वृत्त विशेषनोकरी भरती

राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याला २५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांचे मार्फत बेरोजगार उमेदवारांकरीता 12 ते 17 डिसेंबर, 2021 रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याची मुदत आता 20 ते 25 डिसेंबर, 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त छाया कुबल यांनी दिली.

मुंबई शहर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

लॉकडाऊननंतर नव्याने व्यवसाय/उद्योग सुरु करताना जिल्ह्यातील आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्य बळाची  गरज निर्माण झाली असून स्थानिक बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात राज्यातील नामांकित उद्योजक/आस्थापनांमध्ये रिक्त असलेली विविध प्रकारची सर्वसाधारपणे 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर तसेच बीई व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी रोजगाराची संधी आहे.

>

राज्यभरातून 25 हजार पेक्षा जास्त रिक्तपदांसाठी उद्योग/आस्थापनांमार्फत https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रिक्तपदे ऑनलाईन अधिसूचित करण्यात येत आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी नोकरी इच्छूक युवक-युवतींनी या वेबसाईटला भेट द्यावी. होमपेजवरील नोकरी साधक लॉगीन मधून आपआपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे.

त्यानंतर पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉबफेअर या बटनावर क्लिक करुन त्यातील ‘STATE LEVEL MEGA JOB FAIR 2021’ या रोजगार मेळाव्याची निवड करावी.

यानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घेऊन उपलब्ध असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंतीक्रम नोंदवून रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्ह‍िडीओ कॉन्फरन्स अथवा टेलिफोनद्वारे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.

या राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर येथे प्रत्यक्ष भेटीद्वारे अथवा या कार्यालयाच्या 022-22626303 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती कुबल यांनी केले आहे.

हेही वाचा – भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641 जागांसाठी भरती – IARI Recruitment

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.