महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभागसरकारी कामे

संगणक लघुलेखन परीक्षेसाठी शासन मान्यता !

दिनांक ३१.१०.२०१३ च्या शासननिर्णयान्वये राज्यातील शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन (Sanganak laghulekhan test) वाणिज्य संस्थांमध्ये संगणक टायपिंग अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत मंजूरी देण्यात आलेली आहे. तसेच दिनांक २७.०४.२०२३ च्या शासननिर्णयान्वये महाराष्ट्र वाणिज्य शिक्षण संस्था (टंकलेखन, लघुलेखन आणि संगणक टंकलेखन अभ्यासक्रम) मान्यता व संचालन नियम १९९१ च्या सुधारित नियमावलीस शासन मान्यता देण्यात आलेली आहे.

गतकाही वर्षांपासून टंकलेखन यंत्रे कालबाह्य झाले असून टंकलेखन व लघुलेखनासाठी संगणकाचा अधिकाधिक वापर करण्यात येत आहे. सबब, लघुलेखनातही संगणकाचा वापर गरजेचा झाला आहे. त्यानुषंगाने सद्यस्थिती विचारात घेता लघुलेखन परीक्षेसाठी (Sanganak laghulekhan test) संगणकीय परीक्षेस मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

संगणक लघुलेखन परीक्षेसाठी शासन मान्यता – Sanganak laghulekhan test:

जून २०२४ व त्यानंतर होणाऱ्या लघुलेखन (Sanganak laghulekhan test)  परीक्षा या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

सदर परीक्षा आयोजनाची पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयाची राहील. परीक्षा योग्य रितीने पार पाडण्यासाठी लागणारी यंत्रणा / व्यवस्थापन यांचे योग्य नियोजन करण्यात यावे. संगणकीय लघुलेखन परीक्षेची कार्यपध्दती व गुणपध्दती याबाबत संबंधित वाणिज्य संस्था व विद्यार्थी यांना अवगत करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांची राहील. संगणकीय परीक्षा पध्दतीचा विद्यार्थ्यांवर ताण पडणार नाही, याची दक्षता संबंधित वाणिज्य संस्था व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी घ्यावी.

संगणकीय लघुलेखन वाणिज्य परीक्षेच्या कार्यपध्दतीसाठी परिशिष्ट-अ सोबत जोडण्यात आले आहे. त्याप्रमाणे संगणक लघुलेखन (Sanganak laghulekhan test)  परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी करावे.

सदर परीक्षा संदर्भात वेळोवेळी परीक्षानुरूप होणारे आवश्यक बदल करण्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे सक्षम राहील.

संगणक लघुलेखन परीक्षा कार्यपद्धती – Sanganak laghulekhan test procedure:

१. संगणक लघुलेखन परीक्षा ही यापुढे संगणक असलेल्या परीक्षा केंद्रांवरच घेण्यात येईल.

२. परीक्षा केंद्रावर येताना विद्यार्थ्यांना संगणक लघुलेखन (Sanganak laghulekhan test) परिक्षेसाठीचे प्रवेश पत्र, आधार कार्ड/पॅन कार्ड/वाहनचालक परवाना यापैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. सदर कागदपत्रांशिवाय परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रामध्ये प्रवेशित होता येणार नाही.

३. संगणक लघुलेखन (Sanganak laghulekhan test) परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना दोन गती उतारे देण्यात येतील. सोडवावयाचे गती उतारे (Speed Passage) हे संगणकाच्या माध्यमातून सॉफ्टवेअर द्वारे इयरफोनने परिक्षार्थी विद्यार्थ्यां ना ऐकविण्यात येतील. प्रत्येक गती उतारा हा ५० गुणांचा असेल. पास होण्यासाठी विद्यार्थ्याने दोन्ही गती उतारे मिळून ५०% गुण म्हणजेच ५० गुण मिळवणे आवश्यक राहील. तथापि, प्रत्येक गती उताऱ्यामध्ये उत्तीर्ण होण्याकरीता किमान १५ गुण मिळवणे बंधनकारक राहील. याचाच अर्थ २ पैकी एका गती उताऱ्यामध्ये १५ पेक्षा कमी गुण मिळाल्यास त्या विषयामध्ये संबंधित परीक्षार्थी हा अनुतीर्ण घोषित करण्यात येईल. गती उताराच्या लिप्यांतरामध्ये ३ चुकांसाठी १ गुण कमी करण्यात येईल. प्रत्येक गती उताऱ्यामध्ये जेवढ्या चुका होतील, त्या प्रमाणात (३ चुकांसाठी १ गुण कमी केले जातील) या नुसार गुणांकन करण्यात येईल. ही गुणांकन पद्धती लघुलेखानाच्या सर्व १६ विषयांसाठी लागू असेल.

