वृत्त विशेषसरकारी योजना

कोरोनाने निधन झालेल्यांच्या वारसांना ५० हजार सानुग्रह निधीसाठी ऑनलाईन अर्ज करा – MahaCovid19Relief

कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 04.10.2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी प्रसारित केला आहे.

आवश्यक कागदपत्रे:

  • अर्जदाराची 1 आधार कार्ड प्रत.
  • मृत व्यक्तीच्या आधार कार्डाची २ प्रत.
  • जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 अंतर्गत मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र.
  • अर्जदाराचा आधार लिंक केलेला बँक खाते क्रमांक.
  • अर्जदाराच्या खात्याची रद्द केलेली चेक प्रत.
  • मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र.
  • आरटी-पीसीआर अहवाल प्रत किंवा सीटी स्कॅन प्रत किंवा इतर कोणतेही वैद्यकीय दस्तऐवज (पीडीएफ/जेपीजी)(मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध नसताना).

कोरोनाने निधन झालेल्यांच्या वारसांना ५० हजार सानुग्रह निधीसाठी ऑनलाईन अर्ज:

शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने Online web portal विकसित केले असून, याद्वारे कोविड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने खालील लिंकवर लॉगिन करून नोंदणी करणे आवश्यक राहील.

https://mahacovid19relief.in/login

अर्जदारास, त्याच्या आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल.

केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोविड-19 मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी, कोविड-19 मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील.

अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील.

जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग, न्यायिक-2021/प्र.क्र.488/आरोग्य-05, दिनांक 13 ऑक्टोबर, 2021 अन्वये जिल्हास्तर/महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील. अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील.

सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज 7 दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणे करुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे.

अर्जदारांनी केलेल्या अर्जाची छाननी करून अर्ज जिल्हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात येईल. अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत अर्जदाराच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये ₹ ५०,००० सानुग्रह सहायची रक्कम वितरित केली जाईल.

ज्या अर्जदाराचे अर्ज DDMA कडून मंजूर झाले आहेत आणि ज्यांना Payment Credited to your Bank account असा संदेश प्राप्त झाला आहे तथापि रक्कम त्यांचे खात्यात अद्याप जमा झालेली नाही त्याचे करिता  सूचना – १) ज्या अर्जदाराचे बँक खाते क्रमांक 0 ने सुरू झाले असेल अथवा बँक खाते तपशील चुकीचा दिला आहे त्यांचे खात्यात तांत्रिक अडचणी मुळे रक्कम जमा न होता परत आली आहे. अशा अर्जदाराच्या बँक खात्यात आधार क्रमांकाच्या आधारे पुढील 15 दिवसाच्या आत रक्कम जमा करण्यात येणार आहे. २) अर्जदारांनी केलेल्या अर्जाची छाननी करून अर्ज जिल्हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात येईल. अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत अर्जदाराच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये ₹ ५०,००० सानुग्रह सहायची रक्कम वितरित केली जाईल.

हेही वाचा – कोरोनाने निधन झालेल्यांच्या वारसांना मिळणार ५० हजार सानुग्रह मदत; शासन निर्णय जारी

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.