वृत्त विशेष

नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत अनुदान योजना सन 2020-2021

इंधनाची बचत व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्र उभारण्याचे आवाहन केले. पशुपालक शेतकऱ्यांच्या इंधनात बचत व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना १२ हजार रुपये व अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्रत्येकी १३ हजार रुपयाचे अनुदान दिले जाते. याशिवाय बायोगॅस संयंत्राला जोडून शौचालय उभारणीसाठी १ हजार सहाशे रुपयाचे अनुदान दिले जाते. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत हा बायोगॅस संयंत्र उभारणीचा उपक्रम राबवला जातो.

नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत कार्यक्रम ही 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. केंद्र शासनाने आदेशान्वये सादर योजनेसाठी सन 2020-21 करीता राज्य शासनास वितरित केलेला आहे.

संदर्भीय आदेश क्र. 6 अन्वये “नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खतव्यवस्थापन कार्यक्रम (NNBOMP)” या योजनेच्या अनुषांगाने, निधी आहरण व संवितरण करणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

केंद्र शासनाकडून सण २०२०-२१ या आर्थिक वर्षांकरिता राज्यात ७००० बायोगॅस संयंत्राचे उद्दिष्ट कळविलेले आहे. सदर उद्दिष्टांच्या अनुषंगाने सण २०२०-२१ या वर्षांकरिता अनुदान वितरित करण्याच्या अनुषंगाने रक्कम राज्यस्तरावरील PFMS प्रणालीसाठी नोंदणी करण्यात आलेल्या बँक बचत खात्यात जमा करून वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.