सरकारी योजनावृत्त विशेष

स्वच्छ भारत योजना – नागरी 2.00 व अमृत 2.00 यांचा 1 ऑक्टोबरला होणार प्रारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महत्त्वाचे पाऊल असलेल्या स्वच्छ भारत मोहिम-शहरे 2 आणि शहरे पुनर्निर्माण व पुनरुज्जीवन यासाठी अटल भारत योजना-नागरी 2.0 याचा आरंभ एक ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्ली येथील डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे करणार आहेत.

पंतप्रधानांच्या दूरदृष्टीला अनुसरुन सर्व शहरे कचरामुक्त आणि जल-संरक्षित करण्याच्या गरजेतून, स्वच्छ भारत मोहिम-नागरी 2.0 आणि अमृत 2.0 यांची आखणी करण्यात आली होती. या महत्वाच्या योजना म्हणजे झपाट्याने शहरीकरण होत असलेल्या भारतातील आव्हानांना योग्य पद्धतीने तोंड देणे व त्यासाठी त्या दृष्टीने पुढे टाकलेली पावले आहेत आणि आणि 2030 पर्यंत शाश्वत विकासाची उद्दिष्टे प्राप्त करण्याच्या दृष्टीने या योजना महत्त्वाचे सहकार्य पुरवतील.

घरबांधणी आणि शहरी व्यवहार खात्याचे केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री तसेच राज्यातील व केंद्रशासित प्रदेशातील शहर विकास मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

स्वच्छ भारत योजना नागरी 2.0 (SBM-U 2.0):

स्वच्छ भारत योजना नागरी भाग 2.0 या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे सर्व शहरे कचरामुक्त करणे आणि अमृतयोजने अंतर्गत न येणाऱ्या सर्व शहरांमधील सांडपाण्याचे व्यवस्थापन, सर्व शहरी स्थानिक आस्थापना हागणदारी मुक्त प्लस म्हणजेच ओडीएफ+ आणि एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागांना ओडीएफ++ करून त्याद्वारे शहरी भाग स्वच्छ आणि सुरक्षित करणे हे आहे. घनकचऱ्याचे जागच्या जागी वर्गीकरण, कमी वापर, पुनर्वापर, पुनरुज्जीवन या तीन तत्त्वांचा उपयोग, सर्व प्रकारच्या कचऱ्यावर वैद्यानिक प्रकारे प्रक्रिया, आणि परिणामकारक घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी पारंपारिक कचरा पट्ट्यांचे रुपांतरण अशा अनेक बाबी या मोहिमेच्या उद्दिष्टात समाविष्ट आहेत. स्वच्छ भारत योजना नागरी 2.0(SBM-U 2.0) साठीचा साधारण 1.41 लाख कोटी रुपये एवढा खर्च आहे.

अटल भारत योजना-नागरी अमृत 2.00:

अमृत 2.00 ही योजना साधारणपणे 4700 स्थानिक स्वराज्य संस्थामधील सर्व घरांमध्ये 2.68 कोटी नळ जोडण्या देऊन 100% पाणीपुरवठा करणार आहे. तसेच 500 शहरांमध्ये सांडपाणी वाहून नेणाऱ्या 2.64 कोटी जोडण्या पुरवणार आहे. यामुळे नागरी भागातील 10.5 कोटींहून अधिक लोकांना याचा फायदा होईल. अमृत 2.00 मध्ये चक्राकार अर्थव्यवस्थेची तत्वे स्वीकारली आहेत तसेच ही योजना पृष्ठभागावरील तसेच भूगर्भातील पाणी साठ्यांचे संवर्धन आणि संरक्षण याला चालना देणारी योजना आहे. ही योजना पाणी व्यवस्थापनात माहिती आधारित प्रशासन, त्याचप्रमाणे जागतिक स्तरावरील आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्याचा वापर याला महत्व देते. शहरांमध्ये प्रगतिशील स्पर्धा वाढीस लागावी म्हणून पेयजल सर्वेक्षण सुद्धा करण्यात येणार आहे AMRUT 2.0 या योजनेचा खर्च 2.87 लाख कोटी आहे.

स्वच्छ भारत योजना आणि अमृत योजनेचे परिणाम:

स्वच्छ भारत योजना नागरी भाग 2.00 (SBM-U 2.00) व शहरे पुनर्निर्माण व पुनर्जीवन यासाठी अटल भारत योजना-नागरी भाग अमृत 2.0 (AMRUT-2.00) यांनी सात वर्षात शहरी भागाचे चित्र लक्षणीयरीत्या सुधारण्यासाठी मोलाचा सहभाग दिला आहे. पाणी पुरवठ्याच्या मूलभूत सेवा देण्याची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने तसेच स्वच्छता विषयक सुविधा नागरिकांपर्यंत पोचवण्याच्या उद्दिष्ट विकसित करण्यात दोन्ही योजनांचा मोलाचा सहभाग आहे. स्वच्छता मोहिमेने आता जनआंदोलनाचे रूप घेतले आहे. देशातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाचे क्षेत्र हागणदारी मुक्त म्हणून जाहीर झाले आहे तर सत्तर टक्के सांडपाण्याचे व्यवस्थापन आता वैद्यानिकदृष्ट्या होऊ लागले आहे. 1.1 कोटी घरगुती नळजोडणी तर 85 लाख सांडपाणी जोडण्या देऊन या योजनांनी 4 कोटींहून जास्त लोकांना लाभ पोचवला आहे.

हेही वाचा – तुमच्या गावातील शौचालय लाभार्थी यादी पहा ऑनलाईन – Swachh Bharat Mission – Toilet Beneficiary List

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.