वृत्त विशेषमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी कामे

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस वाढीव अनुदान !

राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतःची कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी “मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना” शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आली आहे. ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधांची असणारी आवश्यकता व त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या स्त्रोतांची मर्यादा विचारात घेऊन मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नसलेल्या ४२५२ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत १७४८ ग्रामपचायतींना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

सदर योजने अंतर्गत आवश्यक निधी आगामी चार वर्षात तरतूद करुन खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच सदर योजनेंतर्गत निधी मंजुरीबाबत, सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पेक्षा कमी, १००० ते २००० व २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींनी ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकामासाठी अनुक्रमे रु. १२.०० लक्ष, रु.१८.०० लक्ष व रु.१८.०० लक्ष इतके मूल्य निर्धारित करण्यात आले. तथापि, प्रस्तुत बांधकाम मुल्याच्या ९०% प्रमाणे रुपये १०.८० लक्ष, ८५ % प्रमाणे रुपये १५.३० लक्ष व ८०% प्रमाणे रुपये १४.४० लक्ष इतकी रक्कम शासनामार्फत अनुदान स्वरुपात व उर्वरीत १०% प्रमाणे रु.१.८० लक्ष, १५ % प्रमाणे रु.२.७० लक्ष व २० % प्रमाणे रु.३.६० लक्ष ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्वनिधीतून उपलब्ध करुन देण्याची तरतूद होती.

तथापि, उपरोक्त बांधकाम मुल्य व स्वनिधीच्या अटीमुळे, योजनेस मिळणारा अल्प प्रतिसाद विचारात घेता, योजनेतील निधी निकषांत सुधारणा / स्वः निधीची अट रद्द करुन ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय बांधण्यास वाढीव अनुदानासह मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस वाढीव अनुदानासह मुदतवाढ देण्याबाबत शासन निर्णय –

मा. मंत्रीमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार, मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतःचे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यास शासन निर्णय क्र. ग्रापंई-२०१७/ प्र. क्र. २४६/ बांधकाम-४, दि. २३ जानेवारी, २०१८ व शासन निर्णय क्र. ग्रापंई-२०१८/प्र.क्र.५३/बांधकाम-४, दि. २ नोव्हेंबर, २०१८ मधील अटींमध्ये पुढील सुधारणा करण्यात येत आहे.

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना पुढील चार वर्षांसाठी सन २०२३-२४ ते सन २०२७-२८ या कालावधीकरीता राबविण्यात येईल.

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नसलेल्या २००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना रु.२०.०० लक्ष व २००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना रु.२५.०० लक्ष अनुदान देण्यात येत आहे. तसेच, ग्रामपंचायत स्वनिधीची अट रद्द करण्यात येत आहे.

तथापि, ग्रामपंचायत बांधकामासाठी यापेक्षा अधिक निधीची आवश्यकता असल्यास सदरचा अतिरिक्त निधी हा राज्य शासनाच्या विविध योजनांतून अभिसरणाद्वारे (Convergence) जसे केंद्र व राज्य शासनाच्या इतर योजना, वित्त आयोग निधी, जिल्हा ग्राम विकास निधी, स्थानिक विकास निधी (खासदार, आमदार निधी) इ. बाबींमधून प्राप्त करून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर योजनेंतर्गत बांधकाम करावयाच्या ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम हे कालबद्ध कार्यक्रम आखून अभियान स्वरूपात राबविण्यात येईल.

सदर योजनेंतर्गत यापुर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे परंतु कार्यारंभ आदेश न दिलेल्या कामांना उपरोक्त निधी निकषाच्या तरतुदी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना या योजनेमधून त्यांच्या कार्यालयाचे बांधकाम करावयाचे असल्यास प्रथम ग्रामसभेचा ठराव करुन लोकसंख्येच्या टप्याप्रमाणे शासनाने निश्चित केलेल्या बांधकाम मुल्यांनुसार सदर ग्रामपंचायत तयार असल्याचे प्रमाणित करावे. सदर ग्रामपंचायतींनी वरीलप्रमाणे ठराव संमत केल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय उपलब्ध नसल्याची तसेच कार्यालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध असल्याची खात्री केल्यानंतर जिल्हा परिषदेने अंतिम मंजूरी प्रदान करावी.

ग्राम विकास विभागाच्या दिनांक ०१ डिसेंबर, २०१५ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार, या योजने अंतर्गत अंतिमतः निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींना त्यांच्या कार्यालयांच्या बांधकामांना निधी वितरीत करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली असून बांधकामाच्या टक्केवारीनुसार निधी वितरणाची कार्यवाही करण्यात येईल.

सदर कामांकरिता होणारा खर्च हा मागणी क्र.एल-३, २५१५ इतर ग्राम विकास कार्यक्रम, १९८, ग्रामपंचायतींना सहाय्य (००) (००) (१०) मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना (२५१५ २५५७) ३१ सहायक अनुदाने (वेतनेतर)” या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

ग्राम विकास विभाग शासन निर्णय : मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस वाढीव अनुदानासह मुदतवाढ देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.