प्रधानमंत्री फसल विमा योजना पूरक अनुदान या योजनेअंतर्गत रु. 10 कोटी इतकी रक्कम वितरीत करण्यासाठीचा नवीन जीआर

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2018 मध्ये राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी, इफको टोकियो जनरल इंशुरन्स कंपनी इंशुरन्स कंपनी, आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनी लि. व ओरिएंटल जनरल इंशुरन्स कंपनी या 4 विमा कंपन्यांमार्फत रब्बी हंगाम 2018-19 मध्ये बजाज अलायन्झ जनरल इंन्शुरन्स कं लि., फ्युचर जनरली इंन्शुरन्स कं .लि. भारती ॲक्सा इंन्शुरन्स कं. लि. या 3 कंपन्यांमार्फत तसेच खरीप हंगाम 2019 मधील भारतीय कृषी विमा कंपनी व बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या 2 कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहेत. 

प्रधानमंत्री फसल विमा योजना पूरक अनुदान या योजनेअंतर्गत रु. 10 कोटी इतकी रक्कम वितरीत करण्यासाठीचा नवीन जीआर

योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई  निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे. अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी  शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम रु.1000/- पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम रु.1000/ अदा करण्यासंदर्भात  संदर्भ क्र. (1) अन्वये निर्णय घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णयातील तरतूदीनुसार कृषी  आयुक्तालयाच्या संदर्भ क्र. (3) च्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार. रु.10 कोटी इतकी रक्कम प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुरक अनुदान या योजनेसाठी खरीप हंगाम 2018, रब्बी हंगाम -2018-19 व खरीप हंगाम 2019 वर्षासाठी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 

प्रधानमंत्री फसल विमा योजना पूरक अनुदान या योजनेअंतर्गत रु. 10 कोटी इतकी रक्कम वितरीत करण्यासाठीचा नवीन जीआर:मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घ्याल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

Post a Comment

0 Comments