लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही? ऑनलाईन स्टेट्स असे तपासा!
महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहिना ₹1500 आर्थिक मदत देणे हा आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक सक्षमीकरण मिळण्यास मदत होईल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास थोडी फार मदत मिळेल. पण अनेक महिलांच्या मनात प्रश्न आहे की, लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थीची स्थिती “Ladki Bahin Yojana Beneficiary Status” काय आहे? पैसे का आले नाहीत? स्टेट्स ऑनलाइन कसे तपासायचे?
जर योजनेचे अजूनपर्यंत पैसे तुमच्या खात्यात आलेले नाहीत, तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी स्टेट्स – Ladki Bahin Yojana Beneficiary Status:
अनेक महिला योजनेसाठी अर्ज केले, परंतु काही अर्ज पुनरावलोकनाअंती मंजूर झाले तर काहींमध्ये त्रुटी आढळतात. म्हणूनच प्रत्येक अर्जदार महिलेला तिच्या लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थीची स्थिती (Ladki Bahin Yojana Beneficiary Status) तपासणी स्वतः करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन स्टेट्स कसे तपासावे?
मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थीची (Ladki Bahin Yojana Beneficiary Status) स्टेटस वेबपोर्टल वरून ऑनलाईन चेक करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करून पोर्टल ओपन करा व लॉगिन करा.
https://ladakibahin.maharashtra.gov.in
“यापूर्वी केलेले अर्ज” या मेनूवर क्लिक करा
त्यानंतर Application Status, Approved, आणि Sanjay Gandhi कॉलममध्ये “Yes” आहे का ते पाहा
त्याच ठिकाणी Transaction History बघण्यासाठी “Actions” कॉलममध्ये असलेला “Application Transaction History” वर क्लिक करा

तुम्हाला तुमचे पैसे कोणत्या बँकेत आले आहेत हे दिसून येईल.
अर्जाची स्थिती काय दर्शवते?
Ladki Bahin Yojana Beneficiary Status तपासतांना खालील स्टेट्स दिसू शकतात:
Pending to Submitted – अर्ज भरलेला आहे पण अजून सबमिट नाही.
In Review – अर्ज सध्या तपासणी प्रक्रियेत आहे.
Approved – अर्ज मंजूर झाला आहे.
Rejected – अर्ज अमान्य करण्यात आला आहे. पुन्हा अर्ज करता येणार नाही.
Disapproved – Can Edit and Resubmit – त्रुटी असलेल्या अर्जासाठी पुन्हा दुरुस्ती करून सबमिट करण्याची संधी आहे.
पैसे आले नाहीत? हे 4 महत्त्वाचे टप्पे तपासा
बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का? जर आधार लिंक नसेल, तर लगेच लिंक करून घ्या.
मोबाईलवर कोणता त्रुटीचा मेसेज आला आहे का? जर काही त्रुटी असेल, तर त्या प्रमाणे अर्जात दुरुस्ती करा.
Transaction History तपासा. पैसे आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बँक खात्यावर जमा झाले असण्याची शक्यता आहे.
Customer Care वर संपर्क करा. हेल्पलाईन क्रमांक: 181 (महिला व बालविकास विभाग)
अर्जात त्रुटी असली तर काय करावे?
जर अर्जात काही त्रुटी असेल, आणि तुम्हाला “Disapproved – Can Edit and Resubmit” असे स्टेट्स दिसत असेल, तर:
पोर्टलवर जाऊन “Edit Form” वर क्लिक करा
योग्य ती दुरुस्ती करा
पुन्हा अर्ज सबमिट करा.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास योजनेच्या लाभार्थीची स्थिती “Ladki Bahin Yojana Beneficiary Status” वेळोवेळी तपासणे अत्यंत गरजेचे आहे. अर्जात काही अडचण असल्यास ती लवकरात लवकर दुरुस्त करा आणि खात्यात पैसे आले की नाही हे नक्की तपासा.
सद्य स्थितीत अर्ज मंजूर असूनही पैसे न आल्यास, आधार लिंकिंग व बँक डिटेल्स योग्य आहेत का हे तपासून घ्या. अशा प्रकारे काही छोटी पावले उचलून तुम्ही शासनाच्या या महत्त्वाच्या योजनेचा लाभ घेऊ शकता.
या लेखात, आम्ही लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थीची स्थिती (Ladki Bahin Yojana Beneficiary Status) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लाडकी बहीण योजनेच्या संबंधित महत्वपूर्ण लेख वाचा !
- लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यामध्ये आले नाही तर हे काम करा !
- मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना : रद्द झालेले अर्ज, दुरुस्तीसह पुन्हा दाखल करण्याचे आवाहन, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया !
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजेनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस!
- मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना; असा भरा वेबपोर्टल वरून ऑनलाईन अर्ज !
- मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना : रद्द झालेले अर्ज, दुरुस्तीसह पुन्हा दाखल करण्याचे आवाहन, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया !
- या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले पैसे सरकार परत घेणार आहे का ? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारचे बॅंकांना महत्वाचे आदेश !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
नारीशक्ती दूत ॲप मध्ये मोबाईल नंबर टाकुन सबमिट केलं की unexpected error असे दाखवत आहे , ॲप अपडेटेड आहे
पैसे का येत नाही
Paise yet nahit