CM Vayoshree Yojana New GR : मुख्यमंत्री वयोश्री योजनेत सुधारणा !
राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” (CM Vayoshree Yojana New GR) राबविण्यास मा. मंत्रिमंडळाने दि. ०५ फेब्रुवारी, २०२४ च्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यास दि. ०६ फेब्रुवारी, २०२४ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे सदर योजनेकरिता नवीन स्वतंत्र पोर्टल कार्यान्वित होईपर्यंत या योजनेअंतर्गत निधीचे वितरण पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बँकेच्या बचत खात्यात एकवेळ एकरकमी ऑनलाईन पद्धतीने करण्याऐवजी निधीचे वितरण पात्र लाभार्थ्यांना थेट धनादेशाद्वारे एकवेळ एकरकमी रुपये ३०००/- च्या मर्यादेत ऑफलाईन पद्धतीने वितरीत करण्यास दि. ११ मार्च, २०२४ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेत सुधारणा ! CM Vayoshree Yojana New GR :
आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांनी संदर्भाधीन दि. १५ फेब्रुवारी, २०२४, दि. ३१ मार्च, २०२४ आणि दि. १२ ऑगस्ट, २०२४ च्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून संदर्भाधीन दि. ०६ फेब्रुवारी, २०२४ व दि. ११ मार्च, २०२४ च्या शासन निर्णयामधील नमूद काही निकषामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने “मुख्यमंत्री वयोश्री योजना” या योजनेच्या निकषांमध्ये अंशतः सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
“मुख्यमंत्री वयोश्री योजना” (Mukhyamantri Vayoshri Yojana) या योजनेच्या दि. ०६ फेब्रुवारी, २०२४ व दि. ११ मार्च, २०२४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये पुढीलप्रमाणे अंशतः सुधारणा करण्यात येत आहेत.
अ. क्र. | शासन निर्णय दि. ०६ फेब्रुवारी, २०२४ मधील नमूद निकष | सुधारीत निकष |
१ | ५. लाभार्थ्याची तपासणी, प्रवास, अल्पोपहार, कार्यालयीन खर्च, पात्र लाभार्थी यांची नोंदणी, दस्ताऐवज हाताळणी, कागदपत्र तपासणी करुन त्यांना थेट लाभ (D.B.T.) द्वारे वितरीत करणे. तसेच लाभार्थ्यास लाभ प्रमाणपत्र वाटप करणे करिता प्रती लाभार्थी रु.२००/- अंदाजे खर्च अपेक्षित आहे. | ५. लाभार्थ्याची तपासणी, प्रवास, अल्पोपहार, कार्यालयीन खर्च, पात्र लाभार्थी यांची नोंदणी, दस्ताऐवज हाताळणी, कागदपत्र तपासणी करुन त्यांना थेट लाभ हस्तांतरण (D.B.T.) द्वारे वितरीत करणे. |
२ | ६. योजनेची अंमलबजावणी :- i) ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य व विशेष आर्थिक सहाय्य अनुदान थेट लाभ वितरण (D.B.T.) प्रणालीद्वारे अदा करण्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई आयुक्त, समाजकल्याण विभाग, पुणे आणि जिल्हा स्तरावरील अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असेल. | ६. योजनेची अंमलबजावणी :- ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य व विशेष आर्थिक सहाय्य अनुदान थेट लाभ वितरण (D.B.T.) प्रणालीद्वारे अदा करण्याकरिता आयुक्त, समाजकल्याण, पुणे हे नियंत्रण अधिकारी तसेच आहरण व संवितरण अधिकारी (DDO) असतील. |
३ | ७. राज्य नोडल एजन्सी / यंत्रणा :- प्रस्तुत योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे, लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, लाभार्थ्यांचे आधार क्रमांक, बैंक खाते यांची माहिती गोळा करणे इ. कामे नोडल एजन्सी/केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था (CPSU) यांच्या माध्यमातून आयुक्त, समाजकल्याण पुणे यांच्याद्वारे पार पाडण्यात येईल. | ७. राज्य नोडल एजन्सी / यंत्रणा :- प्रस्तुत योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे, लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खाते यांची माहिती गोळा करणे इ. कामे जिल्हाधिकारी/आयुक्त, महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे पार पाडण्यात येतील. |
ब) जिल्हा स्तर :- सदस्य सचिव समाजकल्याण/जिल्हा अधिकारी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण अधिकारी | ७. ब) जिल्हा स्तर :- सदस्य सचिव : सदस्य सचिव – सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण/ | |
४ | ८. लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष :- सदर योजनेतंर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक (ज्या नागरिकांनी दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यन्त वयाची ६५ वर्षे पूर्ण केली असतील, असे नागरिक पात्र समजण्यात येतील). ज्या व्यक्तींचे वय ६५ वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल, आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील, तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असेल. | ८. लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष :- अ) सदर योजनेतंर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक (ज्या नागरिकांनी दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यन्त वयाची ६५ वर्षे पूर्ण केली असतील, असे नागरिक पात्र समजण्यात येतील). ज्या व्यक्तींचे वय ६५ वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. |
उ) पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तीक आधार संलग्न बचत खात्यात रु. ३०००/- थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरीत झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहीत केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनःस्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक (Invoice) प्रमाणपत्र ३० दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडून प्रमाणित करुन संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम (CPSU) संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर ३० दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल. | उ) पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तीक आधार संलग्न बचत खात्यात रु. ३०००/- थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरीत झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहीत केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनःस्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक (Invoice) व प्रमाणपत्र ३० दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी प्रमाणित करुन पोर्टलवर ६० दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल. | |
५ | ११. नियंत्रण आणि मूल्यमापन-: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे या योजनेचे नियंत्रण केले जाईल. विभागाद्वारे या कार्यक्रमाचे मूल्यमापन अंमलबजावणीच्या एक वर्षानंतर आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांचेमार्फत केले जाईल. अर्ज प्रक्रिया, छाननी, वितरण पद्धती इ. औपचारिकता अंमलबजावणी एजन्सीव्दारे निश्चित केल्या जातील. | ११. नियंत्रण आणि मूल्यमापन-: नियंत्रण आणि मूल्यमापन-: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे या योजनेचे नियंत्रण केले जाईल. विभागाद्वारे या कार्यक्रमाचे मूल्यमापन अंमलबजावणीच्या एक वर्षानंतर आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांचेमार्फत केले जाईल. |
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज व स्वयंघोषणापत्र PDF फाईल डाउनलोड:
ख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये लाभासाठी अर्ज नमुना व स्वयंघोषणापत्र PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी संपर्क :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री-वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेसाठी विभागातील जिल्ह्यांच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय :
- मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेतील सुधारणांबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना (CM Vayoshree Yojana) राबविण्यास मान्यता देणे बाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – राष्ट्रीय वयोश्री योजना – Rashtriya Vayoshri Yojana
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!