वृत्त विशेषसरकारी योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना; घरगुती वीज जोडणीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना सुरु केली आहे. घरगुती वीज जोडणीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा सविस्तर माहितीसाठी खालील सविस्तर प्रोसेस पहा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना; घरगुती वीज जोडणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस:

सर्वप्रथम घरगुती वीज जोडणीसाठी ऑनलाईन अर्ज करताना खालील महावितरणच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getHome

वेबसाईट ओपन झाल्यानंतर डाव्या बाजूला अनेक पर्याय दिसतील त्यातील  “New Connection Request” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

General Information (सामान्य माहिती):

New Connection Request या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ‘A-1 Application Form’ हे पेज ओपन होईल, त्यामध्ये General Information या पर्यायामधील ‘Non Industrial’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

General Information
General Information

Consumer Category यामध्ये 1-LT-SUPPLY या पर्यायावर क्लिक करा. तसेच Service Requested यामध्ये 001-New Connection (Permanent) या पर्यायावर क्लिक करा व नंतर ज्या तारखेला तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार आहात ती Date तेथे सिलेक्ट होऊन येईल.

Application Details (अर्ज तपशील):

अर्जदाराची माहिती या भागामध्ये First Name (पहिले नाव), Middle Name (मधले नाव), Last Name( आडनाव), Consumer Full Name (ग्राहकाचे पूर्ण नाव), Occupation (व्यवसाय), अर्जदाराची वर्गवारी, लिंग,ई. सर्व माहिती भरायची आहे.

त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेअंतर्गत वीज कनेक्शन घेण्यासाठी I would like to opt for DBAJPY(Dr. Babasaheb Ambedkar Jivan Prakash Yojana) यामध्ये ‘yes’ या पर्यायावर क्लिक करा.

DBAJPY
DBAJPY

Address at which supply is required (ज्या पत्त्यावर पुरवठा आवश्यक आहे):

त्यानंतर ज्या जागी वीज पुरवठा हवा आहे त्या जागेची सविस्तर माहिती भरायची आहे. यामध्ये शेजाऱ्याच्या मीटर ग्राहक क्रमांक, जागा /घर क्रमांक /इमारतीचे नाव, पत्ता, जागेची खूण, जिल्हा, तालुका, गाव, पिन कोड, मोबाईल नंबर, ई-मेल, आधार क्र, दुरध्वनी क्रमांक ही सर्व माहिती उपडेट करा.

Billing Details (बिलाची माहिती):

बिलाची माहिती या भागामध्ये जर तुम्हाला वरील पत्यावरच नवीन वीज जोडणी घ्यायची असेल तर ‘बिलाचा आणि मीटरचा पत्ता सारखा आहे’ येथे क्लिक करा आणि जर तुम्हाला नवीन पत्ता टाकायचा असेल तर नवीन पत्त्याचा तपशील भरा.

नंतर Requested load / contract demand / supply type मध्ये लोड calculater यावरती क्लिक करून तुमच्या घरामधील ज्या बल्प, किंवा लाईट असतील त्या किती वॅटच्या आहेत त्यांची सविस्तर माहिती उपडेट करायची आहे.

नंतर खालील सर्व नियम आणि अटी वाचून I Agree या पर्यायावर क्लीक करा व आपल्या गावाच्या ठिकाणाचे नाव टाका.

नंतर “Generate OTP” या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर आपण जो नंबर उपडेट केला आहे त्या मोबाईल नंबर वरील OTP नंबर टाका व Save या पर्यायावर क्लिक करा.

Save पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक Application ID येईल तो तुम्हाला जपून ठेवायचा आहे व ओके वर क्लिक करा.

त्यानंतर तुम्ही उपडेट केलेली सर्व माहिती दिसेल ती वाचून तुम्ही Upload Documents या ऑपशन वर क्लिक करा. यामध्ये मोबाईल नंबर, इमेल ID, आधार नंबर, पत्त्याचा पुरावा, जातीचा दाखला इ. सर्व कागदपत्रे उपलोड करायची आहेत.

नवीन कनेक्शन/ग्रुप कनेक्शन बी-1 अर्जाची स्थिती तपासा:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना; घरगुती वीज जोडणीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर खालील लिंक वर क्लिक करा आणि Application ID टाकून आपल्या नवीन कनेक्शन/ग्रुप कनेक्शन बी-1 अर्जाची स्थिती तपासा.

https://grouppaybill.mahadiscom.in/paynccharges/ui/PAYNC/SearchApplication.aspx

हेही वाचा – घरगुती छपरावरील रूफटॉप सोलर अनुदान योजना सुरु, असा करा ऑनलाईन अर्ज – Apply Online for Solar Rooftop

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

2 thoughts on “डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना; घरगुती वीज जोडणीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.