आदिवासी विकास विभागआपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी योजना

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना : “केंद्रवर्ती योजनेचा लाभ कसा घ्याल? जाणून घ्या सविस्तर माहिती !

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना (Nucleus Budget Scheme) ही महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाद्वारे राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश आदिवासी समाजाच्या जीवनमानात सुधारणा करणे आणि त्यांना आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे.

राज्यातील आदिवासी परंपरा, संस्कृती आणि संघर्षमय इतिहास लाभलेल्या जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या आशा लागल्या आहेत. 2025-26 साठी घोषित करण्यात आलेली केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना (Nucleus Budget Scheme) ही अनुसूचित जमातींसाठी (Scheduled Tribes) एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना (Nucleus Budget Scheme 2025-26):

अनुसूचित जमातींसाठी एक सशक्तीकरणाची नवी दिशा घेऊन आली आहे,  केंद्र सरकारच्या “Nucleus Budget Scheme 2025-26” अंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी आता उपलब्ध आहे!

  1. महिलांसाठी योजना (DBT अनुदान 85% ते 100% पर्यंत): शिलाई मशीन खरेदीसाठी अनुदान (85%)
  2. विविध लघुउद्योगांसाठी आर्थिक सहाय्य (85%)
  3. शेतकऱ्यांसाठी (वनपट्टेधारक): ठिबक/तुषार सिंचनासाठी अनुदान (85%)
  4. बैलचलित पेरणी यंत्र खरेदीसाठी अनुदान (85%)
  5. मशागत व पेरणी साहित्य खरेदीसाठी अनुदान (85%)
  6. स्ट्रॉबेरी लागवड व पॅकेजिंगसाठी अनुदान (85%) (डाब व तोरणमाळ परिसरासाठी)
  7. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी भांडी संच (संच स्वरूपात पुरवठा)
  8. सोलार ड्युअल पंप (100% अनुदान, ग्रामपंचायतस्तरावर)
मूलभूत अटी:
  • अर्जदार अनुसूचित जमातीतील असावा.
  • पेसा क्षेत्रातील आदिवासी ग्रामपंचायतीचा रहिवासी असणे आवश्यक.
  • काही योजनांसाठी प्रशिक्षण प्रमाणपत्र अनिवार्य.
कागदपत्रे आवश्यक:
  • आधार कार्ड,
  • बँक खाते,
  • जात प्रमाणपत्र,
  • उत्पन्न प्रमाणपत्र
योजनेचे वैशिष्ट्ये:
  1. लकालानुरूप गरजांवर लक्ष: या योजनेअंतर्गत अशा योजनांना प्राधान्य दिले जाते ज्या स्थानिक गरजांनुसार आवश्यक असतात, परंतु त्या नियमित अर्थसंकल्पात समाविष्ट नसतात.
  2. प्रशासनिक लवचिकता: योजना प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या माध्यमातून आणि अपर आयुक्त, आदिवासी विकास यांच्या नियंत्रणाखाली राबवली जाते.
  3. लाभार्थ्यांची आर्थिक मर्यादा: प्रत्येक आदिवासी व्यक्ती किंवा कुटुंबासाठी रु. 50,000/- पर्यंतचा लाभ मिळू शकतो. सामूहिक प्रकल्पांसाठी ही मर्यादा रु. 7,50,000/- पर्यंत असू शकते.

केंद्रवर्ती अर्थसंकल्प (Nucleus Budget Scheme) योजना म्हणजे तुमच्या व्यवसाय, शेती, आणि सक्षमीकरणाच्या वाटचालीसाठी एक अमूल्य संधी आहे. आजच अर्ज करा आणि तुमच्या भविष्याच्या दिशेने पहिलं पाऊल उचला! या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा.

अर्ज सादर करण्याची मुदत: २ जून २०२५ ते १५ जुलै २०२५

अधिकृत वेबसाईट: https://www.nbtribal.in

संपर्क – जिल्हा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

केंद्रवर्ती अर्थसंकल्प (Nucleus Budget Scheme) योजना ही आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी साधन आहे. या योजनेद्वारे स्थानिक गरजांनुसार लवचिक आणि तातडीने उपाययोजना राबवून आदिवासी समाजाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा.

या लेखात, आम्ही केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना (Nucleus Budget Scheme) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. बियाणे टोकन यंत्र योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
  2. रुंद वाफा व सरी पेरणी यंत्र (बीबीएफ यंत्र) अनुदान योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा
  3. महाडीबीटी अंतर्गत शेततळे अनुदान योजना
  4. मनरेगा अंतर्गत शेततळे अनुदान योजना
  5. शेततळे योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा!
  6. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – POCRA Yojana
  7. मागेल त्याला योजना : फळबाग /ठिबक/ तुषार सिंचन/ शेततळे/ शेततळयाचे अस्तरीकरण/ शेडनेट/ हरितगृह/ आधुनिक पेरणीयंत्र (BBF) /कॉटन श्रेडर
  8. महाडीबीटी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन डाउनलोड करा ! MahaDBT Yojana Beneficiary List Download Online!
  9. शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme
  10. महाडीबीटी लॉटरी मध्ये निवड व पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे !
  11. कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य (कृषी यांत्रिकीकरण) योजनेसाठी असा करा महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज!
  12. पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  13. कुसुम सोलर पंपाचे दर, कंपनी संपर्क व लाभार्थी यादी पहा ऑनलाईन !
  14. कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी सुरु; असा करा ऑनलाईन अर्ज ! – Kusum Solar Pump Yojana Online Registration
  15. पाईप व पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
  16. बॅटरी फवारणी पंप १००% अनुदानसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
  17. सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
  18. सर्व शेतकरी योजना आता “महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप” वर – MahaDBT Farmer App
  19. या शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलर पंप; असा करा ऑनलाईन अर्ज !
  20. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना; असा करा ऑनलाईन अर्ज!
  21. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४; आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.