वृत्त विशेष

म्हाडामार्फत राबविण्यात येणा-या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांसाठी अनुज्ञेय चटई क्षेत्रफळ व उत्पन्न मर्यादा सुधारित उत्पन्न गट करण्याबाबत शासन निर्णय जारी

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांच्या वितरणासाठी तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण (मिळकत व्यवस्थापन, विक्री हस्तांतरण आणि सदनिकांची अदलाबदल) विनियम १९८१ चे विनियम १३ (२) वा अन्य कोणत्याही शिर्षाखाली, म्हाडा प्राधिकरणाअंतर्गत म्हाडामार्फत बांधण्यात येणाऱ्या/विकसित अथवा पुनर्विकसित करावयाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिका वा म्हाडाने गृहनिर्माण संस्थेस/वैयक्तीक लाभार्थ्यास वाटप केलेल्या भूखंडावर विकसित वा पुनर्विकसित करावयाच्या/होणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांसाठी अत्यल्प उत्पन्न गट (EWS)/अल्प उत्पन्न गट (LIG)/मध्यम उत्पन्न गट (MIG)/उच्च उत्पन्न गट (HIG) या प्रवर्गासाठी कमाल उत्पन्न मर्यादा व अनुज्ञेय चटई क्षेत्रफळ खालील शासन निर्णयातील संदर्भीय क्र. १ व २ येथील शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आली होती.

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांनी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुषंगाने) निर्गमित केलेल्या दिनांक ११ मार्च २०१७ च्या मागदर्शक सूचनांनुसार परवडणाऱ्या घरांसाठी कमाल उत्पन्न मर्यादा व अनुज्ञेय चटई क्षेत्रफळ निश्चित केले आहे. त्यामध्ये नमूद केलेले अनुज्ञेय चटई क्षेत्रफळ हे राज्यात यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या चटई क्षेत्रफळापेक्षा जास्त आहे. मात्र, यामध्ये उत्पन्न मर्यादा ही प्रस्तावित उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी असली तरी, सन २०२०-२१ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात, महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न हे देशाच्या दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

तसेच, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांचे दरडोई उत्पन्नही देशाच्या दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त आहे. त्यामुळे विहीत प्रवर्गासाठी निश्चित केलेली कमाल उत्पन्न मर्यादा व्यवहार्य ठरत नव्हती. या सर्व बाबींचा साकल्याने विचार करुन अनुज्ञेय चटई क्षेत्रफळ व उत्पन्न गट मर्यादा संदर्भिय क्र. ३ च्या शासन निर्णयान्वये सुधारित करण्यात आली आहे. तथापि, त्यामध्ये काही त्रुटी राहिल्याने संदर्भिय क्र. ३ येथील शासन निर्णयामधील त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने खालील शासन निर्णयातील संदर्भीय क्र. ३ येथील दिनांक २५ मे, २०२२ चा शासन निर्णय अधिक्रमीत करुन सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

म्हाडामार्फत राबविण्यात येणा-या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांसाठी अत्यल्प उत्पन्न गट (EWS)/अल्प उत्पन्न गट (LIG)/मध्यम (MIG)/ उच्च उत्पन्न गट (HIG) या प्रवर्गाकरिता अनुज्ञेय चटई क्षेत्रफळ व उत्पन्न मर्यादा सुधारित उत्पन्न गट:

>

सुधारीत कमाल उत्पन्न मर्यादा व अनुज्ञेय चटई क्षेत्रफळाबाबतच्या खालील शासन निर्णयातील संदर्भीय क्र. ३ येथील शासन निर्णय क्र. प्रआयो -२०१९/प्र.क्र.१२६/गृनिधो -२, दिनांक २५ मे, २०२२ या यान्वये अधिक्रमित करण्यात येत असून, सुधारीत शासन निर्णय पुढीलप्रमाणे आहे.

