आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभागसरकारी योजनास्कॉलरशिप - शिष्यवृत्तीस्पर्धा परीक्षा

महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !

महाराष्ट्रातील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे—महाराष्ट्र राज्यातील ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था’ म्हणजेच महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना मोफत टॅब (MahaJyoti Free TAB) देण्याची योजना सुरु झाली आहे. ही योजना विशेषतः जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी 2027 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. महाज्योती मार्फत मोफत टॅब (MahaJyoti Free TAB) मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करणे गरजेचे आहे.

महाज्योती म्हणजे काय?

महाज्योती ही एक स्वायत्त संस्था असून ती महाराष्ट्र शासनाच्या मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरवण्यासाठी कार्यरत आहे. ही संस्था विविध प्रकारचे कोर्सेस, स्कॉलरशिप्स, मार्गदर्शन शिबिरे आणि शैक्षणिक सुविधा पुरवते. विद्यार्थ्यांना गुणवत्ता आधारित शिक्षण देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाज्योती सतत प्रयत्नशील आहे.

महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु ! MahaJyoti Free TAB:

महाज्योती मार्फत 2027 मध्ये जेईई (JEE), नीट (NEET) आणि एमएचटी-सीईटी (MHT-CET) परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग टॅबलेट (मोफत टॅब) (MahaJyoti Free TAB) वाटपाची योजना राबवण्यात येत आहे. योजनेचा उद्देश ग्रामीण व शैक्षणिकदृष्ट्या मागास भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी सक्षम करणे हा आहे.

या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना खालील सुविधा मोफत मिळणार आहेत.

  • एक टॅब (Tablet)

  • 6 GB/Day इंटरनेट डाटा
  • अभ्यास साहित्य (PDFs, विडिओ लेक्चर्स, टेस्ट सिरीज)

  • ऑनलाईन कोचिंग प्लॅटफॉर्मवर प्रवेश

योजनेची पात्रता

महाज्योती मार्फत मोफत (MahaJyoti Free TAB) टॅब मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना खालील अटींचे पालन करणे आवश्यक आहे:

  1. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

  2. त्याचा/तिचा समाज मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल घटक (SEBC) किंवा अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) यामध्ये येणारा असावा.

  3. विद्यार्थी 2024-25 मध्ये इयत्ता 10वी उत्तीर्ण होऊन 11वी (सायन्स) मध्ये प्रवेश घेतलेला असावा.

  4. तो/ती जेईई, नीट किंवा एमएचटी-सीईटी 2027 ची तयारी करत असावा.

अर्ज करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे :
  1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)
  2. रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  3. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
  5. १०वी ची गुणपत्रिका
  6. ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट)
  7. दिव्यांग असल्यास दाखला
  8. अनाथ असल्यास दाखला

आजच्या डिजिटल युगात शिक्षण हे अधिकाधिक ऑनलाइन होत चालले आहे. शहरी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोचिंग, टेस्ट सिरीज, ई-बुक्स, विडिओ लेक्चर्स यांचा लाभ सहज मिळतो. पण ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांसाठी हे तितकेसे सहजसोपे नाही.

महाज्योती मार्फत मोफत टॅब (MahaJyoti Free TAB) योजना ही डिजिटल शिक्षणात समता आणण्याचे एक प्रभावी पाऊल आहे. या योजनेतून विद्यार्थ्यांना:

  • ऑनलाईन अभ्यासाची सुविधा मिळते.

  • मार्गदर्शनासाठी डिजिटल कंटेंट मिळतो.

  • सेल्फ स्टडीसाठी भरपूर साधने उपलब्ध होतात.

  • मोठ्या कोचिंग क्लासेसच्या गरजेविना परीक्षा उत्तीर्ण होण्याचा आत्मविश्वास मिळतो.

अभ्यासक्रमात काय समाविष्ट आहे?

महाज्योती जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षांसाठी खास अभ्यासक्रम तयार करत आहे. यात विषयांनुसार:

  • विषयवार लेक्चर्स (विडिओ स्वरूपात)

  • चाचण्या आणि सराव प्रश्नसंच

  • मागील वर्षांचे पेपर्स

  • स्पष्टीकरणासह उत्तरं

हे सर्व टॅबमध्ये प्रीलोडेड स्वरूपात असतील, तसेच इंटरनेटद्वारे नवीन अपडेट्सही मिळणार आहेत.

विद्यार्थ्यांचे फायदे
  • टॅबमुळे वेळ वाचतो.

  • वर्गातील आणि घरी शिकण्यात समतोल राखता येतो.

  • शंका निरसनाची सुविधा.

  • दर्जेदार शिक्षणाची संधी कोणत्याही भौगोलिक मर्यादेशिवाय मिळते.

पालकांनी आपल्या पाल्याचा अर्ज नीट तपासून आणि सर्व कागदपत्रांसह सादर केला आहे का, याची खात्री करून घ्यावी. तसेच, टॅबचा वापर फक्त शिक्षणासाठीच होत आहे याकडे लक्ष ठेवावे. महाज्योती मार्फत मोफत (MahaJyoti Free TAB) टॅब योजना ही एक उत्कृष्ट संधी आहे, विशेषतः अशा विद्यार्थ्यांसाठी जे आर्थिक अडचणींमुळे कोचिंग क्लासेसला जाऊ शकत नाहीत. ही योजना गुणवंत आणि मेहनती विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची समान संधी देते. त्यामुळे सर्व पात्र विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.

अर्ज करण्याची अंतिम दि. २०/०६/२०२५ 

ऑनलाईन अर्ज (MahaJyoti Free TAB Apply Online ) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

संपर्क: अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा : संपर्क क्र. 0712-2870120/21

खालील लेख देखील वाचा!

  1. आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५
  2. MahaDBT Scholarship : महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
  3. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ ऑनलाईन अर्ज सुरु !
  4. संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना : टायपिंग कोर्स केलेल्यांना ६,५०० रुपये अर्थसहाय्य मिळणार !
  5. पंडित दीनदयाळ उपाध्याय शिष्यवृत्ती योजना
  6. दीनदयाल स्पर्श योजना : भारतीय डाक विभागा मार्फत विद्यार्थ्यांना मिळणार ६ हजार रूपये प्रती वर्षी !
  7. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुधारित !
  8. परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल; शासन निर्णय जारी !
  9. सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत विद्यार्थ्यांना परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरु करणेबाबत शासन निर्णय
  10. महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती
  11. महात्मा जोतीराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना
  12. लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट शिष्यवृत्ती
  13. चुकून राईट टू गिव्ह अपचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा मिळणार शिष्यवृत्ती !
  14. एकलव्य आर्थिक सहाय्य योजना – Eklavya Scholarship
  15. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
  16. १ ली ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी १५ ते ७५ हजार एचडीएफसी बँक स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  17. अपार आयडी ‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’ प्रत्येक विद्यार्थ्याला बनवावे लागणार !
  18. कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी अर्थसहाय्याची सुवर्णसंधी!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !

  • Shraddha Balaji Patil

    I need a tab please 🥺

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.