गाव नमुना १५ विषयीची संपूर्ण माहिती

गाव नमुना १५ मध्ये तलाठ्याकडे येणाऱ्या तसेच त्याने बाहेर पाठवलेल्या सर्व पत्रव्यवहाराची नोंद ठेवावी लागते. तलाठी यांनी प्रत्येक गावासाठी स्वतंत्र बारनिशी ठेवावी. तलाठ्याने त्याच्याकडे प्राप्त झालेल्या प्रकरणाची नोंद या नमुन्यात तात्काळ करावी.

गाव नमुना १५ विषयीची संपूर्ण माहिती

गाव नमुना १५ विषयीची संपूर्ण माहिती:

गाव नमुना पंधरा मध्ये एकूण ८ स्तंभ असून ते खालीलप्रमाणे भरावेत. 

गाव नमुना पंधरा - स्तंभ १ अनुक्रमांकाचा आहे. 

गाव नमुना पंधरा - स्तंभ २ मध्ये तलाठी यांना प्राप्त झालेला पत्रव्यवहार कोणाकडून मिळाला याची नोंद करावी. 

गाव नमुना पंधरा - स्तंभ ३ मध्ये तलाठी यांना प्राप्त झालेल्या पत्रव्यवहाराचा क्रमांक व दिनांक लिहावा. 

गाव नमुना पंधरा - स्तंभ ४ मध्ये तलाठी यांना पत्रव्यवहार मिळाल्याचा दिनांक लिहावा. 

गाव नमुना पंधरा - स्तंभ ५ मध्ये तलाठी यांना प्राप्त झालेल्या पत्रव्यवहार विषय व त्यावर करावयाची कार्यवाही थोडक्यात नमूद करावी. 

गाव नमुना पंधरा - स्तंभ ६ मध्ये तलाठी यांनी प्राप्त झालेल्या पत्रव्यवहार कोणाकडे निर्गमित केला ते नमूद करावे. 

गाव नमुना पंधरा - स्तंभ ७ मध्ये तलाठी यांनी पत्रव्यवहार निर्गमित केल्याचा क्रमांक, दिनांक व पाठवलेल्या प्रतिवृत्ताचा सारांश लिहावा. 

गाव नमुना पंधरा - स्तंभ ८ मध्ये झालेला पत्रव्यवहार अ , ब ,क , ड सूचित अभिलिखित केल्याचा क्रमांक व शेरा स्तंभ आहे. या नोंदी तलाठी दप्तर तपासणी करताना सक्षम अधिकाऱ्याने करावयाच्या असतात. 

गाव नमुना १५

हेही वाचा - गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments