ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि ज़िल्हा परिषदच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी पहा ऑनलाईन

आपण या लेखामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि ज़िल्हा परिषदच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची त्याची सविस्तर माहिती घेऊया. हि यादी पाहायला तुम्हाला पंचायत समिती मध्ये किंवा ग्रामपंचायती मध्ये जाण्याची गरज नाही , तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ती यादी पाहू शकता.

ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि ज़िल्हा परिषदच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी पहा ऑनलाईन:

सर्व प्रथम खालील नरेगाची वेबसाइट ओपन करा. हे तुम्ही मोबाईल मध्ये क्रोम ब्राउजर मध्ये हि करू शकता.

https://nrega.nic.in/netnrega/home.aspx

वेबसाइटओपन केल्यानंतर Panchayats(GP/PS/ZP) या ऑपशन वर क्लिक करा.

आता तुम्हाला खालील Panchayats ऑपशन दिसतील त्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती किंव्हा जिल्हा पंचायत वर क्लिक करून त्यांच्या योजना पहा.

  • ग्रामपंचायती(Gram Panchayats)
  • पंचायत समिती / ब्लॉक पंचायत / मंडळ(Panchayat Samiti/ Block Panchayat/ Mandal)
  • जिल्हा पंचायत(Zilla Panchayats)

ग्रामपंचायत (Gram Panchayat):

ग्रामपंचायत या पर्यायावर जर क्लिक केलात तर खालील विविध पर्याय दिसतील, त्यामध्ये Generate Reports हा पर्याय निवडा.

  • डेटा एंट्री – नोंदणी, कामाचे वाटप, नवीन कामे, मस्टर रोल, यूसी(Data Entry – Registration,Work allotment, New works , Muster Roll , UC)
  • अहवाल व्युत्पन्न करा – जॉब कार्ड, जॉब स्लिप, एमएसआर रजिस्टर, प्रलंबित कामे, यूसी(Generate Reports – Job Card, Job Slip , MSR Register , Pending Works, UC)
  • पंचायत विकास अधिकारी / पंचायत सचिव यांनी वेजलिस्ट अधिकृत करा(Authorize WageList By Panchayat Development Officer/Panchayat Secretary)
  • ग्राम प्रधान / अध्यक्षांद्वारे बँक / पोस्ट ऑफिसला वेजलिस्ट पाठवा(Send WageList To Bank/PostOffice By Gram Pradhan/President)

ब्लॉक पंचायत (Block Panchayat):

ब्लॉक पंचायत या पर्यायावर जर क्लिक केलात तर खालील विविध पर्याय दिसतील, त्यामध्ये Generate Reports हा पर्याय निवडा.

  • डेटा एंट्री – नवीन कामे, मस्टर रोल, यूसी(Data Entry – New works , Muster Roll , UC)
  • अकाउंटंटद्वारे एफटीओ निर्मिती(Generation of FTO by Accountant)
  • संयुक्त पीओद्वारे एफटीओ मंजूर करा आणि बँकेत पाठवा(Approve and send FTO to Bank by Joint PO)
  • अहवाल तयार करा – एमएसआर रजिस्टर, प्रलंबित कामे, यूसी(Generate Reports – MSR Register ,Pending Works, UC)

जिल्हा पंचायत (Zilla Panchayat):-

जिल्हा पंचायत या पर्यायावर जर क्लिक केलात तर खालील पर्याय दिसतील, त्यामध्ये Generate Reports हा पर्याय निवडा.

  • डेटा एंट्री – नवीन कामे, मस्टर रोल, यूसी(Data Entry – New works, Muster Roll, UC)
  • अहवाल तयार करा – एमएसआर रजिस्टर, प्रलंबित कामे, यूसी(Generate Reports – MSR Register, Pending Works, UC)

त्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे.आपल्या राज्याच्या नावावर क्लिक करा.

राज्य निवडल्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षाची यादी पाहिजे ते वर्ष निवडा, नंतर तुमचा जिल्हा, तालुका गावाचे नाव निवडून Prossed या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.

आता तुम्हला विविध पर्याय दिसतील त्यामध्ये ज्या योजनेची माहिती पाहिजे त्यावर क्लिक करा.

हेही वाचा – महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जॉब कार्डसाठी अर्ज कसा करायचा? जॉब कार्ड यादी मध्ये ऑनलाईन नाव तपासा

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!