आपल्या बंद झालेल्या बँक खात्यातूनही पैसे काढू शकता; पाहा त्यासाठीचे नियम आणि प्रक्रिया
अनेकदा ग्राहक एकापेक्षा अधिक बँकेत खाते उघडते. दरवर्षी बँकांमध्ये निष्क्रिय खात्यांमधील रकमेची संख्या वाढत जात आहेत. काही वेळा लोकांना वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडावी लागतात. मात्र नंतर जर त्या बँकेतील खात्यामध्ये दीर्घ काळ कोणताही व्यवहार झाला नाही, तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) नियमानुसार, त्या खात्यातील रक्कम ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीत जाते.
रिझर्व्ह बँकेकडे असलेली ही रक्कम दर वर्षी वाढत असून आता ती सुमारे ४० हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दीर्घ काळ व्यवहार न झालेल्या खात्यात शिल्लक पैसे असतील, तर ते कसे काढण्यासाठी एक प्रक्रिया आहे.
रकमेच्या माहितीसाठी आपल्या बँकेशी संपर्क करा:
ज्या निष्क्रिय खात्यातून पैसे काढण्यासाठी बँकेत जाऊन संपर्क साधावा लागेल. तिथे तुम्हाला ‘आधार कार्ड’, ‘पॅन कार्ड’, जन्मतारीख सांगावी लागेल. तुम्ही खातेदार किंवा त्यांचे नामनिर्देशित ( नॉमिनी ) असल्याची पुष्टी झाल्यावर बँक खात्यातील रकमेबद्दल सूचित करते. अनेक बँका त्यांच्या वेबसाइटवर ही माहिती देतात. अशा परिस्थितीत बँकेत एकदा जाऊन पाहणे योग्य ठरेल.
‘केवायसी ‘ करा
अर्थतज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही स्वतः खातेदार असाल, तर बँक अधिकारी आवश्यक कागदपत्रे घेऊन आणि सामान्य चौकशी केल्यानंतर निष्क्रिय बँक खात्यात पडलेले पैसे व्याजासह परत करतात. जर खातेधारकाऐवजी नॉमिनीला पैसे काढायचे असतील, त्यासाठी एक वेगळी प्रक्रिया आहे. या प्रकरणात नॉमिनीला खातेधारकाबरोबर बँकेत जावे लागेल. खातेदार मरण पावला असेल, तर त्याचे मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. यानंतर, तो खात्यातील रक्कम नॉमिनीला व्याजासह परत करेल.
पंधरा दिवसांत काम:
खातेदाराचा मृत्यू झाला असेल आणि त्याने कुणालाही नामनिर्देशित केले नसेल, तर खातेधारकाचे पासबुक आणि इतर कागदपत्रांसह बँकेशी संपर्क साधावा लागेल. यानंतर मोठी रक्कम काढण्यासाठी वारस प्रमाणपत्र आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र बँकेत जमा करावे लागेल. यानंतर बँक व्यवस्थापन, अर्जदाराच्या अर्जावर समाधानी झाल्यानंतर दावा केलेली रक्कम १५ दिवसांत परत करते.
नामनिर्देशन नक्की करा:
खातेधारकाची मुदत ठेव अथवा रिकरिंग डिपॉझिट खाते असेल आणि त्यात आठ वर्षे व्यवहार केले नसतील, तर ते निष्क्रिय घोषित केले जाते. बचत खाते आणि चालू खात्यासाठी ही मुदत फक्त दोन वर्षे आहे. त्यानंतर ती खाती निष्क्रिय घोषित केली जातात. त्यामुळे खाती निष्क्रिय होणे टाळण्यासाठी खात्यात व्यवहार सुरू ठेवा. एकापेक्षा जास्त खाती सुरू ठेवायची नसतील, तर अर्ज देऊन ती बंद करा. असे केले, तर त्यातील पैसे परत मिळतील.
हेही वाचा – आपल्या पंतप्रधान जन धन बँक खात्याची शिल्लक अशी तपासा
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!