महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी निर्देश
भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस (NDUW) तयार करण्यासाठी आधारबेस ई-श्रम पोर्टल विकसित केले आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर कामगारांना एक अद्वितीय ओळख क्रमांक यूएएन कार्ड मिळेल; ज्यात एक यूआयएन युनिक ओळख क्रमांक असेल. यूआयएन द्वारे नियोक्ता, कौशल्य, शैक्षणिक पात्रता, आणि योजनांशी संबंधित माहिती यासारख्या कामगारांची सर्व माहिती तपासली जाऊ शकते.
ई-श्रम पोर्टलव्दारे कामाच्या शोधात स्थलांतर करणाऱ्या कामगारांसह सर्व असंघटित कामगारांसाठी विविध सामाजिक सुरक्षा योजनांच्या अंमलबजावणीत सुधारणा होईल. यामध्ये उपलब्ध तात्काळ लाभांपैकी मिळणारा एक लाभ म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत मिळणारा रु 2 लाख रुपयांचा अपघात विमा आहे.
ई-श्रम पोर्टलची विविध वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे तपशीलवार आहेत :
1) वय वर्ष १६-५९ वयोगटातील घरगुती कामगार, स्वयंरोजगार कामगार व असंघटित क्षेत्रात कार्य करणारे कामगार यामध्ये नोंदणी करु शकतात.
2) राज्य कामगार विमा योजना (ESIC), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) मध्ये समाविष्ट नसलेले असे १० पेक्षा कमी कामगार कार्यरत असलेले व्यवसाय उदा. उत्पादन विक्री क्षेत्र, सेवा क्षेत्र इ. क्षेत्रातील कामगार ई – श्रम पोर्टलमध्ये नोंदणी करु शकतात. मगांराग्रारोहयोमध्ये नोंदणीकृत असलेले कामगार देखील या पोर्टलमध्ये नोंदणी करण्यास पात्र आहेत.
3) राज्यातील सामुदायिक सेवा केंद्रे/राज्यातील किंवा राज्य शासनाव्दारे चालविण्यात येणार अन्य सुविधा केंद्रे लाभार्थीचे ई-श्रम पोर्टलवर त्यांची नोंदणी करु शकतात. ई – श्रम पोर्टलवर नोंदणी करणे निःशुल्क आहे. नोंदणी करण्यासाठी नोंदणी धारकाला आधारकार्ड / बँक खाते क्रमांक / भ्रमणध्वनी क्रमांक इ. आवश्यक असेल.
4) ग्रामीण भागातील १६-५९ वयोटातील सर्व नागरिक नोंदणीसाठी पात्र ठरणारे आहेत व त्यातून त्यांना अडचणीच्या काळात जास्तीत जास्त फायदे मिळणार आहेत. त्यामुळे ई-श्रम पोर्टलची व्यापकता वाढविल्याने बहुसंख्य नागरिकांचे कल्याण होईल.
त्यामुळे पंचायतींना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी पात्र नागरिकांना नोंद करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी प्रवृत्त करावे. त्यातील एक मार्ग म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग सदस्यांव्दारे त्यांच्या प्रभागातील नागरिकांसाठी शिबीरांचे आयोजन करुन त्यांना नोंदणीसाठी प्रवृत्त करावे.
ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, इतर समुदाय कार्यकर्ता, ग्रामसंघ, गावातील इतर बचत गट इत्यादिंनी त्या शिबीरांमध्ये नागरिकांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी सहकार्य करावे.
या अनुषंगाने जिल्हास्तरावरील सर्व ग्रामपंचायतींना आपल्या क्षेत्रातील असंघटित कामगारांची नोंदणी ई-श्रम पोर्टलवर करण्यासाठी आपले स्तरावरुन निर्देश देण्यात आले आहेत.
मगांराग्रारोहयो ई-श्रम नोंदणी नोटिफिकेशन:
मगांराग्रारोहयोच्या लाभार्थ्यांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासंदर्भात नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – ई-श्रम यूएएन कार्ड ऑनलाईन नोंदणी (eSHRAM Portal UAN Card Online Registration)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
आदिवासी शबिरी विकास महामंडळ, नाशिक कार्यालय नाशिक यांच्या आदिवासी बांधवांसाठी लाभ घेण्यासाठी योजने बाबतची माहिती पाठवा