नोकरी भरतीवृत्त विशेष

अमरावती जिल्हा न्यायालयात सफाईगार पदाची भरती २०२२ – District Court Amravati Recruitment 2022

अमरावती जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील “सफाईगार” या पदाकरीता सुधारीत वेतन संरचनेत वेतनस्तर एस -१ रुपये १५,००० – ४७६००/- व अधिक नियमानुसार देय भत्ते या वेतनश्रेणीत, पात्र उमेदवारांकडून ०५ उमेदवारांची निवडसुची आणि ०५ उमेदवारांची प्रतिक्षासुची अशी एकुण १० उमेदवारांची निवडसुची/प्रतिक्षासुची तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

विस्तृत जाहिरात अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा न्यायालय, अमरावतीचे अधिकृत संकेतस्थळावर दिनांक ११/०७/२०२२, दुपारी १२.०० वाजल्यापासुन अर्जाचा नमुना व सुचना उपलब्ध राहिल, जाहिरातीत दिलेल्या नमुन्यातच अर्ज नोंदणीकृत डाक पोच पत्राव्दारे (आर.पी.ए.डी.) किंवा शिघ्र डाक सेवा (स्पिड पोस्ट) पोचपावतीसह या कार्यालयास दिनांक २५/०७/२०२२ रोजी सायंकाळी ०५.०० पर्यंत प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जातील. दिव्यांगाकरीता ०१ पद राखीव ठेवण्यात आले असुन ते नजिकच्या काळात भरण्यात येईल.

अमरावती जिल्हा न्यायालयात सफाईगार पदाची भरती २०२२ – District Court Amravati Recruitment 2022:

जिल्हा न्यायालय, अमरावती आस्थापनेवरील “सफाईगार” या पदाकरिता उमेदवारांची प्रतिक्षा/निवड यादी तयार करण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

>

उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाक पोच पत्राव्दारे (आर.पी.ए.डी.) किंवा शिघ्र डाक सेवा (स्पिड पोस्ट) पोचपावतीसह “सफाईगार पदाकरिता अर्ज” असे लिफाफ्यावर लिहुन प्रबंधक, जिल्हा न्यायालय, अमरावती (यानंतर ज्यास संक्षिप्तपणे “जिल्हा न्यायालय” असे संदर्भत केले आहे.) यांच्याकडे दिनांक २५/०७/२०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत,

या तारखेनंतर आलेले अर्ज अथवा इतर मार्गाने पाठवलेले किंवा लिफाफ्यावर “सफाईगार पदाकरिता अर्ज” असे नमूद न केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. पोस्टाद्वारे झालेला विलंब विचारात घेतला जाणार नाही.

कामाचे स्वरुप :

निवड झालेल्या उमेदवारास जिल्हा न्यायीक विभागांतर्गत कोणत्याही न्यायालयात “सफाईगार” या पदावर नियुक्ती दिली जाईल. नियुक्तीनंतर उमेदवारास न्यायालयाच्या इमारतीतील व निवासस्थानातील प्रसाधनगृहांची इमारतींची व परिसरांची नियमित स्वच्छता व साफ सफाई करणे, निगा राखणे इत्यादी कर्तव्ये पार पाडावी लागतील तसेच अशा उमेदवारांना न्यायालयाच्या आवारातील जागेची निगा राखणे कामी आवश्यक ती सर्व कामे करावी लागतील. सफाईगार हे पद एकाकी असून, पदोन्नतीच्या संधी उपलब्ध असतीलच असे नाही. याबाबतची नोंद घ्यावी,

 उमेदवारांना सूचना :

१. जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्या – त्या विभाग/कार्यालय प्रमुखाची लेखी परवानगी घेवुनच अर्ज करावा, अशी परवानगी मुलाखतीच्या वेळी सादर करावी. उमेदवारांनी आपले अर्ज आपआपल्या विभाग/कार्यालय प्रमुखांमार्फत पाठविण्याची आवश्यकता नाही.

२. उमेदवाराने जर निवड प्रक्रियेच्या संदर्भात स्वत: किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांना अथवा न्यायिक विभागाच्या अधिका-यांना/ कर्मचा-यांस भेटण्याचा किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यास अपात्र ठरविण्यात येईल या बाबतीत निवड समितीचा निर्णय अंतीम राहील.

३. अर्जाचा नमुना व सोबतच्या प्रमाणपत्रांचे नमुने जिल्हा न्यायालय, अमरावतीचे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या नमुन्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे सादर करावीत.

४. उमेदवाराने अन्य कोणतेही प्रमाणपत्र अथवा प्रमाणपत्रांच्या प्रती अर्जास जोडू नयेत.

५. उमेदवाराने त्याचे/तिचे अलीकडचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (फोटो) अर्जावर दिलेल्या जागी लावुन त्यावर अशाप्रकारे स्वाक्षरी करावी की त्यातील काही भाग छायाचित्रावर आणि अर्जावर सुध्दा येईल.

६. उमेदवाराने दोन सम्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करावेत. तसेच त्यांचे विरुद्ध कुठल्याही न्यायालयात कुठलाही फौजदारी खटला निकाली/चालू किंवा प्रस्तावित नसल्याचे प्रमाणित करावे. असल्यास त्याचा तपशिल द्यावा

७. विहित नमुन्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरविणेत येईल.

८. निवड समिती योग्य ते निकष लावुन अर्हता/योग्यतेच्या आधारे सफाईगार पदासाठी अल्पसूची तयार करेल व अशी तयार केलेली अल्पसूची जिल्हा न्यायालय, अमरावती येथील सुचना फलक व संकेतस्थळावर प्रसिध्द करेल.

