धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेत सुधारणा
भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षणात मागे पडू नयेत, तसेच उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेणे शक्य व्हावे यासाठी भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधून इयत्ता दहावीच्या कमीत कमी तीन बेंच उत्तीर्ण झालेल्या असाव्यात’ असा निकष निश्चित करण्यात आला आहे. तसेच धनगर समाजातील विद्यार्थ्यांना नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये इयत्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना सर्व टप्यावर प्रवेश देण्याची तरतुद करण्यात आली आहे. सदर निकषामध्ये/तरतुदीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण:
भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे’ या योजनेंतर्गत अनिवार्य निकष मधील क्र. (१) शाळाविषयक निकषामधील क्र. (३) मध्ये ‘नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधून इयत्ता दहावीच्या कमीत कमी तीन बेंच उत्तीर्ण झालेल्या असाव्यात’ असा निकष निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये सुधारणा करुन ‘नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधून इयत्ता दहावीच्या कमीत कमी तीन बेंच उत्तीर्ण झालेल्या असाव्यात अथवा नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाची शाळा सी.बी.एस.सी मान्यताप्राप्त असावी’ अशी सुधारणा करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
तसेच सदरहू योजनेंतर्गत भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये इयत्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना सर्व टप्प्यावर प्रवेश देण्याची तरतुद करण्यात आली असुन त्यामध्ये सुधारणा करुन इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना सर्व टप्प्यावर प्रवेश देण्यास खालील अटींच्या अधिन राहून शासनाची मान्यता देण्यात येत आहे :-
(१) ‘भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे’ या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देताना प्राधान्याने इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा.
(२) सदर योजनेंतर्गत इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गामध्ये विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा.
(३) इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वर्गामध्ये प्रवेश देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे त्या शाळेला सदर योजनेंतर्गत शासनाने मान्यता दिलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या एकूण प्रमाणाच्या १५% पेक्षा जास्त नसावे.
इतर मागास बहुजन कल्याण विभाग :
भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेतील निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – Modi Awas Gharkul Yojana : मोदी आवास घरकुल योजना राबविण्याबाबत, नविन शासन निर्णय जारी!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!