गाव नमुना १९ (तलाठी आणि मंडलअधिकारी यांच्या ताब्यात असलेल्या शासकीय मालमतेची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती
तलाठी आणि मंडलअधिकारी याना त्यांच्या ताब्यात असलेल्या सर्व शासकीय मालमतेची ( टेबल, खुर्ची, कपाट, घड्याळ इत्यादी ) नोंद गाव नमुना एकोणीस (Gav Namuna 19) मध्ये ठेवावी लागते. तलाठी आणि मंडलअधिकारी यांनी या (Gav Namuna 19) नोंदवहीत नमूद साहित्याखेरीज इतर कोणतेही साहित्य कार्यालयात ठेऊ नये अन्यथा त्याबाबत खुलासा विचारला जाऊ शकतो.
गाव नमुना १९ (तलाठी आणि मंडलअधिकारी यांच्या ताब्यात असलेल्या शासकीय मालमतेची नोंदवही) – Gav Namuna 19:
गाव नमुना एकोणीस (Gav Namuna 19) मध्ये एकूण १४ स्तंभ असून ते खालीलप्रमाणे भरावेत.
गाव नमुना एकोणीस (Gav Namuna 19) – स्तंभ १ अनुक्रमांकाचा आहे. तलाठी आणि मंडलअधिकारी यांनी या नोंदवहीतील अनुक्रमांकानुसार त्यांच्या ताब्यात असलेल्या सर्व शासकीय मालमत्तेवर योग्य त्या ऑइल पैंटने अनुक्रमांक लिहून घेतल्याची खात्री करावी. तसेच शासनामार्फत काही नवीन शासकीय मालमत्ता देण्यात आली तर लगेच त्यावरही ऑइल पैंटने अनुक्रमांक लिहून या नोंदवहीत त्याची नोंद करावी.
गाव नमुना एकोणीस (Gav Namuna 19) – स्तंभ २ मध्ये तलाठी आणि मंडलअधिकारी याना त्यांच्या ताब्यात असलेल्या सर्व शासकीय वस्तूंचे वर्णन लिहावे.
गाव नमुना एकोणीस – स्तंभ ३ मध्ये खरेदीसाठी तलाठी आणि मंडलअधिकारी यांच्या ताब्यात असलेली मालमत्तेवर खरेदी करण्यास कोणी प्राधिकार दिले व अशा खरेदीचा दिनांक नमूद करावा.
गाव नमुना एकोणीस – स्तंभ ४ मध्ये खरेदी केलेल्या वस्तूंची संख्या किंवा परिमाण नमूद करावे.
गाव नमुना एकोणीस – स्तंभ ५ मध्ये खरेदी केलेल्या वस्तूंचे मूल्य नमूद करावे.
गाव नमुना एकोणीस – स्तंभ ६ मध्ये तलाठी / मंडलअधिकारी यांची स्वाक्षरी करावी.
गाव नमुना एकोणीस (Gav Namuna 19) – स्तंभ ७ मध्ये जर तलाठी / मंडलअधिकारी यांच्या ताब्यात असलेली एखादी शासकीय मालमत्ता खराब झाली असेल आणि ती दुरुस्त करता येत नसेल तर सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीने त्याची अंतिम विल्हेवाट लावता येते. या स्तंभात अशी विल्हेवाट लावलेल्या वस्तूंची संख्या किंवा परिमाण आणि कोणत्या प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली हे नमूद करावे.
गाव नमुना एकोणीस – स्तंभ ८ मध्ये, जर वरील प्रमाणे काही वस्तूंची विल्हेवाट लावली गेली असेल तर अशा विल्हेवाटीस मंजुरी/ प्राधिकार कोणी दिला किंवा त्याबाबत प्रमाणक कोण होते हे नमूद करावे.
गाव नमुना एकोणीस – स्तंभ ९ मध्ये, जर वरील प्रमाणे काही वस्तूंची विल्हेवाट लावताना तिची विक्री केली असेल तर विक्री करून वसूल केलेल्या रक्कमेची आणि ती रक्कम कोषागारात भरणा केल्याचा दिनांक नमूद करावा.
गाव नमुना एकोणीस – स्तंभ १० मध्ये निर्लेखित केलेली रक्कम असल्यास ती नमूद करावी.
गाव नमुना एकोणीस – स्तंभ ११ मध्ये शिल्लक राहिलेल्या संग्रहाची संख्या नमूद करावी.
गाव नमुना एकोणीस – स्तंभ १२ मध्ये शिल्लक राहिलेल्या संग्रहाचे मूल्य नमूद करावे.
गाव नमुना एकोणीस – स्तंभ १३ मध्ये तलाठी/ मंडलअधिकारी यांनी स्वाक्षरी करावी.
गाव नमुना एकोणीस (Gav Namuna 19) – स्तंभ १४ मध्ये निरीक्षण अधिकाऱ्याचा शेरा लिहावा व सही करावी.
खालील लेख देखील वाचा!
- तलाठी कार्यालयातील गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती
- ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा (घरठाण उतारा) काढण्यासाठी ऑफलाईन/ऑनलाईन प्रोसेस !
- ग्रामपंचायत नमुना 1 ते 33 (अभिलेख) विषयीची सविस्तर माहिती – ग्रामपंचायत नमुना 1 ते 33 PDF फाईल डाउनलोड करा.
- गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन !
- महसूल अधिनियमान्वये जमिनीची सविस्तर माहिती.
- जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती.
- तलाठ्याची कर्तव्ये कोणती आहेत? तलाठ्याकडून माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार अर्ज कसा करायचा?
- जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- महाराष्ट्र ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण नियम बाबत सविस्तर माहिती पहा !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!