संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना : टायपिंग कोर्स केलेल्यांना ६,५०० रुपये अर्थसहाय्य मिळणार !
शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (Amrut Typing Yojana – GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातीच्या आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनविणे हा या योजनेचा उद्देश आहे.
संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना – Amrut Typing Yojana:
संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण (Amrut Typing Yojana) योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळा मार्फत समकक्ष योजनाचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षीत गटातील जातींचा, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत अशा उमेदवारांना अर्थसहाय्य.
लाभाचे स्वरूप:
1. जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) (कॉम्पुटर टायपिंग मराठी / हिंदी, इंग्रजी ३०, ४०, ५० व ६० शब्द प्रति मिनिट) उत्तीर्ण होतील त्यांना एकरकमी रक्कम रु.६,५००/- (अक्षरी रुपये सहा हजार पाचशे फक्त) प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
2. जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन (मराठी / हिंदी ६०, ८०, १०० व १२० शब्द प्रति मिनिट तसेच, इंग्रजी लघुलेखन ६०, ८०, १००, १२०, १३०, १४०, १५० व १६० शब्द प्रति मिनिट) परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना एकरकमी रक्कम रु.५,३००/- (अक्षरी रुपये. पाच हजार तीनशे फक्त) प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
3. प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अमृत संस्थे मार्फत लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केले जाईल.
4. या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी अनुज्ञेय राहणार नाही.
लाभार्थी पात्रता निकष:
1. अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.
2. लाभार्थ्यांचे वय १६ ते ४० वर्ष दरम्यान असावे.
3. अर्जदाराने या परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याचे स्वयंघोषणापत्र व संस्था चालकांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
4. अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (MSCE) शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत स्वस्वाक्षरीत प्रत सादर करणे बंधनकारक राहील.
5. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये अभ्यासक्रमांसाठी जमा केलेल्या फी / शुल्काची स्वस्वाक्षरीत (Self-attested) पावती आवश्यक आहे.
6. उमेदवाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा तपशिल (बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड) व रद्द केलेल्या चेकची प्रत जोडावी.
टायपिंग कोर्स केलेल्यांना ६,५०० रुपये अर्थसहाय्य मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करा – Apply Online for Amrut Typing Yojana:
अमृतच्या लाभार्थी (Amrut Typing Yojana) निकषांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांनी विहीत नमुन्यामध्ये अमृत संस्थेच्या खालील वेबसाईट ला भेट द्या.
https://app.mahaamrut.org.in/amrut/user/authentication/login
यानंतर लॉगिन युजरनेम आणि पासवर्ड विचारला जाईल यामध्ये आपण नवीन यूजर असल्यामुळे Create an account या पर्यायावर क्लिक करून जी माहिती येईल ती वाचून बॉक्स मध्ये क्लीक करून OK बटनावरती क्लिक करायचे आहे.
यानंतर तुमचा आधार नंबर व मोबाइल नंबर टाकून जनरेट ओटीपी वर क्लिक करा. यानंतर आपल्या आधार संलग्न मोबाईल वरती ओटीपी येईल तो टाकून Verify वरती क्लिक करा.

Verify वरती क्लिक केल्यानंतर नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता ही माहिती आपोआप येईल ती वाचून I Agree वरती क्लिक करून Confirm And Next बटनावरती क्लिक करायचे आहे.
यानंतर पुढच्या पेजवर इमेल आयडी, जिल्हा, तालुका, गाव, धर्म, जात ही माहिती टाकून Sign Up बटनावरती क्लिक करायचे आहे.
Sign Up केल्यानंतर आपण जो इमेल आयडी टाकला आहे त्यावर ओटीपी येईल तो टाकायचा आहे. यानंतर Registration Successfull होईल.
यानंतर आपल्याला लॉगिन करायचा आहे यामध्ये लॉगिन नेम आणि पासवर्ड आपल्या इमेल आयडी वरती आला असेल तो टाकून Sign in या पर्यायावर क्लिक करा.
Sign in केल्यानंतर आपल्याला पासवर्ड बदलायचा आहे त्यासाठी New पासवर्ड व Confrim पासवर्ड टाकून Update Password या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर पुन्हा लॉगिन करायचं आहे यामध्ये नवीन पासवर्ड टाकून Sign in या पर्यायावर क्लिक करा.