९. अशी अल्पसूची तयार करण्याचे किंवा आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार निवड समितीकडे राखूनठेवलेले आहेत.

१०. सफाईगार पदासाठी अल्पसुचीत नमुद उमेदवारांची २० गुणांची चाफल्य व साफसफाई कामाचे मूल्यमापन परिक्षा घेण्यात येईल.

११. सफाईगार पदासाठी चाफल्य व कामाचे मुल्यमापन परिक्षेतील गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची २० गुणांची तोडी मुलाखत घेण्यात येईल.

१२. उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरीता परिक्षा व मुलाखतीस बोलविल्यास स्वखर्चाने हजर रहावे लागेल.

१३. सेवाप्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात काही कारणाने बदल झाल्यास किंवा अन्य महत्वाची सुचना असल्यास त्याची माहिती जिल्हा न्यायालयाच्या सुचना फलकावर व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. परंतु तो बदल वैयक्तिकरित्या कळविण्यात येणार नाही.

१४. वयाच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परिक्षेचा दाखला आवश्यक राहील.

सेवाप्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक खालील प्रमाणे असेल

१. दिनांक २५/०७/२०२२ रोजी ५.०० वाजेपर्यंत अर्ज स्विकारण्याची अंतिम वेळ राहील.

२. दिनांक १२/०८/२०२२ रोजी निवड समिती योग्य ते निकष लावुन / योग्यतेच्या आधारे सफाईगार पदासाठी अल्पसुची तयार करेल व अशी अल्पसूची न्यायालय, अमरावती येथील सुचना फलकावर, संकेतस्थळावर प्रसिद्ध करेल.

३. दिनांक १२/०८/२०२२ रोजीमध्ये नांव असलेल्या उमेदवारांनी दिनांक १६/०८/२०२२ ते दिनांक २६/०८/२०२२ या कालावधीत कार्यालयीन वेळेमध्ये शैक्षणिक कागदपत्रांच्या सत्यप्रती फोटो ओळखपत्र (जसे आधार कार्ड, पैन कार्ड, वाहन परवानाची प्रत इत्यादी) दोन सन्माननीय व्यक्तींनी उमेदवाराचे चारित्र्य चांगले असल्याबाबात दिलेले मूळ दाखले, शासनाने विहीत केलेल्या प्राधिका-याने दिलेला जातीचा दाखला (जेथे लागू असेल तेथे), कुटुंब लहान असल्याबाबतचे मुळ प्रतिज्ञापत्र (नमुना अ), उमेदवार शासकीय सेवेत असल्यास विभागाचे ना – हरकत प्रमाणपत्र समक्ष हजर करावे व ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे,

४. दिनांक २७/०८/२०२२ ते २८/०८/२०२२ दरम्यान सफाईगार पदासाठी २० गुणांसाठी चाफल्य व साफसफाई परिक्षा सकाळी १०.०० ते दुपारी ०६.०० यावेळेत घेण्यात येईल.

५ . दिनांक २९/०८/२०२२ रोजी सफाईगार पदासाठी तोंडी मुलाखती करिता पात्र झालेल्या उमेदवारांची यादी व मुलाखतीचे वेळापत्रक जिल्हा न्यायालय, अमरावती येथील सुचना फलकावर व संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत येईल.

६. दिनांक ३०/०८/२०२२ रोजी सकाळी ११.०० पासून जिल्हा न्यायालय, अमरावती येथे तोंडी मुलाखत घेण्यात येईल,

महत्वाच्या सूचना :

१.  “नोंदणी क्रमांक” हा अर्जातील रकाना कार्यालयाव्दारे भरण्यात येईल.

२. अर्जाचा नमुना जिल्हा न्यायालय, अमरावती यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याप्रमाणेच असावा.

३. प्रतिक्षा यादी प्रसिध्द झाल्यापासुन ती फक्त ०२ वर्षाच्या कालावधीपर्यंत वैध राहील.

४. ओळखपत्र असल्याशिवाय चाफल्य परिक्षा व मुलाखतीस हजर राहण्यास परवानगी मिळणार नाही.

५. उमेदवाराने स्वतःचा पूर्ण पत्ता पिनकोडसह व भ्रमणध्वनी (असल्यास) लिहीलेला व रु.२५/- चे पोस्टाचे तिकीट चिकटवलेला लिफाफा स्वत: चा पत्ता लिहीलेला आर.पी.ए.डी. च्या पोहोच पावतीसह अर्जासोबत जोडावा.

वेतनश्रेणी : ७ व्या वेतन आयोगानुसार वेतनस्तर एस -१ या सुधारित वेतन संरचनेत रुपये १५,०००/- व नियमानुसार देय भत्ते.

एकूण जागा: निवड/प्रतिक्षा यादीसाठी सफाईगार पदाची संख्या ०५ + ०५ = 10 जागा

पदाचे नाव:सफाईगार

अर्हता: प्रकृतीने सुदृढ असावा.

वयाची अट: या जाहिरातीच्या दिवशी उमेदवार १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा.  सर्वसाधारण प्रवर्गाकरीता 38 वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा व मागासवर्गीय असल्यास 43 वर्षापिक्षा जास्त नसावा. 11 जुलै 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: अमरावती

फी: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2022 (05:00 PM)

जाहिरात (Notification) आणि अर्ज (Application Form): जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 445 जागांसाठी भरती – Mazagon Dock Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.