वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनशालेय शिक्षण व क्रीडा विभागसरकारी योजना

महात्मा जोतीराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना – Mahatma Jotirao Phule Merit Scholarship Scheme

विद्यापीठ संलग्नित महाविद्यालय/विद्यापीठ विभागातील पदवी व पदव्युत्तर अव्यवसायिक अभ्यासक्रमास ( विद्यापीठ परिपत्रक ३३/२०२४ मा क्र. सीबी/२५. वि. २१/०२/२०२४ अन्वये घोषित व्यावसायीक अव्यावसायीक अभ्यासक्रमाप्रमाणे प्रवेश घेतलेल्या आर्थिक दुर्बल घटक, गुणवत्ताधारक, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामार्फत उपरोक्त शिष्यवृत्ती /अर्थसहाय्य योजना सुरू केलेल्या आहेत. सदर योजनांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षात प्रवेशित विद्यार्थी विद्यार्थीनी यांच्याकडून संबंधित महाविद्यालय/विद्यापीठ विभाग यांच्यामार्फत ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महात्मा जोतीराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना – Mahatma Jotirao Phule Merit Scholarship Scheme:

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठामार्फत सदर शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे. पदवी व पदव्युत्तर अव्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज (सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ विभागातील एकत्रित) गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातील, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील योजनेस पात्र विद्यार्थ्यांना पुढील निकषानुसार शिष्यवृत्ती योजना लागू राहील.

पदवी अभ्यासक्रमपदव्युत्तर अभ्यासक्रम
शाखाशिष्यवृत्ती रक्कमविद्यार्थी संख्याशिष्यवृत्ती रक्कमविद्यार्थी संख्या
कला6000४७०8000300
वाणिज्य6000४७०8000300
विज्ञान10000४७०16000300

नियम व अटी:

१. सदर योजना अव्यवसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी लागू केलेली असून योजनेसाठी उत्पन्नाची कोणतेही अट राहणार नाही केवळ गुणवत्ता हाच निकष राहील.

२. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांने मागील लगतच्या परीक्षेत किमान ७० टक्के गुण संपादित केलेले असावेत.

३. पात्र विद्यार्थ्यांने वय पदवी अभ्यासक्रमाकरिता २३ व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरीता २५ पेक्षा जास्त नसावे,

४. विद्यार्थ्यांची नियमित अभ्यासक्रमात किमान ७५ टक्के उपस्थिती असणे आवश्यक राहील या संदर्भात प्राचार्यानी दाखला देणे आवश्यक राहील.

५. महाविद्यालय/ विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थ्यांने नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा.

६. विद्यार्थ्यांने व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा.

७. विद्यार्थ्यास गैरशिस्त / नैतिकता/परीक्षेतील गैरप्रकार इ. बाबत शिक्षा झालेली नसावी.

८. विद्याथ्याने त्याच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. उदा. बँकेचे नाव, पत्ता, खाते क्रमांक (एमआयसीआर कोड आणि आयएफएससी कोड).

९. विद्यार्थी भारतीय नागरिक असावा. त्यासाठी नागरिकत्वाचा साक्षांकित दाखला जोडणे आवश्यक राहील.

१०. संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य हे विद्यापीठाचे मान्यताप्राप्त किंवा प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यताप्राप्त असावेत.

११. शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजना लागू राहणार नाही याबाबत संबंधित विद्यार्थ्यांने आणि प्राचार्यांनी एकत्रित हमीपत्र भरून देणे आवश्यक राहील.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत :

वर उल्लेख केलेल्या शिष्यवृत्ती/अर्थसहाय्य योजनाकरीता विहित नियम व अटी विचारात घेऊन पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन (Online) पध्दतीने http://bcud.unipune.ac.in/Scholorships/Applicant/Login.aspx या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक असून आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत Upload करावीत.

हेही वाचा – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना – Kranti Jyoti Savitribai Phule Financial Assistance Scheme

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.