वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईन

IRCTC ई-तिकीट बुकिंगसाठी असे करा युजर रजिस्ट्रेशन आणि मिळवा IRCTC लॉगिन युजनेम आणि पासवर्ड

भारतीय रेल्वेने आपली ई-तिकीट वेबसाइट IRCTC आणि आयआरसीटीसी रेल कनेक्ट मोबाइल ऍपचे नूतनीकरण व अपग्रेड केले आहे, जे ‘ऑनलाइन’ रेल्वेच्या तिकिटांच्या बुकिंगसाठी वापरले जातात.

“बेस्ट-इन-क्लास” फीचर्सची ऑफर देणारी अपग्रेड ई-तिकीट वेबसाइट आणि अ‍ॅप, माननीय रेल्वे आणि वाणिज्य व उद्योग व ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री, पीयूष गोयल यांनी सादर केले.

रेल्वे तिकिटांच्या बुकिंगसाठी या नवीन जागतिक दर्जाच्या वेबसाइटच्या डिझाईनवर रेल्वे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. अखंड प्रवासाच्या अनुभवासाठी सानुकूलने, बुकिंगसाठी एक स्टॉप ट्रेनची निवड, तसेच जेवणासाठी एकत्रित बुकिंग व तिकिटासह वापरकर्त्याची वैयक्तिकरण वैशिष्ट्ये पहिल्यांदाच एकत्रित केली गेली आहेत.

IRCTCचे काही नवीन वैशिष्ट्ये:

  • तिकिट बुकिंग प्रमाणेच जेवणाचं बुकिंग करण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे.
  • वेबसाइट हँग होण्याची समस्या उद्भवणार नाही.
  • मिनिटाला 10000 पेक्षा जास्त तिकिट्स बुक होतील.

IRCTC ने सुरू केली ‘Book now pay later’ सुविधा:

आयआरसीटीसीने एक नवीन पोस्ट पेड पर्याय देखील सुरू केला आहे. या सुविधेअंतर्गत वेबसाइटवर आधी तिकिट बुक करून नंतर पेमेंट करण्याचा पर्याय आहे. यामध्ये प्रवासी तिकिट बुक केल्यानंतर e-payments च्या माध्यमातून 15 दिवसांच्या आतमध्ये कधीही पेमेंट करू शकतात किंवा तिकिट डिलिव्हरीच्या 24 तासांच्या आतमध्ये पेमेंट करता येते.

ट्रेन तिकीट बुकिंगसाठी IRCTC ची रजिस्ट्रेशन प्रोसेस:

IRCTC चे रजिस्ट्रेशन करण्यासाठी वैयक्तिक नोंदणी हि विनामूल्य आहे. IRCTC चे रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी स्वतंत्र वापरकर्ता म्हणून नोंदणी करणे अनिवार्य आहे.

IRCTC चे रजिस्ट्रेशन करण्यासाठी https://www.irctc.co.in च्या वेबसाईट वर जा.

वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावर Login, Register असे ऑपशन दिसतील त्यातील Register या पर्यायावर क्लिक करा.

पुढे Create Your account हे पेज ओपन होईल यामध्ये आपला युजर आयडी आणि पासवर्ड जनरेट करायचा आहे. तर आपल्या मनाने आपला युजर आयडी,पासवर्ड ,आणि भाषा निवडायची आहे, तसेच सेक्युरिटी प्रश्न निवडायचा आहे व Continue यावरती क्लिक करायचे आहे.

नंतर स्वतःची माहिती हे पेज ओपन होईल. यामध्ये स्वतःचे नाव, व्यवसाय, जन्म तारीख, लिंग, मोबाईल नंबर, मेल आयडी हि सर्व माहिती भरायची आहे, त्यानंतर Continue यावरती क्लिक करायचे आहे.

सूचना : कृपया आयआरसीटीसी ई तिकीट वेबसाइटवर आधार आधारित लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणे आपले अचूक नाव द्या.

त्यानंतर तुमचा पत्त्याचा तपशील टाकायचा आहे, यामध्ये घराचा पत्ता, पिन कोड, राज्य इत्यादी माहिती भरायची आहे.
सर्व तपशील भरल्यानंतर, “नोंदणी” (Register) बटणावर क्लिक करा.

एक नोटिफिकेशन दिसेल, त्यामध्ये प्रविष्ट केलेला ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर योग्य असल्यास “ओके” बटणावर क्लिक करा.

यशस्वी नोंदणीनंतर कृपया नोंदणी पुष्टीकरण मेलसाठी आपले नोंदणीकृत ईमेल तपासा. “येथे क्लिक करा” या ऑपशन वर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला “IRCTC.CO.IN” हि वेबसाइट पुन्हा ओपन होईल तेथील “लॉगिन” या बटणावर क्लिक करायचे आहे. आणि नोंदणीच्या वेळी नमूद केलेला तुमचा यूजर आयडीपासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर आपला मोबाइल आणि ईमेल टाकायचा आहे.

त्यानंतर नोंदणीकृत ईमेल आयडी वर आलेला व्हेरीफिकेशन कोड टाकायचा आहे.

ईमेल आणि मोबाइल रजिस्टर झाल्यानंतर, “आपले खाते यशस्वीरित्या रजिस्टर झाले आहे. पुन्हा लॉगिन करण्यासाठी येथे क्लिक करा.” असा मजकूर प्रदर्शित होईल.

हेही वाचा – IRCTC च्या नवीन वेबसाइटवर ऑनलाईन ट्रेन तिकीट बुकिंग कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.