वृत्त विशेषविधी सेवासरकारी कामेसरकारी योजना

मोफत विधी सेवा योजना : कोर्टात तुमची बाजू मांडण्यासाठी मोफत वकील कसा मिळवायचा? जाणून घ्या सविस्तर

निर्धारित निकषात बसत असलेल्या व्यक्तींना उच्च न्यायालय विधी सेवा उप-समिती व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने मोफत कायदेविषयक मदत दिली जाते. गरीब, असहाय्य, दुर्दैवी, अनाथ यांच्यासाठी कोर्टात लढणे हे महागडे काम आहे. वर्षानुवर्षे चालणारा  खटला, तारखांवर तारखा मिळणे यामुळे तसेच न्यायालयीन शुल्क इत्यादींचा भार उचलता येत नाही. पैसे नाहीत म्हणून कुणीही न्यायापासून वंचित राहू नये, हा मोफत विधी सेवा योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणकडे अर्ज करावा लागतो, त्यानंतर पात्र अर्जदारांना सरकारच्यावतीने मोफत वकील दिला जातो. तसेच, इतर कायदेविषयक सेवा व खर्चदेखील दिला जातो. तातडीच्या प्रकरणात अर्जाशिवायही मोफत विधी सेवा दिली जाते.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA – National Legal Services Authority):

भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये मोफत कायदेशीर मदत मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. केंद्र सरकारने 42वी घटनादुरुस्ती कलम 39A द्वारे 1987 मध्ये समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण कायदा, 1987 आणला. या कायद्याद्वारे 9 नोव्हेंबर 1995 रोजी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) अस्तित्वात आले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) कायद्याच्या कलम 12 मध्ये पीडितांना मोफत कायदेशीर सेवांची तरतूद करणे बंधनकारक आहे.

मोफत विधी सेवांसाठी पात्रता:

 • महिला व १८ वर्षे वयापर्यंतची बालके,
 • अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिक,
 • कारागृहात व पोलिसांच्या ताब्यात असलेले आरोपी,
 • मानवी तस्करी, शोषण व वेठबिगारीचे बळी ठरलेले व्यक्ती.
 • औद्योगिक कामगार, मनोरुग्ण व दिव्यांग व्यक्ती.
 • पूर, भूकंप आदि नैसर्गिक आपत्ती, औद्योगिक आपत्ती जातीच हिंसापीडित व्यक्ती.
 • तीन लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले व्यक्ती.

यासाठी केली जाते मदत:

 • कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन,
 • कायदेशीर प्रक्रियेत वकिलाद्वारे प्रतिनिधित्व.
 • खटल्यासाठी मसुदा तयार करणे.
 • मसुदा लेखन, कोर्ट शुल्क, समन्स खर्च व इतर प्रकारचे प्रासंगिक खर्च
 • सर्वोच्च न्यायालयात कैद्यांची कागदपत्रे पाठविण्याकरिता मदत.
 • उच्च न्यायालयात अपील व जामीन अर्ज दाखल करण्यासाठी मदत.
 • कायदेविषयक वाद तडजोडीने सोडविणे.

मोफत कायदेशीर सेवेसाठी कोणाशी संपर्क साधावा? 

मोफत कायदेशीर सेवेसाठी संपर्क साधताना केसच्या व्याप्ती/स्तरानुसार खालील प्रमाणे संपर्क साधावा. ज्यांना मोफत कायदेशीर सेवांचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी प्रथम या संस्थांच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून त्यांच्या प्रकरणाची व्याप्ती जाणून घेणे आवश्यक आहे.

 • तालुका विधी सेवा समिती ही तालुक्याच्या न्यायालयांमध्ये आहे.
 • जिल्हा न्यायिक सेवा संस्था जिल्हा न्यायालयांमध्ये स्थित आहे.
 • राज्य विधी सेवा प्राधिकरण संबंधित राज्यांमध्ये अस्तित्वात आहे.
 • उच्च न्यायालय विधी सेवा समिती संबंधित राज्य उच्च न्यायालयाच्या आवारात आहे.
 • सुप्रीम कोर्ट विधी सेवा समिती ही सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातच आहे.

ऑनलाईन अर्ज (Apply Online):

 • महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
 • राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

वरील पोर्टल वरून ऑनलाईन अर्ज करा किंवा ऑफलाईन अर्ज तुमच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या न्यायालयात कायदेशीर सेवा संस्थेच्या अधिकार्‍यांसह अर्ज सबमिट करू शकता. तुम्हाला कायद्यानुसार अर्ज मिळाल्याच्या एका आठवड्याच्या आत तुमचा अर्ज विचारात घ्यावा लागेल आणि तुम्ही पात्र असाल तर एका आठवड्यात निर्णय घ्यावा आणि तुम्हाला वकील द्यावा लागेल.

विधी सेवा प्राधिकरणांच्या पॅनलमधील वकिलांना मोफत कायदेविषयक सेवा पुरविण्याकरिता मानधन देण्यात येते. त्यामुळे पॅनलमधील वकील या योजनेतर्गत सेवा देताना पक्षकाराकडून फी स्वीकारू शकत नाही, तसे केल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येते. नागरिकांनी त्यांच्याकडे पैसे नसल्यास गप्प बसून अन्याय सहन करू नये. त्यांनी मोफत विधी सेवेचा लाभ घ्यावा.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण संपर्क:

105, उच्च न्यायालय (PWD) इमारत, फोर्ट, मुंबई – 400 032.
दूरध्वनी: ०२२-२२६९१३९५ / २२६३ १३५८ फॅक्स: ०२२-२२६७ ४२९५ टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक: 1800 22 23 24
ईमेल: mslsa-bhc@nic.in

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण संपर्क:

जैसलमेर हाऊस, 26, मान सिंह रोड, नवी दिल्ली-110011
पीएच. क्र.-011- 23382778, 23071450 फॅक्स क्रमांक- 011-23382121

हेही वाचा – शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणारी सलोखा योजना – Salokha Yojana

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.