कृषी योजनामहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी २३० कोटी निधी वितरीत !

सन २०१५-१६ ते २०१८-१९ या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहिर करण्यात आली होती. तसेच राज्यात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नाही. परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दृष्टचक्रात अडकलेला आहे आणि त्यांना शेती कामांकरीता नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

शेतकऱ्यांना कर्जाच्या दुष्टचक़ातून बाहेर काढून चिंतामुक्त करण्याच्या हेतूने मा. मुख्यमंत्री महोदय यांनी हिवाळी अधिवेशन, २०१ ९ मध्ये “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९” जाहीर केली असून याबाबत खालील शासन संदर्भ क्र. १ अन्वये कर्जमुक्ती योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ (राज्यस्तर) (कार्यक्रम), (२४३५०१४२) या लेखाशिर्षाअंतर्गत ३३ अर्थसहाय्य या बाबी अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी निधी वितरीत !राज्य, पुणे यांच्या मागणीनुसार निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Mahatma Jotirao Phule Shetkari Karjmukti Yojna):

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रु. २३०.०० कोटी (रु. दोनशे तीस कोटी फक्त) एवढा निधी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ (राज्यस्तर) (कार्यक्रम), (२४३५०१४२) या लेखाशिर्षाअंतर्गत ३३ अर्थसहाय्य या बाबी साठी वितरीत करण्यास या शासन निर्णयान्वये शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

सदर तरतूद खर्च करण्यासाठी (V०००४) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त सहाय्यक निबंधक (अंदाज व नियोजन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच लेखाधिकारी, अधिन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आले आहे.

सदर निधी आहरण करुन हा खर्च वेळेत होईल हे सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी पहावे. तसेच या बाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठवावी असे खालील शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

सदरहू रक्कम मागणी क्रमांक व्ही -०२, २४३५ – इतर कृषीविषयक कार्यक्रम ६० – इतर, १०१ शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना, (००) (०३) महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ (२४३५ ०१४२), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखालील सन २०२१-२२ या वित्तीय वर्षांअंतर्गत उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून खर्च करण्यात यावी, असे खालील शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे..

सदर शासन निर्णय, नियोजन विभाग अनौपचारीक संदर्भ क्रमांक १४४/१४३१ दिनांक २४.०३.२०२२ अन्वये तसेच वित्त विभाग अनौपचारीक संदर्भ क्रमांक २३०/व्यय -२ दिनांक ३०.०३.२०२२ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात आला आहे.

शासन निर्णय: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ (राज्यस्तर) (कार्यक्रम) योजनेसाठी निधी वितरीत करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – कृषी कर्ज मित्र योजना – Krishi Karj Mitra Yojana

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.