Sign in केल्यानंतर आपली माहिती दिसेल ती वाचून Next पर्यायावर क्लिक करा.
यानंतर Personal Details टाकायची आहेत यामध्ये वडिलांचे नाव, आईचे नाव, दुय्यम मोबाईल क्रमांक, रक्त गट, वैवाहिक स्थिती, पॅन नंबर, शिक्षण, व्यवसाय, वार्षिक उत्पन्न ही माहिती टाकून Next पर्यायावर क्लिक करा.
यानंतर Address Details मध्ये Permanent Address टाकून Submit या पर्यायावर क्लिक करा.
यामध्ये आपण भरलेली माहिती Save झालेली आहे यानंतर अर्ज करायचा आहे यामध्ये Schemes या पर्यायावर क्लिक करून AMRUT MSEC GCC TBC या पर्यायावर करा. नंतर Sheme Information वाचून Apply पर्यायावर क्लिक करा.
यानंतर काही सूचना असतील त्या वाचून Ok पर्यायावर क्लिक करा.
यानंतर Hall Ticket वरील माहिती येथे टाकायची आहे म्हणजेच जिथे आपण Exam दिली होती ती माहिती टाकायची आहे यामध्ये Name, Hall center ( District ), subjects व कधी Exam पास झालात ते वर्ष टाकून Next पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
यानंतर बँक डिटेल्स टाकायची आहेत यामध्ये IFSC Code, Account number, Bank Name, Branch Name टाकून Next पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
यानंतर Documents Upload करायची आहेत यामध्ये स्वयंघोषणापत्र, संस्थांचालकांचे स्वयंघोषणपत्र, Fees Paid Receipt, Passing Certificate, Bank Passbook, Educational Qualification Certificate, Aadhar card, Photo, Signature, Domicile Certificate, Domicile Certificate वरील Barcode नंबर, School Leaving Certificate, Income Certificate व त्यावरील Barcode नंबर व घोषणापत्रावर क्लिक करून व त्यावरील ही सर्व माहिती Pdf स्वरूपात Upload करायची आहेत.
पुढे Preview And Submit पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
टिप: संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण (Amrut Typing Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन केलेल्या अर्जाची हार्ड कॉपी (Hard copy) साक्षांकित करून, आवश्यक कागदपत्रे स्वयं-साक्षांकित (self-attested) करुन खालील पत्यावर पाठवावीत. केवळ ऑनलाइन / ई-मेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
खालील लिंक वरून स्वयंघोषणापत्र डाउनलोड करून पूर्ण तपशील भरा आणि संस्थांचालकांचे स्वयंघोषणपत्र यामध्ये ज्या संस्थेतून तुम्ही हि परीक्षा पास झाला आहेत त्याच्याकडून हे स्वयंघोषणापत्र भरून घ्यायचे आहे व स्कॅन करून अपलोड करा.
उमेदवारांचे स्वयंघोषणापत्र: उमेदवारांचे स्वयंघोषणापत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
संस्थांचालकांचे स्वयंघोषणपत्र: संस्थांचालकांचे स्वयंघोषणपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्जाची एक प्रत आवश्यक कागदपत्रांसह स्वस्वाक्षरीत (Self-attested) करून विहित मुदतीत अमृतच्या पुणे येथील कार्यालयास पाठविणे आवश्यक राहील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: व्यवस्थापकीय संचालक, महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन पाचवा मजला, औंध, पुणे-411067.
या लेखात, आम्ही संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना (Amrut Typing Yojana) : टायपिंग कोर्स केलेल्यांना ६,५०० रुपये अर्थसहाय्य! विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख देखील वाचा !
- MahaDBT Scholarship : महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
- हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज !
- नवीन उद्योजकांसाठी मोफत एमएसएमईच्या उद्यम नोंदणी ऑनलाईन कशी करायची? जाणून घ्या सविस्तर.
- FSSAI फूड लायसन्स (फूड परवाना) ऑनलाईन कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
- पीएम स्वनिधी योजना : फेरीवाल्यांना ५०,००० पर्यंत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!