वृत्त विशेषनियोजन विभागसरकारी योजनास्पर्धा परीक्षा

Foreign Scholarship : सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत विद्यार्थ्यांना परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरु करणेबाबत शासन निर्णय

महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असून आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीतील मुलामुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना (Foreign Scholarship) लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने मा. मंत्रीमंडळाने दिनांक ०४.०७.२०२३ रोजी घेतलेल्या निर्णयास अनुसरुन याबाबत सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

सारथी गुणवंत विद्यार्थ्यांना परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना – Foreign Scholarship:-

महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रवर्गातील जे गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर पदवी / पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी QS World Ranking मध्ये २०० च्या आत रॅन्कींग असलेल्या शैक्षणिक संस्था / विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश घेतील अशा मराठा, कुणबी , मराठा-कुणबी व कुणबी मराठा प्रवर्गातील एकत्रितपणे ७५ विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

सदरची योजना छत्रपती शाहू महाराज व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या शासनाच्या संस्थेमार्फत “सयाजीराव गायकवाड – सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना – Foreign Scholarship” या नावाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राबविण्यात येईल.

या योजनेची व्याप्ती पुढीलप्रमाणे राहील :-

सदर योजना महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या जातीतील विद्यार्थ्यांकरिता लागू राहील. पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सारथी संस्थेकडून ऑनलाईन स्वरुपात मागवून घेण्यात येतील.

शिष्यवृत्ती शाखा निहाय विभागणी :-

सदर शिष्यवृत्तीसाठी खालीलप्रमाणे शाखा निहाय मर्यादा प्रत्येक वर्षासाठी निश्चित करण्यात आली आहे.

अ.क्र.अभ्यासक्रमाचे नावपदव्युतर पदवी/पदविका (MS/M.Tech)डॉक्टरेट (पीएच.डी.)
अभियांत्रिकी२०
वास्तुकलाशास्त्र
व्यवस्थापन
विज्ञान१०
वाणिज्य / अर्थशास्त्र
कला
विधी अभ्यासक्रम
औषध निर्माण शास्त्र
एकूण५०२५

जर एखादा विषय / अभ्यासक्रम करिता आवश्यक त्या प्रमाणात विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत तर, त्याच विषयामधील पदव्युत्तर पदवी/पदविका ते पीएचडी या दोन्ही मध्ये आंतरबदल करण्याचे अधिकार निवड समितीला असतील. ii) वरील (i) प्रमाणे आंतरबदल करुनही जर एखाद्या विषयाकरिता विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत तर दुसऱ्या विषयाकरिता मंजूर संख्येपेक्षा जास्त विद्यार्थी उपलब्ध होत असतील तर त्याप्रमाणे बदल करण्याचे सर्वाधिकार निवड समितीला राहतील.

(ii) ज्या अभ्यासक्रमासाठी जास्त संख्येने विद्यार्थी उपलब्ध होतील त्या विषयासाठी प्राध्यान्य देण्यात येईल.

शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३० % जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर त्याप्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे सर्वाधिकार निवड समितीला राहतील.

या शासन निर्णयासोबतच्या “परिशिष्ट अ” मध्ये परदेशी शिष्यवृत्ती करीता शाखानिहाय मंजूर करण्यात आलेला अभ्यासक्रम नमूद करण्यात आला आहे. तसेच सदर योजनेच्या सविस्तर अटी व शर्ती, पात्रता/अपात्रता, मिळणारे लाभ, शिष्यवृत्तीच्या लाभासाठी निवड कार्य पध्दती इत्यादीची माहिती सोबतच्या परिशिष्ट ब” मध्ये दर्शविण्यात आलेली आहे.

या योजनेसाठी सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षात रुपये २५.०० कोटी इतका अतिरिक्त नियतव्यय सारथी या संस्थेकडे उपलब्ध असलेल्या अखर्चित निधीतून भागविण्यात येणार आहे.

सदर शासन निर्णय, मा. मंत्रिमंडळाने दिनांक ०४.०७.२०२३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयास अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

सर्वसाधारण अटी व शर्ती :-

१) लाभार्थी हा मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

२) विद्यार्थ्यांला परदेशातील QS world ranking मध्ये २०० च्या आत रँकींग असलेल्या शैक्षणिक संस्था/विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश मिळालेला असावा.

३) विद्यार्थ्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना, पीएचडीसाठी यापूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. तसेच त्यांने अन्य प्रशासनिक विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा.

(४) परदेशातील विद्यापीठ / शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा.

५) एक्झेक्युटीव्ह पदव्युत्तर पदवी किंवा एक्झेक्युटीव्ह पदव्युत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमांस प्रवेशित विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.

६) प्रवेशित अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना नमूद केलेल्या विहीत कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक असेल, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मान्य केली जाणार नाही.

वयोमर्यादा :-

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांची वयाची कमाल ३५ वर्ष आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांच्या वयाची कमाल ४० वर्ष वयोमर्यादा असावी.

उत्पन्न उत्पन्न :-

१) या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे / कुटुबांचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरुन सर्व मार्गांनी मिळणारे मागील आर्थिक वर्षातील वार्षिक उत्पन्न रु. ८.०० लाखापेक्षा जास्त नसावे.

२) विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरीत असतील तर त्यांचे आयकर विवरणपत्र, फॉर्म न. १६ व सक्षम प्राधिकारी (तहसिलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गानी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील..

३) इतर विद्यार्थ्यांसाठी सक्षम प्राधिकारी ( तहसिलदार कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

नियोजन विभाग शासन निर्णय :

  1. सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत विद्यार्थ्यांना परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरु करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  2. महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 चा दुसरा टप्पा – शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु – Apply Online For Maha DBT Scholarship

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “Foreign Scholarship : सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत विद्यार्थ्यांना परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरु करणेबाबत शासन निर्णय

  • Bodake rupali rajkumar

    This is message very important

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.