाराचा अर्ज (RTI) ऑनलाईन मोबाईलद्वारे कसा करायचा ?

यानंतर संरक्षणार्थ तिथे दिलेला त्याच्या कोड खालील बॉक्समध्ये लिहून Submit या पर्यायावर क्लिक करायचे आहे. असे केल्यानंतर तुमच्याकडे पेमेंट करण्यासाठी एक पर्याय येईल, पेमेंट मोड ऑप्शनवर क्लिक करायचे आहे यानंतर ओपन होणाऱ्या पेज वर तुम्ही Paytm द्वारे, नेट बँकिंगद्वारे, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड द्वारे, IMPS द्वारे किंवा UPI मोड द्वारे पेमेंट करू शकता. जर समजा मी PAYTM हा पर्याय निवडला तर तुमच्या पुढे आणखी एक पेज उघडेल या पेजवर तुम्हाला Proceed for Payment हा पर्याय निवडायचा आहे, त्यानंतर PAYTM या पर्यायाखाली तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि नंतर Procced या पर्यायावर क्लिक करायचे आहे

हे केल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला दिलेल्या रकान्यात भरायचा आहे आणि Verify या पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि शेवटी Pay या पर्यायावर क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा माहिती अधिकाराचा अर्ज हा मोबाईल द्वारे भरून झालेला आहे.


या लेखात आपण हमाहिती अधिकाराचा अर्ज ऑनलाईन मोबाईलद्वारे कसा करायचा ? ते सविस्तर पाहिले. मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

Post a Comment

0 Comments