नॉन क्रिमिलेयर दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या !
नॉन-क्रिमिलेयर दाखला कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीसाठी अथवा आरक्षण असलेल्या शासकीय, निमशासकीय,शासन अनुदानित संस्थेत सेवेतील रिक्त जागेसाठी खुल्या अथवा मागासवर्गीय उमेदवारांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र / उमेदवार उन्नत व प्रगत गटात येत नाही.असे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते.
नॉन क्रिमिलेयर दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या !
जर नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र नसेल तर आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. आरक्षणाच्या प्रत्येक अधिनियमात नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र उमेदवाराने द्यावे हि महत्त्वाची बाब आहे. आरक्षणाचा लाभ घेता यावा याकरिता सर्व उमेदवारांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्त करावे. सदर प्रमाणपत्र एका वर्षा करिता ग्राह्य धरण्यात येते. व दर वर्षी ते रिन्यू करावे लागते.
नॉन-क्रिमिलेयर दाखला ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:
नॉन-क्रिमिलेयर दाखला ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकारची” खालील वेबसाईट ओपन करायची आहे.
https://aaplesarkar.mahaonline.gov.in
त्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी (युजर प्रोफाईल) कशी करायची? हे आपण मागील लेखामध्ये पाहिले आहे. रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.
आता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा.
त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला “महसूल विभाग” हा पर्याय निवडायचा आहे.
तसेच उपविभाग मध्ये महसूल सेवा निवडा. हा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचा दाखला, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, मिळकतीचे प्रमाणपत्र असे बरेच पर्याय दिसतील. त्यातील नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र या पर्यायावर क्लिक करायचे आहे, नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्यामधील नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र या ऑपशन वर क्लिक करा.
आता नॉन-क्रिमिलेयर दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे हा ऑपशन येईल तर नॉन-क्रिमिलेयर दाखला काढण्यासाठी पुढील कागदपत्रे आपल्याकडे असणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे:
ओळखीचा पुरावा (किमान -1)
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- आरएसबीवाय कार्ड
- पाणी बिल
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- वाहन चालविणे परवाना
- मनरेगा जॉब कार्ड
- अर्जदाराचा फोटो
- मालमत्ता कराची पावती
- शासकीय किंवा निम शासकीय संस्थांनी दिलेली ओळखपत्र
पत्त्याचा पुरावा (किमान -1)
- पासपोर्ट
- पाण्याचे बिल
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- दूरध्वनी बिल
- वाहन चालविणे परवाना
- वीज बिल
- मालमत्ता कराची पावती
- 7/12 आणि 8 ए / भाड्याची पावती
इतर कागदपत्रे (किमान -1)
- मालमत्ता कराची पावती
- नातेवाईकाच्या जातीचा पुरावा
- वडिलांच्या जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यास, नातेवाईकाचे जातीचे प्रमाणपत्र व नातेसंबंधाच्या तपशिलासह वंशावळीचे प्रतिज्ञापत्र
- अर्जदाराने अन्य राज्य / जिल्ह्यातून स्थलांतर केल्यास अर्जदाराच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र त्या प्राधिकरणाने त्या राज्यात / जिल्ह्यात दिले.
- विवाहित महिला असल्यास, विवाहापूर्वी जातीचा एक पुरावा, क्र. Point मधील विवाहाचा पुरावा – विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि राजपत्रात नाव बदलण्याची अधिसूचना
- अर्जदार मुसलमान असल्यास (खालीलपैकी एकतर कागदपत्र सादर केला जाऊ शकतो) ए / तिच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास तहसीलदारांचा चौकशी अहवाल नोंदणीकृत मुस्लिम संस्थांनी जारी केलेला बी.के.एस.टी. प्रमाणपत्र
अनिवार्य कागदपत्रे (सर्व अनिवार्य)
- उत्पन्नाचा पुरावा
- जातीसाठी प्रतिज्ञापत्र
- स्वत: साठी जातीचा पुरावा
आवश्यक कागदपत्रे पहा आणि त्यानंतर पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.
नॉन-क्रिमिलेयर दाखला अर्ज (Non-Creamy Layer Certificate Form):-
आता नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र हे पेज ओपन होईल, तिथे तुम्हाला एक फॉर्म आलेला असेल (Application Form) या फॉर्ममध्ये दाखवल्याप्रमाणे आपली माहिती भरा.
अर्जदाराचे तपशील:-
नॉन-क्रिमिलेयर दाखला रिन्यू करायचा आहे की नवीन काढायचा आहे ते पहिल्यांदा विचारेल, तेथे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार ऑप्शन सिलेक्ट करा आणि अर्जदाराचे सर्व तपशीलाची माहिती भरा.
लाभार्थी अनुसूचित जाति / वर्ग तपशील:
इथे जात, वर्ग आणि नॉन-क्रिमिलेयर दाखल्याचा कालावधी निवडा.
पूर्वीच्या नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्राचा तपशील (लागू असल्यास):
जर नॉन-क्रिमिलेयर दाखला रिन्यू करायचा असेल तर जुन्या दाखल्याचा नंबर आणि जारी केल्याचे ठिकाण हिथे टाकायचा आहे.
लाभार्थीच्या वडिलांचे / पतीचे तपशील:
लाभार्थीच्या वडिलांचे किंवा पतीचे तपशील हिथे टाईप करा.
उत्पन्न तपशील:
यामध्ये वडील, आई आणि पती/पत्नीचे उत्पन्नचा तपशील द्यायचा आहे.
इतर कौटुंबिक तपशील:
हिथे कौटुंबिक तपशील दिल्या प्रमाणे टाका.
इतर तपशील:
इतर तपशील मध्ये नॉन-क्रिमिलेयर दाखला कोणत्या करणसाठी पाहिजे ते कारण टाका.
कराराचे तपशील:
मी शपथपूर्वक प्रमाणित करतो की मी वर नमूद केलेली माहिती माझ्या माहितीनुसार सत्य आणि अचूक आहे. मी इथे कबुल करतो की ही माहिती नंतर कधी जर चुकीची किंवा खोटी आढळली तर पुढील कायदेशीर कार्यवाही साठी मी जबाबदार आहे.
वरील मजकूर वाचून “मला मंजूर” वर क्लीक करून Save पर्यायावर क्लिक करा.
सेव्ह वर क्लिक केल्यावर तुम्हाला अर्ज नंबर मिळेल. पुढे तुम्हाला फोटो आणि आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करायची आहेत.
त्यानंतर पैसे भरणे हा ऑपशन येईल. यासाठी तुम्ही कोणत्याही (Online Banking/ Credit Card/ Debit Card/ PayTm / ATM / BHIM App / UPI) पद्धतीने पैसे भरू शकता. पैसे भरल्यानंतरच तुमचा अर्ज तत्सम अधिकाऱ्याकडे जाईल.
अर्ज केल्यापासून 21 दिवसात तुम्हाला तुमचा नॉन-क्रिमिलेयर दाखला मिळेल.
हेही वाचा – जातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!