डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना (Krishi Swavalamban Yojana) ही अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
कृषी स्वावलंबन योजना – Krishi Swavalamban Yojana:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Krishi Swavalamban Yojana) कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाची योजना आहे. कृषि स्वावलंबन (Krishi Swavalamban Yojana) योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक सिंचन सुविधांची निर्मिती करणे आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य पाण्याची सुविधा मिळेल आणि त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल व ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.
अनुदान:
कृषि स्वावलंबन (Krishi Swavalamban Yojana) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानांची सुविधा उपलब्ध आहे.
- नवीन विहीर: 2 लाख 50 हजार
- जुनी विहीर दुरुस्ती: 50 हजार
- इनवेल बोअरिंग: 20 हजार
- पंप संच: 20 हजार (10 अश्वशक्ती क्षमतेच्या विद्युत पंप संचासाठी 100% अनुदान)
- वीजजोडणी आकार: 10 हजार
- शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण: 1 लाख
- सूक्ष्म सिंचन संच:
- ठिबक सिंचन संच: 50 हजार
- तुषार सिंचन संच: 25 हजार
पॅकेजेस – कृषि स्वावलंबन (Krishi Swavalamban Yojana) योजनेअंतर्गत विविध पॅकेजेस उपलब्ध आहेत:
- नवीन विहीर पॅकेज: या पॅकेजमध्ये नवीन विहीर, पंप संच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच, आणि आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग यांचा समावेश आहे.
- जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज: यामध्ये जुनी विहीर दुरुस्ती, पंप संच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच, आणि आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग यांचा समावेश आहे.
- शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण: या पॅकेज अंतर्गत शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यात येते.
पात्रता:
कृषि स्वावलंबन (Krishi Swavalamban Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटी पूर्ण कराव्या लागतात:
- लाभार्थी अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकरी असावा.
- जात प्रमाणपत्र असावे.
- नवीन विहीरचा लाभ घेण्यासाठी किमान 0.40 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
- सामुहिक शेतजमीन किमान 0.40 हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब लाभ घेऊ शकते.
- इतर घटकांसाठी किमान 0.20 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
- कमाल शेतजमीन 6.00 हेक्टरआहे.
- 7/12 दाखला आणि 8 अ उतारा आवश्यक आहे.
- आधार कार्ड आवश्यक आहे.
- बँक खाते आधार कार्डाशी संलग्न असावे.
- स्व. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य.
- वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार पेक्षा कमी असावे.
- उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांकडून मिळवावा लागेल.
- ग्रामसभेची शिफारस आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करावी लागतात:
- 7/12 दाखला आणि 8 अ उतारा
- 6 ड उतारा (फेरफार)
- जात प्रमाणपत्र
- तहसीलदारांकडील उत्पन्नाचा दाखला
- आधार कार्डाची छायांकित प्रत
- बँक पासबुकाची छायांकित प्रत
ऑनलाईन अर्ज (Apply Online):
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन (Krishi Swavalamban Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करु शकता.
https://mahadbt.maharashtra.gov.in/
ऑनलाईन अर्ज भरण्यावर लाभार्थीची निवड लॉटरी पद्धतीने होते, सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय समितीकडून मंजूरी मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना अनुदान मिळेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (Krishi Swavalamban Yojana) ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी आहे, ज्यामुळे त्यांच्या शेतीतील उत्पन्न वाढण्यास मदत होईल. कृषि स्वावलंबन (Krishi Swavalamban Yojana) योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक साधन-संपत्ती उपलब्ध करून देण्यात येते, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल. तरी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांनी कृषि स्वावलंबन (Krishi Swavalamban Yojana) योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहित पद्धतीने अर्ज करावेत. कृषि स्वावलंबन (Krishi Swavalamban Yojana) योजनेतून आपल्या शेतीला कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावेत.
या लेखात, आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Krishi Swavalamban Yojana) कृषी स्वावलंबन योजना विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख देखील वाचा !
- सिंचन विहीर ५ लाख रुपयांच्या अनुदानासाठी असा करा ऑनलाईन अर्ज!
- मनरेगा संबंधित तक्रार आणि सुचना ऑनलाईन नोंदवा ! Register MNREGA related complaints and suggestions online!.
- नवीन विहीर योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा!
- विहीर पुनर्भरण योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा!
- मनरेगा अंतर्गत शेततळे अनुदान योजना!
- मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर अनुदान योजना
- प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना; सौर कृषी पंपांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
- पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
- मागेल त्याला सौर कृषी पंप योजना; असा करा ऑनलाईन अर्ज!
- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४; आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज!
- कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी सुरु; असा करा ऑनलाईन अर्ज ! – Kusum Solar Pump Yojana Online Registration
- सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !
- मागेल त्याला योजना : फळबाग /ठिबक/ तुषार सिंचन/ शेततळे/ शेततळयाचे अस्तरीकरण/ शेडनेट/ हरितगृह/ आधुनिक पेरणीयंत्र (BBF) /कॉटन श्रेडर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!