महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आठवी यादी जाहीर २०२१ – Mahatma Jyotiba Phule Karj Mafi (MJPSKY) List 2021

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभार्थ्यांची आठवी यादी जाहीर केली आहे. राज्यात शेतकरी हे शेती आणि शेतीशी निगडित कामांकरिता व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतात. तसेच विविध भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने, तसेच अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता या शेतीशी निगडित नुकसान भरपाई म्हणून राज्य शासन कर्ज मुक्तीची योजना अमलात आणली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घेण्यास सुलभ होईल.

सदर कर्जमुक्ती योजनेसाठी खालील निकष निश्चित करण्यात आले आहेत:

  • कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट भरणार.
  • राष्ट्रीयकृत, व्यापारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार .

यांना लाभ मिळणार नाही

  • आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार
  • केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
  • महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
  • सहकारी साखर कारखाने,कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक
  • मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी
  • २५ हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेण्याऱ्या व्यक्ती
  • शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती

सहज सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती:

  • आपला आधार क्रमांक बँकेच्या, विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जखात्याशी संलग्न करावा.
  • मार्च २०२० पासून बँकांनी आधार क्रमांकासह आणि कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेल्या याद्या सूचनाफलक तसेच चावडीवर प्रसिद्ध केल्या जातील.
  • या याद्यांमध्ये शेतकऱ्याच्या कर्जखात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिलेला असेल.
  • शेतकऱ्यांनी आधार कार्डासोबत आपल्याला दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक घेवून ‘आपले सरकार सेवा’  केंद्रात जावून आपल्या आधार क्रमांकाची आणि कर्ज रकमेची पडताळणी करावी.
  • पडताळणी नंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्जखात्यात जमा होईल.
  • कर्ज रकमेबाबत व आधार क्रमांकाबाबत शेतकऱ्यांचे वेगळे म्हणणे असल्यास ते जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडले जाईल. समिती त्याबाबत निर्णय घेऊन अंतिम कार्यवाही करेल.

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी आठवी यादी २०२१:

आपण इथे फक्त दोन जिल्ह्याच्या याद्या उपलब्ध करून देणार आहोत, बाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या CSC सेंटरला भेट देऊन यादी मध्ये नाव आहे का ते तपासा आणि आधार प्रमाणीकरण करून घ्या.

१) आपले प्रमाणीकरण सहज व सोपे होण्यासाठी वरील प्रसिध्द केलेल्या यादीमधील शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे घेवून आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र/बँक शाखा मध्ये जावून प्रमाणीकरण करुन घ्यावे. (सोबतच आधार प्रमाणीकरणाची सोय स्वस्त धान्य दुकानावरसुध्दा उपलब्ध करुन दिलेली आहे).

  • आधार कार्ड.
  • बचत खात्याचे पासबुक.
  • यादीमध्ये आपल्या नावासमोरील नमूद असलेला विशिष्ट क्रमांक ( स्वत: लिहून न्यावा).

२. काही विसंगती असल्यास पोर्टलवर असहमतीचे बटण दाबून शेतकरी तक्रार नोंदवू शकतो.

३. उपरोक्त कर्जखात्यांची यादी अंतिम नसून , बँकांकडून जशी माहिती उपलब्ध होईल त्याप्रमाणे नवीन कर्जखात्यांची यादी प्रसिध्द करण्यात येईल.

हेही वाचा – कृषी कर्ज मित्र योजना – Krishi Karj Mitra Yojana

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

4 thoughts on “महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आठवी यादी जाहीर २०२१ – Mahatma Jyotiba Phule Karj Mafi (MJPSKY) List 2021

  • October 26, 2021 at 9:47 am
    Permalink

    Pls share diteals mahatma joyiba fule

    Reply
  • October 27, 2021 at 6:34 pm
    Permalink

    जालना जिल्ह्य़ातील आठवी यादी csc सेन्टरला कळेल का

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.