रब्बी हंगामातील धान, भरडधान्य खरेदीची नोंदणी ३० एप्रिलपर्यंत करण्याचे आवाहन !
पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मध्ये धान तसेच भरडधान्य खरेदीकरीता शेतकऱ्यांची NeML पोर्टलद्वारे दि. 11 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.
राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मधील धान खरेदीसाठी दि. 01 मे ते 30 जून, 2022 असा कालावधी निश्चित केला आहे. तसेच भरडधान्य खरेदीकरीता स्वतंत्र सूचना काढण्यात येणार आहेत.
ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत सर्व स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
NeML Portal: https://neml.in
Tel : (+91-22) – 48810500
Fax : (+91-22) – 6647 3154
E-mail: askus@neml.in
रब्बी पणन हंगाम २०२१-२२ मध्ये #धान तसेच #भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांनी NeML पोर्टलद्वारे ३० एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. pic.twitter.com/SrWkDBm6uZ
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 11, 2022
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!