आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेष

IRCTC वर ऑनलाईन ट्रेन तिकीट बुकिंग कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर

ऑनलाईन ट्रेन तिकीट बुकिंग करण्यासाठी सर्व प्रथम युजर लॉगिन रजिस्ट्रेशन करणे महत्वाचे आहे. आपण मागील लेखामध्ये तिकीट बुकिंग साठी IRCTC चे रजिस्ट्रेशन कसे करायचे हे पाहिले, तर या लेखामध्ये रेल्वेचं ऑनलाईन बुकिंग कसे करायचे ते पाहूया.

ऑनलाईन ट्रेन तिकीट बुकिंग करण्याची प्रोसेस:

सर्वात प्रथम खालील लिंकवर क्लिक करून IRCTC ची वेबसाईट ओपन करा.

https://www.irctc.co.in/

IRCTC वेबसाईट ओपन झाल्यावर Login या पर्यावर क्लिक करा.

IRCTC चे रजिस्ट्रेशन करताना जो User Name आणि Password टाकला होता तो टाकणे व कॅप्चा कोड टाकून Sign In बटन वर क्लिक करा.

त्यानंतर “आपले तिकिट बुक करा” (BOOK TICKET) असे पेज ओपन होईल. नंतर आपल्या इच्छित स्थानापासून – स्थानकापर्यंत, प्रवासाची तारीख आणि प्रवासाचा वर्ग निवडायचा आहे.

जर आपल्याकडे प्रवासाची कोणतीही निश्चित तारीख नसेल तर “Flexible With Date” हा पर्याय निवडा.

दिव्यांग प्रवाश्यांनी संबंधित लाभ घेण्यासाठी “Divyaang Concession” पर्याय निवडावा.

ट्रेनची यादी शोधण्यासाठी, “Search” या पर्यायावर क्लिक करा.

BOOK TICKET
BOOK TICKET

त्यानंतर पुढील पेजमध्ये आपल्याला आपण निवडलेल्या मार्गासाठी उपलब्ध असलेल्या गाड्यांची यादी दर्शवितो.

जर आपल्याला मार्ग आणि वेळ जाणून घ्यायचे असल्यास ट्रेनच्या नावावर क्लिक करा. ट्रेन यादीमधून जर ट्रेन निवडण्यासाठी, निवडलेल्या वर्गातील प्रकारावर क्लिक करा.

ट्रेन (Availability) उपलब्धता व भाडे मिळविण्यासाठी “उपलब्धता तपासा व भाडे” टॅबवर क्लिक करा. हे भाडे निवडलेल्या वर्गाच्या प्रकारानुसार एकट्या प्रौढ प्रवाशाचे असते. निवडलेल्या ट्रेनमध्ये ई-तिकिट बुक करण्यासाठी “BOOK NOW ” या बटणावर क्लिक करा.

त्यानंतर प्रवासी आरक्षण पेज दिसेल त्यामध्ये ट्रेनचे नाव, स्टेशनची नावे, पेजच्या डाव्या बाजूस दर्शविलेले वर्ग आणि प्रवासाची तारीख आपण निवड केलेलीच असते.

त्यानंतर प्रवाश्यांची नावे, वय, लिंग, कोच इत्यादींचा तपशील भरा. प्रवासी नावांची कमाल लांबी 16 वर्णांपर्यंत मर्यादित करावी.

जर ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठीची वयोमर्यादा आहे. ( ज्येष्ठ नागरिक पुरुषांसाठी ६० वर्षे आणि त्याहून अधिक आणि 58 वर्षे आणि त्याहून अधिक वर्षे महिला) पुरुष भाड्याच्या 40% आणि महिला भाड्याच्या 50% सवलत मिळवू शकतात. त्यासाठी ड्रॉप डाऊन सूचीमधून मिळणारी सवलत निवडायची आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या प्रवासादरम्यान वयाचा मूळ पुरावा मूळ घेऊन जाण्याची विनंती केली जाते.

आपल्या आवश्यक कोचचे वाटप उपलब्धतेवर अवलंबून असते. तसेच प्रवासासाठी वेगवेगळे बोर्डिंग स्टेशन निवडण्यासाठी “Change Boarding Station” पर्याय (पेजच्या उजवीकडे उपलब्ध) वापरला जातो.

अचूक तपशील दिल्यानंतर “Continue Booking” या बटणावर क्लिक करा.

जर आपल्याला ट्रेन, क्लास, कोटा इत्यादींशी संबंधित माहिती पाहिजे असेल तर “Replan Booking” बटण यावरती क्लिक करा. तिकिट तपशील, एकूण भाडे (जीएसटी व सुविधा शुल्कासह) आणि उपलब्धता विशिष्ट वेळी स्क्रीनवर दिसतात.

तसेच प्रवाशांशी संबंधित कोणतीही माहिती बदलण्यासाठी “Back button” याचा वापर केला जाऊ शकतो. सर्व तपशील तपासल्यानंतर पेमेंट प्रक्रियेसाठी “Continue Booking” यावर क्लिक करा.

पेमेंट करण्यासाठी आपण Credit cards, Net banking, Wallets and Multiple payment service यांचा वापर करू शकतो. त्यानंतर इच्छित पेमेंट पर्याय निवडा. नंतर निवडलेल्या बँक वेबसाइट वरून “Make Payment” या बटणावर क्लिक करा.

नंतर पेमेंट केल्यानंतर व निवासाच्या बुकिंगनंतर “Ticket Confirmation” पेज ओपन होईल. यानंतर “Virtual reservation message” (VRM) SMS च्या रूपामध्ये आपल्या मोबाइल नंबरवर पाठविला जाईल.(प्रवासी आरक्षण फॉर्ममध्ये कन्फर्म केल्याप्रमाणे).

तसेच बुकिंग कन्फर्मेशन मेल ईमेल आयडीवर पाठविले जाईल. इलेक्ट्रॉनिक रिझर्वेशन स्लिप छापण्यासाठी “प्रिंट तिकिट” बटण याचा वापर करा

जर आपल्याला रिटर्न जर्नी साठी तिकिट बुक करायचे असल्यास “Book Return/Onward Ticket” या बटण वरती क्लिक करा.

Retain the details या पर्यायाचा वापर केल्यास सद्यस्थितीत दिलेल्या प्रवाश्यांचा तपशील टिकून राहील. दुसरे तिकिट बुक करण्यासाठी, “Book Another Ticket” या बटणाचा वापर केला जातो.

हेही वाचा – IRCTC ई-तिकीट बुकिंगसाठी असे करा युजर रजिस्ट्रेशन आणि मिळवा IRCTC लॉगिन युजनेम आणि पासवर्ड

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.