गाव नमुना १८ (मंडलअधिकारी आवक -जावक नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 18
गाव नमुना १८ मध्ये मंडलअधिकारी यांच्याकडे येणाऱ्या तसेच त्यांनी बाहेर पाठवलेल्या सर्व पत्रव्यवहाराची नोंद ठेवावी लागते. मंडलअधिकारी यांनी प्रत्येक गावासाठी स्वतंत्र बारनिशी ठेवावी आणि त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या प्रकरणाची नोंद या नमुन्यात तात्काळ करावी.
गाव नमुना १८:
गाव नमुना अठरा मध्ये एकूण ८ स्तंभ असून ते खालीलप्रमाणे भरावेत.
गाव नमुना अठरा – स्तंभ १ अनुक्रमांकाचा आहे.
गाव नमुना अठरा – स्तंभ २ मध्ये मंडलअधिकारी यांना प्राप्त झालेला पत्रव्यहार कोणाकडून मिळाला याची नोंद करावी.
गाव नमुना अठरा – स्तंभ ३ मध्ये मंडलअधिकारी यांना प्राप्त झालेल्या पत्रव्यवहाराचा क्रमांक व दिनांक लिहावा.
गाव नमुना अठरा – स्तंभ ४ मध्ये मंडलअधिकारी यांना पत्रव्यवहार मिळाल्याचा दिनांक लिहावा.
गाव नमुना अठरा – स्तंभ ५ मध्ये मंडलअधिकारी यांना प्राप्त झालेल्या पत्रव्यवहार विषय व त्यावर करावयाची कार्यवाही थोडक्यात नमूद करावी.
गाव नमुना अठरा – स्तंभ ६ मध्ये मंडलअधिकारी यांनी, प्राप्त झालेल्या पत्रव्यवहार कोणाकडे निर्गमित केला ते नमूद करावे.
गाव नमुना अठरा – स्तंभ ७ मध्ये मंडलअधिकारी यांनी पत्रव्यवहार निर्गमित केल्याचा क्रमांक, दिनांक व पाठवलेल्या प्रतिवृत्ताचा सारांश लिहावा.
गाव नमुना अठरा – स्तंभ ८ झालेला पत्रव्यवहार अ, ब, क, ड सूचित अभिलिखित केल्याचा क्रमांक व शेरा स्तंभ आहे.
या नोंदी मंडलअधिकारी दफतर तपासणी करताना सक्षम अधिकाऱ्याने करावयाच्या असतात.
हेही वाचा – तलाठी कार्यालयातील गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!