गाव नमुना १६ आणि गाव नमुना १७ विषयीची संपूर्ण माहिती
आपण या लेखात गाव नमुना १६ आणि गाव नमुना १७ विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
गाव नमुना १६:
गाव नमुना सोळा हा पुस्तके, नियम पुस्तिका व स्थायी आदेश इत्यादींची सूची आहे. यासाठी शासनाने कोणताही विशिष्ट नमुना विहित केलेला नाही. तलाठी यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जी पुस्तके असतात, नियम पुस्तिका असतात व शासन तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्थायी आदेश प्राप्त होत असतात. तलाठी यांनी या प्रत्येक गोष्टीला अनुक्रमांक द्यावा व ते दफ्तरामध्ये जतन करावे.
तलाठी यांनी सर्व परिपत्रके एका फाईलमध्ये क्रमाने लावून ठेवावीत. जेव्हा एखाद्या नवीन परिपत्रकामुळे जुने परिपत्रक रद्द ठरते तेव्हा तलाठी यांनी नवीन परिपत्रकावर तशी नोंद करून जुने परिपत्रक काढून टाकावे व नवीन परिपत्रक त्या जागी लावावे.
गाव नमुना १७:
ज्या प्रकरणात संकीर्ण महसूल बसवण्यासंबंधीच्या विषयाच्या अंतर्भाव आहे अशा कोणत्याही बाबींच्या बाबतीत तलाठी किंवा मंडलअधिकारी यांनी पाठवण्याची प्रतिवृते या नमुन्यात पाठवावी.
हेही वाचा – तलाठी कार्यालयातील गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!