वृत्त विशेषसरकारी कामे

ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या संपूर्ण माहिती

एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. ATM व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी SBI ने एक नवीन पुढाकार घेतला आहे. ज्यामध्ये आता तुम्हाला ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागेल.

या नवीन नियमात ग्राहकांना OTP शिवाय पैसे काढता येणार नाहीत. रोख रक्कम काढण्याच्या वेळी, ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवर एक ओटीपी मिळेल, जो टाकूनच एटीएममधून पैसे काढता येतील.

बँकेने ट्विट करून याबद्दल ग्राहकांना माहिती दिली आहे. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “एसबीआय एटीएममधील व्यवहारांसाठी आमची ओटीपी आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली हे फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध एक लसीकरण आहे. फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करणे हे नेहमीच आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल.

SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम:

>

SBI ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागेल. या नवीन नियमात ग्राहकांना OTP शिवाय पैसे काढता येणार नाहीत. रोख रक्कम काढण्याच्या वेळी, ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवर एक ओटीपी मिळेल, जो टाकूनच एटीएममधून पैसे काढता येतील.

हा नियम 10 हजार रुपये आणि त्याहून अधिक पैसे काढण्यावर लागू होतील.

एसबीआय ग्राहकांना त्यांच्या एटीएममधून प्रत्येक वेळी त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर येणारा ओटीपी आणि त्यांच्या डेबिट कार्ड पिन टाकून 10 हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम काढण्याची परवानगी मिळेल.

कार्यपद्धती:

  • SBI ATM मधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला OTP ची आवश्यकता असेल.
  • यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल.
  • हा OTP चार अंकी क्रमांक असेल जो ग्राहकाला एका व्यवहारासाठी मिळेल.
  • तुम्ही काढू इच्छित असलेली रक्कम प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला एटीएम स्क्रीनवर ओटीपी प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल.
  • पैसे काढण्यासाठी या स्क्रीनमध्ये बँकेत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करावा लागेल.

बँकेने हा नियम करण्याचा हेतू: 

ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवता यावे यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI कडे 22 हजार 224 शाखा आणि 63 हजार 906 ATM/CDM आहे.

ज्याचे भारतात 71 हजार 705 BC आउटलेट आहे, जे सर्वात मोठे नेटवर्क आहे. इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या अंदाजे 91 दशलक्ष आणि 20 दशलक्ष आहे. यांमध्ये काही गैरव्यवहार होऊ नयेत या हेतूने या नियमात बदल केले गेले.

हेही वाचा – ‘पॅनकार्ड क्लब लिमिटेड’ आणि ‘मैत्रेय’ कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळणार – राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे निर्देश

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.