४. पूर्वीच्या परीक्षा पद्धतीमध्ये इंग्रजी ६० श.प्र.मि व ८० श.प्र.मि या विषयांकरिता वस्तुनिष्ठ (Objective) प्रश्नांची तरतुद होती, जुन २०२४ व त्यापुढे आयोजीत परीक्षांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांची तरतुद वगळण्यात आली आहे. पुर्वी विद्यार्थ्यांनी काढलेल्या आऊटलाईन तपासतांना परीक्षकांकडून दिल्या जाणाऱ्या १० गुणांकरीता प्रमाणित गुणांकण पध्दत (Standard Procedure) नसल्यामुळे अंदाजित गुण दिले जात होते त्यामुळे जुन २०२४ व त्यापुढे आयोजीत केल्या जाणा-या परीक्षांसाठी आऊटलाईन गुणांकनाची तरतुद रद्द करण्यात येत आहे त्याऐवजी वर नमूद केल्याप्रमाणे प्रत्येकी ५० गुणांचे दोन गती उतारे (Speed Passage) देण्यात येतील. आखीव उत्तरपत्रिकेमध्ये बाह्यरेखा आढळून न आल्यास किंवा त्यामध्ये त्रुटी आढळून आल्यास विद्यार्थ्यांचे संगणकावरील लिप्यांतर ग्राह्य धरले जाणार नाही आणि त्याला गुण दिले जाणार नाहीत.

५. प्रत्येक गती उतारा हा ५० गुणांचा राहील. पास होण्यासाठी विद्यार्थ्याने दोन्ही गती उतारे मिळून ५०% गुण मिळवणे बंधनकारक राहील. तथापि, प्रत्येक गती उताऱ्यामध्ये देखील उत्तीर्ण होण्याकरिता किमान १५ गुण मिळवणे बंधनकारक राहील. याचाच अर्थ २ पैकी एका गती उताऱ्यामध्ये १५ पेक्षा कमी गुण मिळाल्यास त्या संपूर्ण विषयामध्ये संबंधित विद्यार्थी हा अनुतीर्ण घोषित करण्यात येईल. लिप्यांतरामध्ये ३ चुकांसाठी १ गुण कमी करण्यात येईल. प्रत्येक गती उताऱ्यामध्ये जेवढ्या चुका होतील, त्या प्रमाणात (३ चुकांसाठी १ गुण) या नुसार गुणांकन करण्यात येईल. ही गुणांकन पद्धती लघुलेखानाच्या सर्व १६ विषयांसाठी लागू असेल.

६. इंग्रजी, मराठी व हिंदी ६०, ८०, १०० व १२० शब्द प्रति मिनिट च्या परीक्षा वर्षातून दोन सत्रांमधून घेण्यात येतील. त्याचप्रमाणे इंग्रजी १३०, १४०, १५० व १६० शब्द प्रति मिनिट विषयाच्या परीक्षा मात्र वर्षातून एकदा घेण्यात येईल.

७. संगणक लघुलेखन (Sanganak laghulekhan test) परीक्षेमधील २ गती उताऱ्यासाठी प्रत्येकी १ गुण याप्रमाणे जास्तीत जास्त २ गुणांचे ग्रेस गुण देण्यात येतील.

८. संगणक लघुलेखन (Sanganak laghulekhan test) परीक्षेमध्ये श्रुतलेखन (Dictation) व लिप्यांतर (Transcription) हे संगणकावर घेण्यात येणार असल्यामुळे परीक्षेच्या अनुषंगाने कालावधीचे विश्लेषन परीशिष्ठ क्र १ मध्ये देण्यात आले आहे. दोन्ही गती उताऱ्यांना डिक्टेशन आणि लिप्यांतरासाठी समान वेळ देण्यात येणार आहे.

९. प्रत्येकी ४ मिनिटांच्या दोन गती उताऱ्यांचे श्रुतलेखन (Dictation) संगणकावर करावयाचे असल्याने, प्रत्येक परीक्षार्थी जवळ साधा Auxillary Port असलेला इयरफोन असणे आवश्यक आहे. यासाठी संस्थाचालकांनी आपल्या सामुग्री शुल्कातून विद्यार्थ्याना साधा इयरफोन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांच्या बसावयाच्या जागेपासून संगणकाच्या CPU चे अंतर जास्त किंवा कमी असू शकते, ही शक्यता गृहीत धरून प्रत्येक विद्यार्थ्याजवळ CPU पर्यंत पोहोचण्यासाठी Extension Wire देखील संस्थाचालकांनी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.

१०. साधा इयरफोन व्यतिरिक्त इतर कोणतेही प्रकारचे इयरफोन परीक्षार्थीनी सोबत ठेवू नये.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय (Sanganak laghulekhan test GR) :

संगणक लघुलेखन परीक्षेसाठी शासन मान्यता देणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी ‘सारथी’! Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.