मोबाइल दुकानदार जास्त पैसे मागत असेल तर तुमच्या स्मार्टफोनच्या पार्ट्सची खरी किंमत ह्या पोर्टल्सवर चेक करा !
मोबाईल दुरूस्तीसाठी मोबाईल सर्व्हिस सेंटर सोडून इतर कुठेही जाणे हे महागडे काम आहे. पण प्रत्येक कंपनी आपल्या स्पेअर पार्ट्सच्या किंमतीची यादी (Authorized Smartphone parts price) वेबसाइटवर लिस्ट करते. आपण त्या वेबसाईट्स बघणार आहोत.
मोबाईल हा तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल खराब झाल्यावर तुम्ही तुमचे पैसे देण्यास तयार होता. ह्याचाच फायदा मोबाइल दुकानदार घेतात आणि स्पेअर पार्ट्सच्या अवाच्या सव्वा किंमत सांगतात.
मोबाइल दुकानदार जास्त पैसे मागत असेल तर तुमच्या स्मार्टफोनच्या पार्ट्सची खरी किंमत ह्या पोर्टल्सवर चेक करा !
आपणही जास्त विचार न करता मोबाईल दुरुस्त करतो. पण तुम्हाला माहित आहे का की प्रत्येक मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आपल्या वेबसाईटवर स्पेअर पार्ट्सची किंमत प्रकाशित करते. त्याआधारे तुम्ही दुकानदारांशी भाव करू शकता. याविषयी जाणून घेऊया.
मोबाइल पार्ट्सची अधिकृत किंमत असणाऱ्या पोर्टल – Authorized Smartphone parts price :
- सॅमसंग मोबाइल पार्ट्स पोर्टल (Samsung) – सॅमसंग मोबाइल पार्ट्सची अधिकृत किंमत जाणून पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- वनप्लस मोबाइल पार्ट्स पोर्टल (Oneplus) – वनप्लस मोबाइल पार्ट्सची अधिकृत किंमत जाणून पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- विवो मोबाइल पार्ट्स पोर्टल (Vivo) – विवो मोबाइल पार्ट्सची अधिकृत किंमत जाणून पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- ओप्पो मोबाइल पार्ट्स पोर्टल (Oppo) – ओप्पो मोबाइल पार्ट्सची अधिकृत किंमत जाणून पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- एमआय मोबाइल पार्ट्स पोर्टल (Mi) – एमआय मोबाइल पार्ट्सची अधिकृत किंमत जाणून पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- मोटोरोला मोबाइल पार्ट्स पोर्टल (Motorola) – मोटोरोला मोबाइल पार्ट्सची अधिकृत किंमत जाणून पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- पोको मोबाइल पार्ट्स पोर्टल (Poco) – पोको मोबाइल पार्ट्सची अधिकृत किंमत जाणून पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- रियलमी मोबाइल पार्ट्स पोर्टल (Realme) – वनप्लस रियलमी मोबाइल पार्ट्सची अधिकृत किंमत जाणून पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- ऍपल मोबाइल पार्ट्स पोर्टल (Apple) – ऍपल मोबाइल पार्ट्सची अधिकृत किंमत जाणून पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हाला वरील वेबसाइटवर जाऊन तुमचा स्मार्टफोन मॉडेल शोधावा लागेल. स्मार्टफोन मॉडेल शोधल्यानंतर, आपण बदलू इच्छित पार्ट निवडणे आवश्यक आहे. मग तुम्हाला त्या पार्टची अधिकृत किंमत कळेल.
अनेकदा फोन दुरुस्त करणारे दुकानदार अव्वाच्या सव्वा खर्च सांगतात. अशावेळी तुम्ही त्यांना वरील किंमतीच्या आधारे किंमत कमी करण्यास सांगू शकता.
महत्त्वाचे म्हणजे वरील किंमत ही सुटे भागांची किंमत आहे. यात सेवा शुल्क किंवा जीएसटीचा समावेश नाही. त्यामुळे तुमचा खर्च थोडा वाढू शकतो. पण एखादा दुकानदार डिस्प्ले, बॅटरी, मदरबोर्ड किंवा कॅमेरा यांसारखे भाग बदलण्यासाठी दुप्पट किंवा तिप्पट विचारत असेल तर तुम्ही सावध होऊ शकता.
विशेष म्हणजे, कंपनीच्या वेबसाइटवर दर्शविलेले दर कंपनीच्या सेवा केंद्रांना लागू आहेत. त्यामुळे जर स्थानिक दुकानदार जास्त किंमत सांगत असतील तर तुम्ही अधिकृत सर्व्हिस सेंटरवर जाऊन किंमत कमी करू शकता. तसेच, अधिकृत सेवा केंद्र तुमच्याकडून जास्त शुल्क आकारत असल्यास, तुम्ही वरील दर दाखवून त्या सेवा केंद्राकडे तक्रार करू शकता.
हेही वाचा – हरवलेला मोबाइल आता या वेब पोर्टलवरून शोधा – CEIR ची IMEI आधारित नवी सेवा
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!