म्हाडा प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व गृहनिर्माण मंडळांतर्गत अत्यल्प उत्पन्न गट (EWS)/अल्प उत्पन्न गट (LIG)/मध्यम उत्पन्न गट (MIG)/उच्च उत्पन्न गट (HIG) या प्रवर्गासाठी बांधण्यात येणाऱ्या सदनिकांच्या वितरणासाठी तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण (मिळकत व्यवस्थापन, विक्री हस्तांतरण आणि सदनिकांची अदलाबदल) विनियम १९८१ चे विनियम १३ (२) वा अन्य कोणत्याही शिर्षाखाली, म्हाडा प्राधिकरणाअंतर्गत म्हाडामार्फत बांधण्यात येणाऱ्या/विकसित अथवा पुनर्विकसित करावयाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिका वा म्हाडाने गृहनिर्माण संस्थेस/वैयक्तीक लाभार्थ्यास वाटप केलेल्या भूखंडावर विकसित वा पुनर्विकसित करावयाच्या/होणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांसाठी त्याचप्रमाणे म्हाडामार्फत यापूर्वी गृहनिर्माण संस्थाना वाटप केलेल्या भुखंडावर अद्यापही बांधकाम सुरू व्हायचे आहे अशा सर्व गृहनिर्माण संस्थाच्या प्रकल्पांना कमाल उत्पन्न मर्यादा व अनुज्ञेय चटई क्षेत्रफळ खालीलप्रमाणे सुधारीत करण्यात येत आहे.

अ. क्र. उत्पन्न गट सुधारीत कमाल उत्पन्न मर्यादा (रुपये वार्षिक) सुधारीत कमाल उत्पन्न मर्यादा (रुपये वार्षिक) अनुज्ञेय क्षेत्रफळ (निव्वळ चटई क्षेत्र Carpet area
मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे
महानगर क्षेत्र (PMRDA), नागपूर
महानगर क्षेत्र (NMRDA), नागपुर
सुधार प्रन्यास (NIT) प्रदेश तसेच १०
लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या
स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र
उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र
1 अत्यल्प उत्पन्न गट (EWS) रुपये ६,००,०००/- पर्यंत रुपये ४,५०,०००/- पर्यंत ३० चौ.मि. पर्यंत
2 अल्प उत्पन्न गट (LIG) रुपये ९,००,०००/- पर्यंत रुपये ७,५०,०००/- पर्यंत ६० चौ.मि. पर्यंत
3 मध्यम उत्पन्न गट (MIG) रुपये १२,००,०००/- पर्यंत रुपये १२,००,०००/- पर्यंत १६० चौ.मि. पर्यंत
4 उच्च उत्पन्न गट (HIG) कमाल मर्यादा नाही कमाल मर्यादा नाही २०० चौ.मि. पर्यंत

टिप : – या शासन निर्णयानुसार उपरोक्त ४ ही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही तसेच उच्च उत्पन्न गटासाठी कमाल मर्यादा नाही. त्यामुळे अत्यल्प उत्पन्न (EWS) गटातील व्यक्ती चारही गटासाठी (उक्त तक्यातील अनु. क्र. १,२,३ व ४), अल्प उत्पन्न (LIG) गटातील व्यक्ती तीन गटासाठी (उक्त तक्यातील अनु. क्र. २,३ व ४), मध्यम उत्पन्न (MIG) गटातील व्यक्ती दोन गटासाठी (उक्त तक्यातील अनु.क्र. ३ व ४) व उच्च उत्पन्न गट (HIG) गटातील व्यक्ती एका गटासाठी (उक्त तक्यातील अनु. क्र. ४) अर्ज करु शकतात.

गृहनिर्माण विभाग शासन निर्णय :

म्हाडामार्फत राबविण्यात येणा-या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांसाठी अत्यल्प उत्पन्न गट (EWS)/अल्प उत्पन्न गट (LIG)/मध्यम (MIG)/ उच्च उत्पन्न गट (HIG) या प्रवर्गाकरिता अनुज्ञेय चटई क्षेत्रफळ व उत्पन्न मर्यादा सुधारित उत्पन्न गट करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.